Table of Contents
Quality Service Guarantee Or Painting Free
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2021/03/Home-Services-Blog-Inline-Promotion-02.jpg)
Get a rental agreement with doorstep delivery
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2021/03/Home-Services-Blog-Inline-Promotion-BUY-02.png)
Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2021/03/Home-Services-Blog-Inline-Promotion-07.png)
5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!
Loved what you read? Share it with others!
![thumbnail](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/blog_table.png)
![Popup Image](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2023/10/paintingpopup.png)
Submit the Form to Unlock the Best Deals Today
![](https://www.nobroker.in/prophub/wp-content/uploads/2024/01/icons8-loading.gif)
Help us assist you better
Check Your Eligibility Instantly
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2023/12/Spinner-3.gif)
Experience The NoBrokerHood Difference!
Set up a demo for the entire community
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2024/10/icons8-loading.gif)
15 मनोरंजक अशा,भिंतींना जेवणाचे टेबल लावण्याच्या काही कल्पना
Table of Contents
जेवणाची खोली ही जेवणाच्या टेबलच्या उपस्थितीने चांगल्या प्रकारे परिभाषित केली जाऊ शकते. हा फक्त खाण्यासाठीचा टेबल नाही तर बर्याच घरांमध्ये, लोक वाचन किंवा काम करण्यासाठी म्हणून देखील याचा वापर करतात. परंतु आजकाल अंतर्गत सजावट उद्योगात बरेच बदल होत आहेत, अलीकडे जड आणि लाकडी जेवणाची टेबल्सची संकल्पना फार लोकप्रिय राहिलेली नाही.
अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना अनेकदा जेवणाची खोली म्हणून एक छोटीशी जागा मिळते, म्हणून एक मोठासा टेबल त्या जागेचा देखावा नष्ट करू शकेल. म्हणूनच,घरातील सजावटीच्या अलिकडील प्रगतीमुळे, भिंत-आरोहित जेवणाची टेबल्स आता आली आहेत. पारंपारिक आणि रुढीबद्ध टेबल्ससाठी हे चांगले पर्याय आहेत,कारण ते अगदी लहान जागांमध्येही बसतात.
या टेबल्सचा खूप फायदा आहे, विशेषत: मर्यादित उपलब्ध कार्पेट क्षेत्राच्या जागेच्या बाबतीत. समजा आपण एका छोट्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये रहात आहात आणि तिथे टेबल स्थापित करू शकत नाही, कारण टेबलसाठी व्यावहारिकरित्या जागाच शिल्लक नाही, तर भिंतीवर-माउंट केलेले टेबल,ही एक चांगली कल्पना आहे.
Quality Service Guarantee Or Painting Free
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2021/03/Home-Services-Blog-Inline-Promotion-02.jpg)
Get a rental agreement with doorstep delivery
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2021/03/Home-Services-Blog-Inline-Promotion-BUY-02.png)
Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2021/03/Home-Services-Blog-Inline-Promotion-07.png)
5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!
दुसरीकडे, आपल्याकडे मुबलक जागा असल्यास,परंतु तरीही आपण आपल्या घराच्या आतील बाजूस एक कडक असा लुक देऊ इच्छित असल्यासदेखील - एक भिंत-आरोहित टेबल उत्कृष्ट असेल. ते दिवस गेले जेव्हा भिंत-आरोहित टेबल हे मूलभूत आणि विषम वाटायचे. इंटिरियर डिझाइनर्सनी वेगवेगळ्या मॉडेल्सची रचना केली आहे, जी चांगली दिसणारी, टिकाऊ आणि सुंदर आहेत आणि आपल्या खोली किंवा अपार्टमेंटच्या अंतर्गत वातावरणास त्रास न देता,आपणास बरीच जागा वाचविण्याची परवानगी देऊ शकते.
जर आपल्याला,भिंतीवरील माउंट केलेले टेबल हे आपल्या जागेची बचत करण्याबरोबरच आपल्या आतील भागाच्या देखाव्याची कशी वाढ करू शकतात, याबद्दल काही कल्पना नसल्यास, येथे एक छोटेसे मार्गदर्शन केलेले आहे. आम्ही आपल्या घरासाठी प्रेरणा म्हणून विचार करू शकाल आणि वापरू शकाल अशा 15 सर्वोत्तम आणि सर्वात मनोरंजक अशा, भिंतींवर लावलेल्या जेवणाच्या टेबलसाठीच्या कल्पना सूचीबद्ध केल्या आहेत. वाचा आणि त्या जाणून घ्या.
मर्यादित जागा आहे? या मनोरंजक भिंत-आरोहित जेवणाच्या टेबल्सकडे वळा
1.लाकडी भिंत-आरोहित टेबल्स
लाकडाच्या खडबडीत परंतु पॉलिश असलेल्या मोहिनीला काहीही मारु शकत नाही. म्हणून आपल्याकडे लहान कोपऱ्याला जागा असल्यास, एक जुना लाकडी टेबल ही चांगली कल्पना असू शकते. हे टेबल्स भिंतीवर बसवलेले असल्यामुळे,फारच कमी जागा घेतात.
हे स्वयंपाकघरातील टेबलपेक्षा लहान असतात, परंतु लहान कुटुंब किंवा जोडप्यांसाठी योग्य आहेत. ह्या टेबल्स बरोबर,भिंतीवर टांगलेल्या खुर्च्यासुद्धा मिळतात,जेव्हा ह्या उपयोगात नसतात तेव्हा घडी करून वर लावता येतात. आपल्याकडे आपल्या जेवणाच्या क्षेत्रात मर्यादित जागा असल्यास किंवा आपल्याकडे जेवणाची स्वतंत्र जागा नसल्यास आपण ही भिंत-आरोहित टेबल्स निवडू शकता.
![Wooden Wall-Mounted Tables1](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Wooden-Wall-Mounted-Tables1.jpg)
2.स्टील भिंत-आरोहित टेबल्स
स्टील टेबल्स हे उत्तम, टिकाऊ आणि कार्यक्षम आहेत. आपण त्यांना योग्यरित्या टिकविल्यास, ते दीर्घायुशी असेच आहेत. पण यांना राखणे म्हणजे रॉकेट सायन्स नाही! हे वापरताना आपण थोडी काळजी घेणे फक्त आवश्यक आहे. आपल्याला आपल्या अपार्टमेंटमधील खिडकीजवळ, एक लहान जागा असल्यास, जेवणाच्या टेबल्ससाठी स्टूलसह एक जुने जीवण-शैलीतील स्टील टेबल उत्तम आहे.
आपण खिडकीतून टक लावून बाहेर पाहू शकता आणि आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जेवल्याची भावना येऊ शकते. एकाच वेळी, आश्चर्यकारक आणि ओढदायक! भिंतीला लावलेले फोल्डिंग जेवणाच्या टेबलचे हे सर्वोत्कृष्ट उदाहरण असू शकते.
![Steel Wall2](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Steel-Wall2.jpg)
3.स्वयंपाक स्टेशनसह भिंत-आरोहित टेबल
आपण लहान स्टुडिओमध्ये राहता,किंवा आपले स्वयंपाकघर आहे जे आपल्याला एक पारंपारिक जेवणाचा टेबल स्थापित करण्यास परवानगी देत नाही? कल्पना काढुन टाका आणि एक भिंत-आरोहित फोल्डिंग टेबल मिळवा,जो आपली जागा वाचवतो आणि आपल्याला तेथे काउंटर सेट करण्यास मदत करतो.
हे,जेवणाचा टेबल किंवा लहान नाश्ता टेबल म्हणून काम करेल - निवड आपली आहे. जर जवळच खिडकी असेल तर हे अस्ताव्यस्त लांब टेबल्स, आपल्याला एक उत्कृष्ट नजारा देऊ शकतात.
आपल्या घरात पार्टी असल्यास, आपल्याला संपूर्ण वेळ स्वयंपाकघरात घालविण्याची गरज नाही. आपल्याकडे असे टेबल असल्यास आपण सर्व्ह करू शकता आणि पार्टीचा भागही होऊ शकता.
![Wall-Mounted Table with a Cooking Station](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Wall-Mounted-Table-with-a-Cooking-Station3.jpg)
4.खुर्च्यांसह भिंत-आरोहित टेबल्स
आपल्या अपार्टमेंट किंवा घरात एक अरुंद जायची वाट असेल, तर ही एक आदर्श निवड आहे. या प्रकरणात खिडकी असल्याचा एक चांगला फायदा आहे. भिंतींना वजन पेलण्यासाठी मजल्यांवर टेकलेले पाय आणि दोन समांतर बेंच ठेवलेले, हे एक साधे भिंत-आरोहित टेबल आहे.
कल्पना जुन्या पद्धतीची आणि जागा-कुशल आहे! बेंचमध्ये लहान ड्रॉवर किंवा कॅबिनेट असू शकतात जिथे आपण आपल्या कटलरी आणि इतर गोष्टी संग्रहित करू शकता. हे जेवणाचे टेबल म्हणून किंवा आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी आरामदायक जागा म्हणून दुप्पट उपयोगी होते.
![Wall-Mounted Tables with Chairs](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Wall-Mounted-Tables-with-Chairs.jpg)
5.वृक्ष-शैलीची भिंत-आरोहित टेबल्स
ही रचना निसर्ग प्रेमींसाठी आहे. हे भिन्न असे आहे आणि आपल्या खोलीचे केंद्रबिंदू बनेल. फक्त झाडाचे खोड आणि एक रस्टीक-पॉलिश फ्लॅटटॉपमध्ये गुंतवणूक करा. आपण हे आपल्या स्वयंपाकाच्या स्टेशनला लागून ठेवू शकता. जी-आकाराच्या स्वयंपाकघरातही एक नैसर्गिक स्पर्श आणते. हा अभिजात दिसणारा टेबल,कृत्रिम वातावरणामध्ये मिसळेल आणि निसर्गाचा थोडासा स्पर्श करेल.
![Tree-Style Wall-Mounted Table](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Tree-Style-Wall-Mounted-Table.jpg)
6.कॅबिनेट विस्तार
ज्यांच्या घरात खूप मर्यादित जागा आहे त्यांच्यासाठी ही एक अनोखी कल्पना आहे. ह्यामध्ये कॅबिनेट किंवा स्वयंपाकघर ओटा, हा जेवणाच्या व्यवस्थेचा विस्तार बनतो. आपल्याला फक्त एक मजला आणि भिंत-आरोहित लहान, अरुंद डिनर टेबल स्थापित करण्याची आवश्यकता आहे.
कॅबिनेटच्या एका बाजूचे बाक म्हणून रूपांतर होते, आणि दुसऱ्या बाजूला खुर्ची म्हणून वापरले जाऊ शकते. दुसर्या बाजूला भिंत असल्यास, भिंतीवरील माउंट बेंचमध्ये साठवणुकीसाठी काहीतरी करा.
![Cabinet Extension](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Cabinet-Extension.jpg)
7.पेनिन्सुला भिंत-आरोहित जेवणाचा टेबल
आपल्याकडे आपल्या स्वयंपाकघरात फक्त एक लहान कोपरा उपलब्ध असल्यास आणि जेवणाचे टेबल स्थापित करण्यासाठी इतर कोणतीही जागा नसल्यास, आपल्याला आणखी थोडे हुशार होणे आवश्यक आहे. एक पेनिन्सुला स्वयंपाकघरात गुंतवणूक करा आणि भिंत-आरोहित जेवणाचे टेबल – व – स्वयंपाकघर स्टेशन म्हणूनदेखील वापरा.
आपल्याला लाकूड किंवा स्टील वापरण्याची आवश्यकता नाही. फक्त स्वयंपाकघरातील ओट्यासाठी, संगमरवरी किंवा घन पृष्ठभाग वापरा आणि आपल्याकडे एक रस्टीक आणि न्यूनतम भिंत-आरोहित टेबल असू शकेल.
![Peninsula Wall-Mounted Dining Table](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Peninsula-Wall-Mounted-Dining-Table.jpg)
8.कॉर्नर टेबल
हे, लहान स्टुडिओ अपार्टमेंट सामायिक करणारे बॅचलर्स आणि जोडप्यांसाठी योग्य आहे. आपल्या भिंतीचा एक कोपरा मोकळा असल्यास आपण हा टेबल स्थापित करण्यासाठी या जागेचा वापर करू शकता. हे लहान आहे आणि जास्त जागा व्यापणार नाही. याव्यतिरिक्त, आपण याचा अभ्यास किंवा काही काम करण्यासाठी म्हणून वापरू शकता.
![wall-Mounted Corner Table](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Corner-Table.jpg)
9.कॅन्टिलवेर्ड जेवणाचा टेबल
अभियंता किंवा कलाकाराच्या घरासाठी योग्य असा हा टेबल आहे, तो दोन्हीरित्या,स्वयंपाकघरातील टेबल म्हणून आणि जेवणाचा टेबल म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. आपण अगदी लहान ठिकाणी देखील हा समायोजित करू शकता. एक साधी भिंत,किचन टॉप यासाठी पुरेसा आहे. हे एका भिंतीचे आश्चर्य आहे,आणि स्टिंग कॅन्टीलिव्हर्सद्वारे समर्थित असल्याकारणाने, तो सुरक्षित आहे.
![Cantilevered Dining Table](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Cantilevered-Dining-Table.jpg)
10.स्वयंपाकघर कपाटाजवळ एक निश्चित टेबल
जर आपल्या स्वयंपाकघरात,स्वयंपाकघरातील कॅबिनेट किंवा कपाटाजवळ एक छोटीशी न वापरलेली जागा मोकळी असेल तर आपण या जागेचा उपयोग सर्वोत्तम मार्गाने करू शकता. भिंतीवर फक्त एक साधे दिसणारे टेबल निश्चित करा. हे कोणाच्याही आवाक्यात आहे आणि आपल्या स्वयंपाकघराच्या विस्तारासारखेच दिसते.
![Fixed Table Near the Kitchen Cupboard](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Fixed-Table-Near-the-Kitchen-Cupboard.jpg)
11.स्टोरेजसह भिंत-आरोहित टेबल
ज्याला जागा वाचवायची इच्छा असेल, त्याचा हा स्वप्नव्रत असा पर्याय आहे. आपल्याकडे आपल्या स्वयंपाकघरातील काही भाग किंवा लाउंज रूममध्ये मोठी रिकामी भिंत शिल्लक असल्यास, स्टोरेजसह भिंत-आरोहित जेवणाचे टेबल तिथे स्थापित करा.
अशा काही जागा आहेत जिथे आपण वस्तू संग्रहित करू शकता आणि यामुळे आपली छोटीशी असलेली जागा मोठी दिसेल. सेटअप पूर्ण करण्यासाठी आपण भिंत कॅबिनेट देखील स्थापित करून त्यावर टीव्ही स्थापित करू शकता.
![Wall-Mounted Table with Storage](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Wall-Mounted-Table-with-Storage.jpg)
12.फ्लोटिंग टेबल
आणखी एक परिपूर्ण पर्याय,जर आपल्या अपार्टमेंटमध्ये एक छोटा,न वापरलेला कोपरा असल्यास. आपण कोपऱ्यात दोन जणांसाठी फ्लोटिंग डायनिंग टेबल स्थापित करू शकता. हे लहान आहे परंतु बरीच जागा उपलब्ध करून देते, जेणेकरून अडचणीशिवाय दोन लोक खाऊ शकतील.
![Floating Table](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Floating-Table.jpg)
13.किचन काउंटर टेबल
आपल्या लहान स्वयंपाकघरासाठी हे एक परिपूर्ण टेबल आहे. घरात पार्टी असल्यास, आपण स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना,अशा प्रकारचे टेबल स्थापित केल्याने आपण चालू असलेल्या चर्चेसह स्वयंपाकात लक्ष घालू शकता. आपल्याकडे मॉड्यूलर किचन असल्यास, हे टेबल स्थापित करणे सुलभ होईल.
![Kitchen Counter Table](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Kitchen-Counter-Table.jpg)
14.शेल्फ ते टेबल
हे व्यावहारिक परंतु सोपे आहे. शेल्फला टेबल बनविण्यासाठी थोडेसे वाढवा. जे लोक कमी जागा असलेले पेन्टहाउस किंवा स्टुडिओ अपार्टमेंट वापरतात त्यांच्यासाठी ही शेल्फ-कम-टेबल उत्कृष्ट आहे.ह्या टेबलच्या अतिरिक्त समर्थनासाठी आपण निश्चित करता येणारे पाय वापरू शकता. दोन ते तीन लोकांसाठी हा टेबल उत्कृष्ट असू शकतो.
![Shelf to Table](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/Shelf-to-Table.jpg)
15.एक व्यक्ती डायनिंग टेबल
स्वयंपाकघरात,एक सोपी आणि मोहक, एका व्यक्तीची भिंत-आरोहित टेबल त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो,जे नेहमी व्यस्त असतात आणि त्यांना कामाला जाण्यापूर्वी न्याहारी किंवा जेवण करण्याची आवश्यकता असते. ही जागा फारच कार्यक्षम असून ती सुबक दिसते.
![One-Person Dining Table](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/One-Person-Dining-Table.jpg)
निष्कर्ष
ही काही आपल्यासाठी आम्ही सापडवलेली आणि संकलित केलेली सर्वात अद्वितीय आणि मनोरंजक अशी भिंत-आरोहित जेवणाचे टेबल डिझाइन आहेत. आपल्या अपार्टमेंटमध्ये किंवा घरात मर्यादित जागा असल्यास, आपण यापैकी कोणतेही टेबल स्थापित करू शकता. हे सर्व छान आहेत आणि अपार्टमेंटला थोडे अधिक प्रशस्त बनवते. आपणास एक पूर्ण कार्यक्षम टेबल मिळू शकेल, जो दुमडला जाऊ शकतो आणि अगदी कमीतकमी जागा घेईल, व तरीही आपल्याला आरामात जेवण्याची जागा मिळेल. आपण यापैकी कोणतेही डिझाइन निवडू शकता किंवा एखादे डीआयवाय म्हणून काहीतरी स्वतः सुधारित करू शकता.
Recommended Reading
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/08/shutterstock_1036126813.jpg)
Load Bearing Wall: Features and Types
January 31, 2025
3737+ views
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2024/07/wall-texture-designs-for-bedroom.jpg)
24 Best Wall Texture Designs for Bedroom to Transform Your Space in 2025
January 31, 2025
5365+ views
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2021/06/Kitchen-Wall-Tiles-Design.jpg)
25 Kitchen Wall Tiles Design That Can Add Life to Your Culinary Space
January 31, 2025
3479+ views
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2023/06/wall-texture-designs-for-living-room.jpg)
20+ Modern And Stylish Wall Texture Designs for Living Rooms in 2025
January 31, 2025
5716+ views
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2021/09/Paper-wall-hanging-1.jpg)
Paper Wall Hanging Ideas: Easy Wall Hanging Craft Ideas with Paper in 2025
January 31, 2025
7557+ views
Loved what you read? Share it with others!
NoBroker Interiors Design Testimonials
Most Viewed Articles
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/blog_lights.png)
Top Hanging Light Ideas to Illuminate Your House
January 31, 2025
393224+ views
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/GFRG.png)
GFRG Panels - A New Technology in Building Construction
January 31, 2025
257424+ views
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2020/05/blog_table.png)
15 Wall-Mounted Dining Table Design Ideas
January 31, 2025
103650+ views
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2024/01/mivan-construction-technology-1.jpg)
How Mivan Construction Technology Is Transforming the Art of Building!
January 31, 2025
62539+ views
![](https://www.nobroker.in/blog/wp-content/uploads/2024/02/three-bedroom-floor-plans.jpg)
Best 3 Bedroom House Plan: Modern and Space-Efficient Layouts for 2025
January 31, 2025
36565+ views
Recent blogs in
Butterfly Painting as per Vastu Shastra: Remedies, Directions, and Feng Shui Tips in 2025
February 5, 2025 by Anda Warner
20 Latest Wardrobe Inside Design for Ladies: Maximize Your Space and Style in 2025
February 5, 2025 by NoBroker.com
5 Tips on How to Choose Curtains 2025
January 31, 2025 by NoBroker.com
Best Ways to Improve the Lighting in Home
January 31, 2025 by NoBroker.com
DIY Magical Lighting Ideas: Step by Step Guide
January 31, 2025 by NoBroker.com
Join the conversation!