You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Home & Garden आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय

आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय

Published : March 12, 2020, 12:33 PM

Updated : July 11, 2024, 7:02 PM

Author : author_image admin

1276 views

Table of Contents

आपल्या घराला ऐटबाज व रुबाबदार बनविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे,आपल्या घरातील सजावटीमध्ये काही साधे बदल करणे होय. हे आपले खिसे रिकामे न करता आपल्या घरास एक नवीन स्वरूप प्राप्त करून देईल.हे उपाय सोपे, परवडणारे आहेत आणि अल्पावधीत केले जाऊ शकतात, म्हणून, जर आपले घर छान दिसण्यासाठी मेकओव्हर आवश्यक असेल तर हे उपाय नक्कीच करून पहा.

घरातील पडदे बदला

जेव्हा आपल्या घरातील पडद्यांचा विचार केला जातो, तेव्हा आपण त्यांच्यात तीन बदल करु शकता, जे आपल्या घरातील पडद्यांचं दिसणं अजून उन्नत करतील.

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

पहिलं म्हणजे पडद्यांचं छाप / रंग बदलणे. आपल्याकडे नेहमीच साधे, सौम्य रंग असतील तर आपण ठळक किंवा चमकदार किंवा छापील पडदे देखील घेऊ शकता.जर आपण आपल्या पडदा लावलेल्या दांड्या जास्त उंच ठेवल्या,तर आपण बघणाऱ्याच्या मनात खिडक्या मोठ्या असल्याचा आणि उंच छत असल्याचा भ्रम निर्माण करु शकता.

आपण बदलू शकता अशी दुसरी गोष्ट म्हणजे,आपण ते पडदे कशा प्रकारे प्रदर्शित करता;आपण आपल्या पडदे शैलीमध्ये नाविन्य जोडण्यासाठी वेग वेगळे नाविन्यपूर्ण अशा गाठणी वापरू शकता. मण्यांची साखळी, पट्ट्या, केसांची बांधणी, बांगड्या आणि यासारख्या गोष्टी वापरुन पहा.

curtain - 5 Decor Hacks to Make Your Home Look Cool

आपले फर्निचर पुन्हा नवीन करा

जेव्हा आपल्या खुर्च्या, पलंग,बसण्यासाठीचे इतर सामान,सर्व चांगल्या स्थितीत असतात व व्यवस्थित काम करतात आणि घरासाठी योग्य आकाराचे असतात,तेव्हा त्यांच्या जागी बदली नवीन सामान का घ्यावं?

आपण आपले फर्निचर न बदलता खोलीत थोडा बदल घडवून आणू इच्छित असल्यास, त्यास पुन्हा उलगडून नवीन करण्याचा प्रयत्न करा.आपले फर्निचर खरोखरच नवीन आणि उत्कृष्ट दिसण्यासाठी आपण भिन्न प्रकारचे रंग आणि नमुने वापरू शकता.

आधुनिक पद्धतीचे दिसण्यासाठी भूमितीय आकार असणारी, वांशिक (जुन्या) स्वरूपासाठी पारंपारिक नमुने किंवा रोमँटिक अनुभूतीसाठी फुलांचे आणि अधिक फिकट स्वरूप देऊन आपण खोलीचा संपूर्ण देखावा बदलू शकता.

5 Decor Hacks to Make Your Home Look Cool 3

आपल्या जुन्या फर्निचरचा पुन्हा नव्याने उपयोग करा

घरामध्ये आपण वापरत नाही अशी शिडी आहे? ती स्वच्छ करा,रंगवा आणि तिला चप्पल व बूट ठेवण्याच्या रॅक किंवा शेल्फमध्ये रुपांतरीत करा.

खराब स्थितीतील ड्रॉवर आहेत? त्यांना काढा आणि त्यांचा वापर घराच्या सभोवतालच्या अतिरिक्त संचयनासाठी करा.जास्त सामान साठवण्याकरिता त्यांना बेडच्या खाली ठेवा.

[widget_interior_form]

आपण वापरत नसलेली चीनि मातीच्या वस्तू आहेत,मग त्यांना फुलदाण्यांमध्ये किंवा भांडयामध्ये रुपांतरित करा.या वस्तूंचा पुन्हा असा उपयोग करून आपण आपल्या घरात थोडीशी हिरवळ तयार करता,आणि ह्या प्रकारे आपण कचरा कमी करण्यास देखील मदत कराल.

5 Decor Hacks to Make Your Home Look Cool

'बेड कॅनॉपी' बनवा

आपण कधी एक परीकथा वाचली असेल तर आपल्या लक्षात येईल की,राणी आणि राजकन्या यांच्याकडे नेहमीच छत असलेले चार-पोस्टर बेड असायचे.हा देखावा थोडा स्वप्नवत, क्लासिक आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडा अधिक एकांतही मिळतो.आपल्या बेडला चार-पोस्टर बेडमध्ये बदलणे महाग आणि अनावश्यक असू शकते परंतु तरीही आपण स्वत:साठी म्हणून थोडे थोडक्यात एक छत बनवू शकता. तो तयार करण्यासाठी आपण पडद्याच्या दांड्या आणि प्रवाहित पडदे वापरू शकता, किंवा भंगारामधील लाकडापासून एक फ्रेम तयार करुन ती आपल्या बेडवर स्थापित करू शकता.त्यानंतर सुंदर अशा काल्पनिक परिणाम तयार करण्यासाठी त्यावर काही सुंदर मलमली कापडाचा वापर करा.

5 Decor Hacks to Make Your Home Look Cool

'स्टेटमेंट पीस' वापरा

कधीकधी केवळ एक नवीन, स्टाईलिश आणि सर्जनशील वस्तू आपल्या संपूर्ण घराचा देखावा बदलण्यासाठीचा चमत्कार करू शकते.ती वस्तू म्हणजेच 'स्टेटमेंट पीस'.ती काहीही असू शकते,मग ती एखादी शिल्पकला किंवा चित्रकलेसारख्या कलेच्या तुकडा असू शकतो किंवा मग प्रकाशयोजनेसाठीचा अर्को दिवा किंवा एका भिंतीवर रंगीबेरंगी वॉलपेपर जोडून स्टेटमेंट वॉल देखील आपल्या घराचा देखावा आणि भावना बदलू शकतात,आणि नक्कीच ते थोडं वेगळंही होऊ शकेल.

5 Decor Hacks to Make Your Home Look Cool

आपले घराचे दिसणे बदलण्यासाठी अधिक मदतीची आवश्यकता आहे?आपण हा लेख तपासून पाहू शकता जो आपल्याला एखादे इंस्टाग्राम पात्र घर मिळविण्यात मदत करेल किंवा भाड्याचे घर कसे सजवायचे,आपल्या घरास अधिक घरगुती कसे बणवावे याबाबत मदत देईल.

अद्याप योग्य घराच्या शोधात आहात? नोब्रोकेर मदत करण्यासाठी आहेच, येथे क्लिक करा आणि वेळ न दवडता आपले स्वप्नवत घर शोधा.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in

8