You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Marathi ‘आरएमझेड इन्फिनिटी’ जवळ राहण्यासाठी सर्वोत्तम परिसर

'आरएमझेड इन्फिनिटी' जवळ राहण्यासाठी सर्वोत्तम परिसर

Published : April 15, 2020, 11:37 AM

Updated : July 12, 2024, 11:33 AM

Author : author_image admin

1029 views

Table of Contents

सीएमडी आणि व्हाइटफिल्ड यांच्यामध्ये सर्वोत्तम ठिकाणी असलेला,कॉर्पोरेट्सना अपवादात्मक व दर्जेदार अशी कार्यालयीन जागा उपलब्ध करुन देण्यासाठी, 2008 मध्ये 'आरएमझेड इन्फिनिटी',हा एक विशिष्ट प्रकल्प बांधलेला आहे. चांगल्या जीवनशैलीला आधार देण्यासाठी, खाडीच्या सभोवताल असंख्य सुविधा जसे की कॅफे, फूड कोर्ट व एटीएम, फाइन डायनिंग रेस्टॉरंट्स, सोयीस्कर स्टोअर, जिम, चलन विनिमय इत्यादी, अशा केंद्रात हे एक भव्य अंडाकृती संगोपन क्षेत्र आहे. चैतन्यशील वातावरण देण्यासाठी येथे बर्‍याच कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते.   टेक पार्कमध्ये काम करणार्‍या नोकरदारांसाठी, सकारात्मक व्हिज्युअल, अनुभवात्मक आणि मानसिक परिणाम लक्षात घेऊन हे डिझाइन केले गेले आहे. आरएमझेड कॉर्प, हे असे पर्यावरणीय जागतिक चिंतेचे पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ, व ग्रहण करणारे असे व्यवसाय पार्क तयार करण्यासाठी ओळखले जातात, आणि त्याचबरोबर व्यवसाय समुदायाच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.   येथे, 'आरएमझेड इन्फिनिटी'मध्ये काम करणार्‍या व्यावसायिकांच्या राहण्यासाठी योग्य असलेल्या परिसरांची यादी आहे-  
  • बनसवाडी: बनसवाडी शहराच्या ईशान्य दिशेला आहे. हे पुढे चिक्का बनसवाडी आणि दोड्डा बनसवाडी अशा दोन भागात विभागले गेले आहे. आरएमझेड इन्फिनिटीपासून सुमारे 2.3 कि.मी. अंतरावर, हे प्रामुख्याने निवासी क्षेत्र आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जवळ आहे. बाह्य रिंग रोड,ह्याला शहराच्या आयटी हबशी जोडतो.या परिसरात अलिकडच्या काळात बर्‍याच व्यावसायिक आणि बिझनेस संस्थांच्या दृष्टीने वेगवान सुधारणा झाली आहे. बनसवाडी येथे एक रेल्वे स्टेशनदेखील आहे. मारुती विद्यालय, पटेल पब्लिक स्कूल आणि न्यू बाल्डविन इंटरनॅशनल स्कूल सारख्या शाळा येथे आहेत.जनप्रिया हॉस्पिटल आणि पूजा थ्रीडी हॉस्पिटल अशी खाजगी रुग्णालये जवळच आहेत. या भागात सुपरमार्केट आणि किराणा दुकाने आहेत. बरीच मल्टी-क्युझिन रेस्टॉरंट्स देखील त्या भागात आढळतात. हे बंगलोरमधील सर्वात स्वस्त परिसरामधील एक आहे.
 
  • सी. व्ही. रमण नगर: सी.व्ही. रमण नगर हे शहराच्या पूर्वेकडील भागात आहे. आरएमझेड इन्फिनिटी क्षेत्रापासून 1.2 किमी अंतरावर आहे आणि बागमेन टेक पार्क परिसरापासून एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. याची सीमा इंदिरा नगर, काग्गादासपुरा आणि बैयप्पनहल्ली आहे. बंगळुरूचे प्रसिद्ध वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांच्या नावावरुन या भागाचे नाव ठेवण्यात आले आहे.केंद्रीय विद्यालय, ऑर्किड आंतरराष्ट्रीय शाळा, ग्लोबल सिटी आंतरराष्ट्रीय शाळा, ही या परिसरातील काही उत्तम शाळा आहेत. सर्वात जुना, बंगलोरमधील  मॉलपैकी एक, गोपालन मॉल देखील येथे वसलेला आहे. बरीच मल्टी स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालये येथे सहज उपलब्ध आहेत.क्षेत्रफळ खूप मोठे आहे आणि इथे सुपर मार्केट्स भरपूर आहेत. सीव्ही रमणमध्ये भाड्याने देण्यासाठी 2 बीएचके फ्लॅटची किंमत दरमहा रुपये 9000 ते 32000 दरम्यान असेल. हे एक विकसित निवासी परिसर आहे आणि कुटुंबांसाठी आदर्शवत आहे.
 
  • महादेवपुरा: महादेवपुरा हे उपनगर, बाह्य रिंग रोड आणि व्हाइटफिल्ड रोडशी चांगले जोडलेले आहे.हे कृष्णराजपुरम रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे. हे सर्वात जुन्या निवासी परिसरांपैकी एक आहे आणि म्हणूनच सेंट थेरेसा स्कूल, प्रगती स्कूल आणि कॅपिटल पब्लिक स्कूल सारख्या अग्रगण्य अशा शाळा येथे आहेत.फिनिक्स मार्केट सिटी, व्हीआर मॉल, सोल स्पेस अरेना इत्यादी असे काही उत्तम शॉपिंग मॉल्स महादेवपुरा जवळच आहेत. यात सुपरमार्केट, रुग्णालये आणि क्लिनिकची संख्याही चांगली आहे.आरएमझेड इन्फिनिटीपासून सुमारे 3 किमी,व बागमेन कॉन्स्टलेशन बिझिनेस पार्कपासून सुमारे 1.5 कि.मी. अंतरावर, आयटीपीएल आणि व्हाइटफील्ड, मराठअल्ली व बेलंदूर सारख्या इतर आयटी हबदेखील एकदम जवळ आहे.आपण कुटूंबासह राहण्याचा विचार करीत असल्यास घर शोधण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहेत. रुपये 10000 ते 45000 च्या श्रेणीत एखाद्याला त्यांच्या आवडीचे घर सहज मिळू शकेल. इतकेच नव्हे तर दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीसाठीही हा एक आदर्श परिसर आहे.
 
  • कस्तुरी नगर: कस्तुरी नगर ही बंगळुरूच्या पूर्वेकडे असणारी निवासी वसाहत आहे. बंगलोरमधील इतर भागांच्या तुलनेत रुंद रस्ते इथे आहेत. आरएमझेड इन्फिनिटीपासून अंदाजे 1.2 किमी अंतरावर हे आहे, इथे बाह्य रिंग रोडशी चांगली कनेक्टिव्हिटी देखील आहे. कुटुंबांसाठी आणि बॅचलर्स, दोन्हीसाठी हा परिसर राहण्यायोग्य, एक आदर्श आहे कारण ते परवडणारे आहे.कस्तुरी नगरातील 2 बीएचकेची किंमत दरमहा रुपये 10,000 ते 33,000 दरम्यान असेल. त्यात जवळपास काही चांगले दवाखाने आणि जवळील सुपर स्पेशालिटी रुग्णालये आहेत. प्रेसीडन्सी स्कूल, नर्चर मॉन्टेसरी, श्री चैतन्य टेक्नो स्कूल इत्यादी ह्या परिसराच्या आसपासच्या काही चांगल्या शाळा आहेत.यात 'नॉटि फीट प्ले स्कूल' सारख्या काही चांगल्या शाळा देखील आहेत. यामध्ये फिटनेस जागरूक आणि वृद्ध लोकांसाठी जिमची चांगली सुविधा, खेळाचे क्षेत्र आणि उद्याने देखील आहेत. बरीच चांगली रेस्टॉरंट्स देखील या भागात आहेत जे त्याला एक चांगले कौटुंबिक वातावरण देतात.
 
  • काग्गादासपुरा: आरएमझेड इन्फिनिटी पार्कपासून अंदाजे 2.3 किमी अंतरावर काग्गादासपुरा,एक छान निवासी परिसर आहे आणि तेथे अनेक अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहेत. टेक पार्क जवळ असण्याव्यतिरिक्त, ते इंदिरानगरहून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे, जो बंगळुरूमधील सर्वाधिक आवडता आणि वर्दळीचा परिसर आहे.डिफेन्स एव्हिओनिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (डी ए आर ई), सेंटर फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रिसर्च (सीएआयआर) आणि डीआरडीओ फेज 2 यासारख्या काही महत्त्वाच्या संशोधन संस्था, काग्गादासपुरामध्ये आहेत.या परिसरात ग्लोबल सिटी इंटरनॅशनल स्कूल, गीतांजली विद्यालय आणि शिष्य बीईएमएल यासह अनेक चांगल्या शाळा आहेत. अनेक मल्टी स्पेशालिटी रुग्णालये देखील या भागात आहेत.तसेच केआर पुरम रेल्वे स्थानकाशी ह्याचा सुलभ संपर्क आहे. हे बंगलोरमधील सर्वात जुन्या परिसरापैकी एक आहे आणि या परिसरात प्रौढांसाठी आणि मुलांसाठी असंख्य ग्रंथालये देखील आहेत.परिसरातील 2 बीएचकेची किंमत रुपये 9000 ते 30000 दरम्यान असेल. म्हणूनच,हा परिसर परवडणारा आणि कुटुंबांसाठी म्हणून एक चांगली निवड आहे.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in