You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Marathi ‘बागमेन कॉन्स्टलेशन बिझिनेस पार्क’जवळ राहण्यासाठीचे उत्तम ठिकाणे

'बागमेन कॉन्स्टलेशन बिझिनेस पार्क'जवळ राहण्यासाठीचे उत्तम ठिकाणे

Published : April 7, 2020, 6:34 PM

Updated : July 12, 2024, 10:26 AM

Author : author_image admin

1080 views

Table of Contents

पूर्वेकडील परिघीय बंगलोरस्थित - 'बागमेन कॉन्स्टलेशन बिझिनेस पार्क' हे शहर आयटी कॉरिडॉरच्या मध्यभागी,जवळजवळ 100 एकर क्षेत्राचा,महत्वाचा असा एक विशाल कार्यालयीन परिसर आहे.बागमेन समूहाचा असलेला हा प्रकल्प,42 एकर जागेत पसरलेल्या या पार्कमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा, आर्किटेक्चर आणि बऱ्याचशा सुख सुविधा आहेत.हे शहरातील एक प्रमुख नॉन-सेझ कार्यालयांपैकी एक आहे. यात गूगल, सॅमसंग, अमेझॉन आणि सेपिएंट सारख्या काही फार मोठ्या कंपन्यांचे ऑफिस कॉम्प्लेक्स आहेत.बैयप्पनहल्ली मेट्रो टर्मिनलपासून ते फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. 'बागमेन कॉन्स्टलेशन बिझिनेस पार्क'मध्ये ज्या लोकांचे कार्यस्थान,कंपन्या आहेत, त्यांच्याद्वारे राहण्यायोग्य विचारात घेता येणारी काही चांगली ठिकाणे:
  • महादेवपुरा: महादेवपुरा हे उपनगर, बाह्य रिंग रोड आणि व्हाइटफिल्ड रोडशी चांगले जोडलेले आहे.हे कृष्णराजपुरम रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे. हे सर्वात जुन्या निवासी परिसरांपैकी एक आहे आणि म्हणूनच सेंट थेरेसा स्कूल, प्रगती स्कूल आणि कॅपिटल पब्लिक स्कूल सारख्या अग्रगण्य अशा शाळा येथे आहेत.फिनिक्स मार्केट सिटी, व्हीआर मॉल, सोल स्पेस अरेना इत्यादी असे काही उत्तम शॉपिंग मॉल्स महादेवपुरा जवळच आहेत. यात सुपरमार्केट, रुग्णालये आणि क्लिनिकची संख्याही चांगली आहे.बागमेन कॉन्स्टलेशन बिझिनेस पार्कपासून सुमारे 1.5 कि.मी. अंतरावर, आयटीपीएल आणि व्हाइटफील्ड, मराठअल्ली व बेलंदूर सारख्या इतर आयटी हबदेखील एकदम जवळ आहे.आपण कुटूंबासह राहण्याचा विचार करीत असल्यास घर शोधण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहेत. रुपये 10000 ते 45000 च्या श्रेणीत एखाद्याला त्यांच्या आवडीचे घर सहज मिळू शकेल. इतकेच नव्हे तर दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीसाठीही हा एक आदर्श परिसर आहे.
 
  • ब्रूकफील्ड: बागमेन कॉन्स्टलेशन बिझिनेस पार्कजवळ सुमारे 2.2 कि.मी. अंतरावरच ब्रूकफिल्ड आहे, बंगळुरूच्या बाहेरील बाजूस अलीकडेच विकसित केलेल्या पॉश परिसरांपैकी हा एक आहे. हे प्रमुख आयटी पार्क्ससह चांगले जोडले गेले असल्यामुळे, हा परिसर त्याचा चांगला आनंद घेत आहे आणि म्हणूनच इथले भाडेही अगदी चढेच आहे.या भागातील 2 बीएचकेची किंमत रुपये 20000 ते 45000 दरम्यान कुठेही लागू शकेल. 1990 च्या उत्तरार्धापासून आणि विशेषत: 2002 आणि त्यानंतरच्या काळात येथील निवासी बांधकामात तेजी नोंदविली गेली आहे.प्रमुख चौपदरी रस्ता, वर्थूर रोड बंगळुरू शहराला ब्रूकफिल्डशी जोडतो. त्याचबरोबर बर्‍याच भागात शहराची विस्तृत बस कनेक्टिव्हिटी देखील आहे. शहरातील काही उत्तम शाळा जसे की रायन इंटरनॅशनल, कॅपस्टोन इंटरनेशनल आणि न्यू एज वर्ल्ड स्कूल ब्रूकफील्डच्या बाहेर आधारित आहे.ब्रूकफिल्ड हॉस्पिटल आणि अपोलो क्रॅडल ही परिसरातील काही सर्वोत्तम रूग्णालये आहेत. किराणा दुकाणांची येथे बरीच सुलभता आहे. अलिकडे या भागात बरीच रेस्टॉरंट्स, कॅफे आणि बार देखील आली आहेत.
 
  • मराठाहल्ली: बागमेन कॉन्स्टलेशन बिझिनेस पार्क पासून सुमारे 2.3 कि.मी. अंतरावर असलेल्या मराठाहल्लीचे नाव, बंगळुरूमधील एचएएल सुविधेत विकसित केलेल्या 'मारुत' लढाऊ विमानावरून ठेवले गेलेले नाव आहे. हे एक भरपूर वाढणारे आगामी क्षेत्र आहे आणि सर्वात परवडणारे क्षेत्र आहे.उदाहरणार्थ, मराठाहल्लीत 2 बीएचकेची किंमत रुपये 10000 ते 35000 इतकी असेल. यामध्ये मुबलक सुपरमार्केट्स आहेत ज्यात आपल्याला बरीच सुविधा उपलब्ध असेल.बर्‍याच शाळा, सुपरमार्केट आणि रुग्णालये असल्याकारणाने हे कुटुंबांसाठी एक आदर्श परिसर बनतो. रेनबो मुलांचे रूग्णालय,या बंगळुरू मधील रूग्णालयांच्या चांगल्या साखळींपैकी एक असलेल्या रुग्णालयाची शाखा देखील या भागात आहे.व्यवसाय उद्यानाजवळच असल्यामुळे तरुण पिढीचे बरेच पाऊल इकडे पडत आहेत,आणि त्यांना हे सहजपणे उपलब्ध असल्याने गेल्या दशकभरात बरीच चांगली पब आणि रेस्टॉरंट्स या परिसरामध्ये आले आहेत. हे कुटुंब आणि स्नातकांसाठी एक आदर्श परिसर आहे.ट्रॅफिकची जास्तीत जास्त धोकादायक परिस्थिती इथे आहे परंतु 3 ते 4 कि.मी. मध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी नाही.
 
  • काग्गादासपुरा: बागमेन कॉन्स्टलेशन बिझिनेस पार्कपासून अंदाजे 2.5 किमी अंतरावर काग्गादासपुरा,एक छान निवासी परिसर आहे आणि तेथे अनेक अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहेत. टेक पार्क जवळ असण्याव्यतिरिक्त, ते इंदिरानगरहून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे, जो बंगळुरूमधील सर्वाधिक आवडता आणि वर्दळीचा परिसर आहे.डिफेन्स एव्हिओनिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (डी ए आर ई), सेंटर फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रिसर्च (सीएआयआर) आणि डीआरडीओ फेज 2 यासारख्या काही महत्त्वाच्या संशोधन संस्था, काग्गादासपुरामध्ये आहेत.या परिसरात ग्लोबल सिटी इंटरनॅशनल स्कूल, गीतांजली विद्यालय आणि शिष्य बीईएमएल यासह अनेक चांगल्या शाळा आहेत. अनेक मल्टी स्पेशालिटी रुग्णालये देखील या भागात आहेत.तसेच केआर पुरम रेल्वे स्थानकाशी ह्याचा सुलभ संपर्क आहे. हे बंगलोरमधील सर्वात जुन्या परिसरापैकी एक आहे आणि या परिसरात प्रौढांसाठी आणि मुलांसाठी असंख्य ग्रंथालये देखील आहेत.परिसरातील 2 बीएचकेची किंमत रुपये 9000 ते 30000 दरम्यान असेल. म्हणूनच,हा परिसर परवडणारा आणि कुटुंबांसाठी म्हणून एक चांगली निवड आहे.
 
  • के आर पुरम: कृष्णराजपुरा, सामान्यतः के आर पुरम म्हणून ओळखले जाते, हे बंगलोरचे एक अतिपरिचित क्षेत्र आहे.हे बीबीएमपी क्षेत्रापैकी एक आहे. वेंगयाना तलाव या भागात एकदम मध्यभागी आहे. केआर पुरमच्या पूर्वेकडील हद्दीबाहेर मेदहल्ली जवळ, येले मल्लाप्पा शेट्टी तलाव हा शहरातील सर्वात मोठा तलाव आहे.काग्गादासपुरा प्रमाणेच के आर पुरम देखील बंगळुरूमधील सर्वात प्राचीन परिसर आहे. बागमेन कॉन्स्टलेशन बिझिनेस पार्कपासून के आर पुरम फक्त 3 कि.मी. अंतरावर आहे, बरीच शासकीय कार्यालये देखील या भागात आहेत.या क्षेत्रामध्ये मालमत्तेची स्थिती आणि मालमत्तेचे वय यावर अवलंबून,2 बीएचके चे भाडे रुपये 7000 ते 30000 इतके असेल. या परिसरा आसपास,अमारा ज्योती पब्लिक स्कूल आणि केंब्रिज स्कूल सारख्या चांगल्या शाळा आहेत.काही चांगले रुग्णालये देखील जवळच आहेत. परवडणारे भाडे व सुपरमार्केट्स आणि किराणा दुकानांनी युक्त असलेले सुसज्ज निवासी संकुल, तंत्रज्ञान उद्यानाजवळ राहू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी एक चांगले ठिकाण बनविते.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in