You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Marathi आपण घर खरेदी करताना,’वास्तु’ काही फरक करते? धक्कादायक उत्तर बघा

आपण घर खरेदी करताना,'वास्तु' काही फरक करते? धक्कादायक उत्तर बघा

Published : April 28, 2020, 12:46 PM

Updated : July 12, 2024, 11:55 AM

Author : author_image admin

1165 views

Table of Contents

वास्तु किंवा वास्तुशास्त्र म्हणजे अक्षरशः वास्तुकलेचे शास्त्र, ही एक पारंपारिक भारतीय वास्तुकलेची प्रणाली आहे आणि ती हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे.ह्याच उद्देश, वास्तुकलेचा आणि निसर्गाचा उत्तम संतुलन असणारं घर बांधायचे,हे आहे. हे केवळ वैयक्तिक घरांसाठीच चांगले नाही, परंतु एकूणच इमारतीसाठी देखील, वास्तू चांगली आहे.तसेच शहरे, बाग, रस्ते, वॉटरवर्क, दुकाने आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी देखील वास्तूशास्त्र लागू आहे,आणि चांगले आहे.   वास्तु विज्ञान आहे की संकल्पना? शतकानुशतके ही चर्चा चालत आली आहे, ती फक्त अंधश्रद्धा आहे की खरोखर त्यामागे काही विज्ञान आहे,याबद्दल नेहमीच युक्तिवाद चालू असतो. अनेकांचा असा विश्वास आहे की वास्तु आणि पर्यावरणामध्ये तार्किक संबंध नसल्यामुळे,ते छद्म विज्ञानाशिवाय काहीच नाही. बहुतेक वास्तुविशारद,वास्तु कडून शिकलेल्या काही गोष्टी बांधकाम करताना मार्गदर्शक तत्त्वे म्हणून वापरतात. कठोर नियमांऐवजी लवचिक मार्गदर्शक तत्त्वे म्हणून त्यांचा वापर केल्यास, जागा, सूर्यप्रकाश, घराचा प्रवाह आणि कार्य किंवा इमारत या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. Does Vastu Matter When You’re Buying A House   लोक अजूनही घराची ‘वास्तु’ बघतात? नोब्रोकरने 12546 प्रतिसादकर्त्यांसह विस्तृत सर्वेक्षण केले आहे, आणि आपल्याला उत्तर देण्यासाठी 7 दशलक्ष नोब्रोकर ग्राहकांच्या डेटाचा अभ्यास केला आहे. आणि ह्याचे उत्तर आहे, होय! आश्चर्यकारकरित्या, 73% खरेदीदार घर खरेदी करण्यापूर्वी घराची वास्तु पाहतील आणि केवळ 27% लोकांना, वास्तुचा फरक पडत नाही. घरामध्ये चांगले वास्तु खेळण्याचे महत्त्व गांभीर्याने घेतले गेले आहे, खरं तर गेल्या वर्षी (2018) घर खरेदी करताना वास्तुबद्दल फक्त 52% लोक काळजी करत होते. Does Vastu Matter When You’re Buying A House कोणती शहरे वास्तुला सर्वात जास्त महत्त्व देतात? घरांच्या वास्तूमध्ये, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू या दक्षिण भारतातील शहरांना खूप महत्त्व आहे. चेन्नईमध्ये 78% खरेदीदार वास्तुवर आधारित घरे निवडतात, हैदराबादमध्ये ते 77% खरेदीदार आहेत तर बंगळुरुमध्ये ते 76% खरेदीदार आहेत. मुंबई फार मागे नाही, इथे घर खरेदी करणाऱ्यांपैकी 70% लोक घर विकत घेण्यापूर्वी वास्तुचा शोध घेतात आणि पुण्यात वास्तुला महत्त्वपूर्ण मानणारे 65% लोक आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये घर खरेदी करण्यापूर्वी वास्तूचा विचार करणारे कमीतकमी लोक आहेत. येथे घर विकत घेण्यापूर्वी फक्त 38% लोक वास्तू पाहतात. Does Vastu Matter When You’re Buying A House   या मोठ्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी घरांच्या वास्तुकडे अधिक लक्ष देणे सुरू केले आहे. आपल्याला, वास्तू लक्षात घेऊन खास डिझाइन केलेली घरेसुद्धा मिळू शकतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, आपल्या घरात काही वास्तू दोष आढळले, तरीसुद्धा या समस्यांसाठी काही उपाय आहेत. आपण या वास्तू दोषांचे निराकरण कसे करावे, आणि येथे कोणती चिन्हे शोधायची,याविषयी आपण अधिक वाचू शकता. आपण एखादे घर शोधत असल्यास, नोब्रोकर वरील पर्याय शोधून पहा, आपले स्वप्नवत घर, वेगवान आणि कमी प्रयत्नांसह शोधण्यासाठी फिल्टर वापरा. आपल्याला घर शोधण्यापासून कर्ज मिळवण्यापर्यंत किंवा कायदेशीर कागदपत्रांची मदत मिळण्यापासून सर्वकाही,नोब्रोकर आपल्या प्रत्येक मार्गावर मदत करेल.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in