You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Marathi आपल्या घरासाठी सर्वोत्तम रंग निवडण्याचे पर्याय

आपल्या घरासाठी सर्वोत्तम रंग निवडण्याचे पर्याय

Updated : July 9, 2024

Author : author_image admin

1236 views

Table of Contents

घरासाठीचा रंग निवडण्याचा विचार धडकी भरवणारा आहे, कारण असे आहे की आपले घर रंगविणे हे एक महाग काम तर आहेच पण आपण निवडलेला रंग येण्याऱ्या बर्‍याच वर्षांपर्यंत आपल्या भिंतींवर राहील. आपण चुकीचा रंग निवडल्यास, आपण बर्‍याच दिवसांपर्यंत त्यात अडकले जाल. हे महत्वाचे आहे कि आपण आणि आपल्या परिवाराला निवडलेला रंग आवडेलच. आणि जेव्हा रंगांचा विषय येतो तेव्हा ते आपल्यावर भावनिक परिणाम करतात, ते आकर्षित करत असलेली ऊर्जा, खोल्यांमधील तपमान, खोली लहान किंवा मोठी दिसणे आणि आपल्या घराच्या संपूर्ण सौंदर्यात देखील याचा मोठा सहभाग असतो. परंतु, निराश होऊ नका, आपण आपल्या घरासाठी योग्य रंग कसे निवडू शकता यावरील काही टिपा येथे आहेत.   आपल्या फर्निचरवर आधारित रंग निवडा आपल्याकडे आधीपासूनच पूर्णपणे सेट केलेले घर असल्यास, प्रथम पेंटसाठीचा रंग निवडू नका. आपल्या घरातील फर्निचर पहा आणि त्याच्याशी जुळणार्‍या शेड्सचा विचार करा. आपल्याकडे पिवळा सोफा असल्यास,भिंतीसाठी लाल रंग निवडू नका, आपल्याला एक अशी शेड निवडावी लागेल जी सोफ्याला पूरक असेल, किंवा आपल्याला सोफा बदलावा लागेल. Fool Proof Ways to Choose the Best Paint Colours for Your Home   आपल्या पर्यायांवर संशोधन करा वेग वेगळ्या कल्पनांसाठी आर्किटेक्चर मासिके, पिंटरेस्ट किंवा इंस्टाग्रामवर जाणे चांगले आहे. प्रत्येक खोलीत भिन्न रंग कसा दिसतो हे आपल्याला कळेल,तसेच खोली उज्ज्वल करण्यात त्याचा किती सहभाग आहे, जागेचा भ्रम निर्माण करण्यास आणि घराच्या देखाव्यात एकूणच उठावदारपणा जोडण्यासाठी ते कसे मदत करतात,हे देखील कळेल. आपण आपल्या भिंतींसाठी राखाडीसारख्या रंगाचा कधीही विचार करू शकत नाही, परंतु पिंटरेस्ट आपल्याला हे दर्शवेल की राखाडी रंगाची छटा आपले घर आश्चर्यकारक कसे बनवू शकते. Fool Proof Ways to Choose the Best Paint Colours for Your Home   आपण काय हायलाइट करू इच्छिता ते निवडा आपल्या खोल्यांमध्ये,लोकांना आरामदायक अशी भावना निर्माण करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे, जर आपल्याकडे बटबटीत असे फर्निचर आणि भडकशा भिंती असतील,तर त्या दोघांमध्ये लोकांचे व आपले लक्ष वेधून घेण्याची स्पर्धा होईल आणि आपल्याला अस्वस्थ वाटेल. भिंतींवर लक्ष केंद्रित करावयाचे असेल तर हलक्या छटा असलेले फर्निचर ठेवा, जर तुम्हाला फर्निचरवर लक्ष केंद्रित करायचे असेल तर भिंतींसाठी हलका रंग निवडा, यामुळे तुमचे फर्निचर ठळकपणे दिसेल. Fool Proof Ways to Choose the Best Paint Colours for Your Home   एक थीम निवडा आपले घर कसे दिसावे अशी तुमची इच्छा आहे? येथे काही कल्पना दिल्या आहेत -
  • सूक्ष्म आणि सुखदायक - या रंगासाठी,एकाच रंगात रहा, एक रंगाची भावना प्राप्त करण्यासाठी शेड्स आणि रंगछटांचा भिन्नतेने वापर करा. उदाहरणार्थ, निळ्या रंगाच्या विविध छटा निवडा, हे सूक्ष्म आणि सुखदायक आहे.
  • मोहक देखावा: मोहक देखावा मिळविण्यासाठी, ट्रिमसाठी लाल टोनसह,बदामच्या भिंतींसारख्या हलक्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा वापरा.
  • व्हायब्रंट लुक: जर आपण उठावदार आणि अधिक उत्साही भावना शोधत असाल तर नारंगी आणि सोनेरी, लाल आणि गडद जांभळे रंग वापरून पहा.
Fool Proof Ways to Choose the Best Paint Colours for Your Home   प्रथम आपल्या रंगांची चाचणी घ्या आपल्या संपूर्ण भिंतीवर रंग देण्यापूर्वी बरेच व्यावसायिक चित्रकार आपल्या भिंतीवर रंग कसा दिसतो, हे तपासण्यासाठी आपल्याला सांगतील. ते आपल्या भिंतीवर ठिपके रंगवतील आणि आपल्या घरात तो रंग कसा दिसेल हे आपण पाहू शकता. हे महत्त्वपूर्ण आहे,कारण काही रंग ऑनलाइन किंवा शेड कार्डमध्ये वेगळे दिसतात आणि आपल्या भिंतींवर पूर्णपणे भिन्न दिसू शकतात. आपण करु शकता अशी आणखी एक चाचणी म्हणजे, शेड कार्ड मिळविणे आणि ते आपल्या फर्निचरच्या बरोबर ठेऊन बघणे, की ते एकत्र कसे दिसतात.   Fool Proof Ways to Choose the Best Paint Colours for Your Home   घरासाठी कोणता रंग निवडायचा हे ठरविण्यासाठी आपल्याकडे वेळ किंवा धैर्य नसेल, तर मग निवांत बसा आणि आराम करा. नोब्रोकरकडे पेंटिंग तज्ञ आहेत, जे आपल्या घरात चांगले दिसतील असे रंग सुचवू शकतात. आम्हाला येथे भेट द्या आणि आपल्या घरातील रंगाच्या आवश्यकतांसाठी आश्चर्यकारक अशी सवलत मिळवा.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in