You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Marathi स्मार्ट होम उपकरणे आपले पैसे कसे वाचवू शकतात?

स्मार्ट होम उपकरणे आपले पैसे कसे वाचवू शकतात?

Updated : May 11, 2020

Author : author_image admin

1220 views

Table of Contents

‘स्मार्ट होम’,हा असा एक गूढ शब्द आहे ज्याने बर्‍याच घरमालकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकप्रिय अमेझॉन इको किंवा गुगलच्या होम पॉडपासून, ते टी.वी सेट सारख्या अत्यावश्यक स्मार्ट होम उपकरणापर्यंत,लोक त्यांच्या घराचे स्वरूप तसेच वीज बिल कमी करण्यासाठी, या उपकरणांकडे उत्सुकतेने पहात आहेत. जागतिक पातळीवर, या छानशा स्मार्ट होम उपकरणांची बाजारपेठ 2021 पर्यंत,38.7% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो की हा दर 2016 मध्ये केवळ 8.2% इतका होता,ही मोठी उडी आहे. अशा मोठ्या प्रमाणात होणारी वाढ ही स्मार्ट होम उपकरणांची लोकप्रियता दर्शविते आणि तंत्रज्ञानामध्ये अधिक नावीन्य आणि प्रगती करण्याचा मार्ग तयार करते. बर्‍याच लोकप्रिय स्मार्ट होम उपकरणांमध्ये,स्मार्ट रेफ्रिजरेटर, स्मार्ट थर्मोस्टॅट्स, स्मार्ट एअर कंडिशनर्स आणि अगदी वाय-फाय राउटरचा समावेश आहे. ही स्मार्ट होम उपकरणे, आपण किंवा घरातील कोणीही स्मार्टफोन अ‍ॅपद्वारे दूरस्थपणे नियंत्रित करू शकता. अॅपवरून या उपकरणांचे नियंत्रण सक्षम करणे, हे सुनिश्चित करते की आपण हे कधीही आणि कोठूनही चालू आणि बंद करू शकता.यामुळे निश्चितच विजेचा वापर कमी होईल आणि त्यांचे मासिक बिले लक्षणीय प्रमाणात कमी होत असल्याचे पाहून,बरेच वापरकर्ते चकित झाले आहेत. ही उपकरणे महाग असतानाही ते तुमचे पैसे दीर्घकाळ वाचवू शकतात. तर, एक स्मार्ट निर्णय घ्या आणि आपल्या घरासाठी आजच आवश्यक स्मार्ट होम उपकरणे मिळवा! Smart Home Device   स्मार्ट थर्मोस्टॅट्स टॅबलेट किंवा स्मार्टफोन सारख्या आपल्या कोणत्याही इंटरनेट-कनेक्ट केलेल्या उपकरणाद्वारे, या स्मार्ट थर्मोस्टॅट्सवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. ही वायफायद्वारे ऑपरेट केली जात असल्याने आपणास त्यांच्यावर कोणत्याही दुर्गम ठिकाणाहूनही नियंत्रण ठेवता येऊ शकते. उदाहरणार्थ, आपण जर कुठे घराबाहेर गेले असाल आणि तापमान कमी करण्यास विसरल्यास, आपण ते आपल्या ऑफिसमधून करू शकता आणि घरातुनच ह्यात बदल करण्याची गरज नाही. आपल्या घरासाठी असलेली ही स्मार्ट उपकरणे, आपली जीवनशैली समजतात आणि त्यानुसार त्यांना बदलू किंवा समायोजित करतात. स्मार्ट थर्मोस्टॅट्स हे सुनिश्चित करू शकतात की उष्णता वाया जाणार नाही, आणि घरी कोणीही नसल्याचे समजल्यास ते तापमानात बदल करू शकतात. Smart Thermostats   स्मार्ट पंखे हे स्मार्ट पंखे, कोणत्याही स्मार्ट थर्मोस्टॅट्सप्रमाणेच कार्य करतात. इतर स्मार्ट उपकरणांप्रमाणेच हे पंखे, स्मार्टफोन-टॅब्लेट सारख्या इंटरनेट-सक्षम उपकरणांद्वारे ऑपरेट केले जाऊ शकतात. ते आपल्याला आपल्या मोबाइल उपकरणावरील अँपद्वारे,पंख्याचा वेग सुरु करणे, थांबविणे किंवा बदलण्याची परवानगी देते! Smart Ceiling fans   स्मार्ट लाइट बल्ब या स्मार्ट बल्बसाठी टाळ्या! स्मार्ट बल्ब हे 21 व्या शतकातील स्मार्ट जगाचे भविष्य आहेत. या स्मार्ट बल्बसह आपले विद्यमान बल्ब पुनर्स्थित करा,आणि आपण निश्चितपणे काही अतिरिक्त पैसे वाचवाल. एखादा चित्रपट पाहताना, आपल्याला आपल्या खोलीचा प्रकाश अंधुक करायचा असेल, तर तो स्मार्टफोनद्वारेच अॅपद्वारे करा, केवळ दिवे चालू किंवा बंद करण्यासाठी उठण्याची गरज नाही. आपल्या मुलगा, कमी प्रकाशाच्या खोलीत जाण्यापूर्वी घाबरेल,ह्याचीचिंता आहे? स्मार्ट बल्ब स्थापित करा, जेव्हा त्यांना कोणतीही हालचाल जाणवते तेव्हा जे चालू होते, किंवा अ‍ॅपमधून बेडरूममधील दिवे सरळ सुरु करतात! smart light bulb   स्मार्ट आउटलेट्स स्मार्ट उपकरणांकडे वळण्याआधी,एक छोटी सुरुवात करण्यासाठी, आपण स्मार्ट प्लग स्थापित करुन प्रारंभ करू शकता. हे प्लग आपल्याला आपल्या बेडसाईड दिवा, इस्त्री किंवा सॉकेटशी कनेक्ट केलेली कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नियंत्रित करण्यास मदत करतात, म्हणून जर आपण घाई घाईने आपले घर सोडले असेल,व आपण आपले 'हेयर स्ट्रेटनर' अनप्लग केला आहे की नाही हे आपल्या लक्षात नाही, काळजी करण्याची गरज नाही, फक्त आपल्या स्मार्टफोनवरून हे करा! Smart Outlets आपल्या घरासाठी ही सर्व स्मार्ट उपकरणे, आपल्या आयुष्यात अतिरिक्त आराम देण्यासाठी येथे आहेत आणि ते दीर्घकाळ आपले काही पैसे वाचवतात. आपण आपले घर स्मार्ट बनवू इच्छित असल्यास, आपण उपरोक्त-सूचीबद्ध उपकरणासह प्रारंभ करू शकता.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in