You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Marathi भारताचा पुढील मोठा क्रिकेट स्टार,रोहित शर्माच्या घराविषयी

भारताचा पुढील मोठा क्रिकेट स्टार,रोहित शर्माच्या घराविषयी

Published : April 21, 2020, 5:09 PM

Updated : August 14, 2020, 2:07 PM

Author : author_image admin

1221 views

Table of Contents

या माणसाला परिचयाची गरज नाही, जर तुम्हाला भारतीय क्रिकेट आवडत असेल तर तुम्हाला टीमचा हा “बिग हिटर” नक्कीच माहित असेल. त्याची बॅट त्याच्यासाठी बोलते आणि म्हणूनच त्याने हे स्थान मिळवले आहे - भारतीय क्रिकेट संघाचा उप-कर्णधार आणि मुंबई इंडियन्स आयपीएल संघाचा कर्णधार. तो एकमेव असा कर्णधार आहे ज्याने आपल्या कार्यकाळात तीन आयपीएल सामने जिंकले आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. असे म्हटले जाऊ शकते की तो असंख्य विक्रम धारक आहे आणि आज तो भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख स्तंभांपैकी एक आहे. जर दिवस त्याचा असेल तर, तो सर्व वैभवाने भारतासाठी विजय मिळवून देऊ शकेल. क्रिकेट मैदानावर रोहित शर्माच्या करिष्माबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच, खासकरून जर आपण क्रिकेट बफ असाल तर. म्हणूनच, जेव्हा या सेलिब्रिटी क्रिकेटरच्या पार्श्वभूमी आणि वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्याची वेळ येते, तेव्हा आपल्यातील बर्‍याच जण ही संधी गमावणार नाहीत, बरोबर? रोहित शर्माचे, रितिका सजदेहबरोबर लग्न झाले आहे आणि ते एक छोटी मुलगी, समीरा शर्माचे अभिमानी पालक आहेत. पण आज आपण त्याच्या क्रिकेट जीवनाबद्दल, त्याच्या लव्ह लाईफबद्दल किंवा पितृत्वाबद्दल बोलणार नाही आहोत. आज आपण रोहित शर्माच्या सुंदर घराबद्दल जाणून घेणार आहोत. चला या महान भारतीय क्रिकेटरच्या जीवनशैलीबद्दल अधिक जाणून घेऊयात. रोहित शर्मा कोठे राहतो? हा प्रश्न आपल्यातील अनेकांना उत्सुक करतो. तथापि, भारतीय क्रिकेट संघाच्या उप-कर्णधाराच्या निवासस्थानाची माहिती जाणून घेणे कुणालाही आवडेलच. रोहित शर्मा मुंबईतील एका उंचभृ, पॉश अपार्टमेंटमध्ये राहतो. या अपार्टमेंटची किंमत सुमारे रुपये 30 कोटी इतकी आहे. या अपार्टमेंटला आहुजा अपार्टमेंट असे म्हणतात आणि ते मुंबईतील वरळी येथे आहे. या इमारतीच्या 29 व्या मजल्यावर रोहित आपल्या कुटुंबासमवेत राहतो. Inside Rohit Sharma’s House, India’s Next Big Cricket Star आहुजा अपार्टमेंटस्, वरळी, मुंबई ह्यांच्याबद्दल हे अपार्टमेंट एक गगनचुंबी इमारत आहे, ज्यामधील दोन इमारतींमध्ये 53 मजले आहेत. ही भारतातील, 4थी सर्वात उंच अपार्टमेंट इमारत आहे आणि ती मुंबईतील 3 री सर्वात उंच इमारत आहे. सर्वच अपार्टमेंट्स, विलासी आणि प्रशस्त आहेत, बहुतेक अपार्टमेंट संपूर्ण मजल्यामध्ये पसरलेले आहेत. येथे एकूण 78 अपार्टमेंट आहेत,आणि प्रत्येक मजल्यामध्ये एकतर 4 बीएचके अपार्टमेंट किंवा 6 बीएचके चे पेंटहाउस आहेत. या इमारतीत सर्वात उल्लेखनीय काय आहे तर मजल्यापासून ते छतापर्यंतची,13 फूट उंची! हे घरास प्रशस्त जागेची अनुभूती देते आणि घरात भरपूर प्रकाश आणि ताजी हवा मिळवून देते. अहुजा अपार्टमेंट्स आणि रोहित शर्मा यांच्या घराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे,येथून आपण समुद्र आणि वांद्रे-वरळी सी लिंकचे नजारे पाहू शकता. रोहित शर्माच्या घराची सहल घ्या आहूजा अपार्टमेंटच्या 29 व्या मजल्यावर, आपल्याला रोहित शर्माचे घर सापडेल, 6000 चौरस फूट ह्या फ्लॅटची किंमत रुपये 30 कोटी आहे, हे 2015 मधील गोष्ट आहे. त्याची आताची पत्नी रितिका सजदेह हिच्याशी साखरपुडा झाल्यानंतर त्याने हा फ्लॅट खरेदी केला. रोहित आणि रितिकाचे,13 डिसेंबर 2015 रोजी लग्न झाले होते आणि त्यानंतर ते ह्या घरात गेले. तर रोहित शर्माने वरळीत घर का विकत घेतले? लोक त्यांच्यासाठी असलेल्या पायाभूत सुविधा, जीवनशैली व सोयीनुसार जागा निवडतात,आणि त्या परिसरातील राहणीमान देखील. लोक जास्तीत जास्त फायदे शोधतात - जसे की वाहतूक, बाजारपेठेची सान्निधता इ. रोहित शर्मा ह्याच्यासाठी हे स्थान त्याच्या जीवनशैलीसाठी योग्य आहे, त्याला खूप प्रवास करण्याची आवश्यकता असते आणि त्याचे घर सी लिंक पासून दोन मिनिटांच्याच अंतरावर असल्याने,त्याच्यासाठी हे एक आदर्श स्थान आहे. रोहित शर्माचा घराचा पत्ता काय आहे, याबद्दल आश्चर्यचकित आहात? गूगलवर एक जलद शोध घेतल्यास, आपल्याला सांगेल की आहुजा अपार्टमेंट चा पत्ता- अप्पा साहेब मराठे मार्ग, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मागे, वरळीकर चौक, राजा भाऊ अनंत देसाई मार्ग, सेंच्युरी बाजार, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र 400025 रोहित शर्माच्या घराच्या काना-कोपऱ्यांना एक्सप्लोर करताना रोहित शर्माचे घर तंत्रज्ञानाबद्दल किती प्रेमळ आहे हे सिद्ध करते, त्याच्या घरात बरेच काही आहे, आपण असे म्हणू शकता की ते एक “स्मार्ट घर” आहे. चला लिव्हिंग रूमपासून सुरुवात करूयात. लिव्हिंग रूममध्ये मजल्यापासून छताची उंची 13 फूट आहे, इतर सर्व अपार्टमेंटप्रमाणेच. या घरात एक बाल्कनी देखील आहे जी लिव्हिंग रूमला जोडलेली आहे,जी पाहुण्यांना आतून किंवा बाहेरून आश्चर्यकारक दृश्ये बघण्याची संधी देते. भव्यता आणि उच्च वर्गाचा स्पर्श जोडण्यासाठी या खोलीत एक भव्य पियानो आहे. बाल्कनीबद्दलचं सर्वात आश्चर्यकारक सत्य म्हणजे, ही जागा पूर्णपणे सागवान लाकडाने बनलेली आहे. मजल्यापासून भिंतीपर्यंत, लाकडी बाल्कनी कधीही घराची लाईमलाइट हिसकावते! पामर आणि टर्नर आर्किटेक्ट्स, सिंगापूर,ह्यांनी  बनविलेले, रोहित शर्माचे घर आपल्याला प्रत्येक वळणावर आश्चर्यचकित करेल. Inside Rohit Sharma’s House, India’s Next Big Cricket Star चला या भव्य अपार्टमेंटच्या बेडरूममध्ये जाऊया. रोहित शर्माच्या घरात तीन बेडरूम आहेत. एक मास्टर बेडरूम, एक मुलांचा बेडरूम आणि एक अतिथी बेडरूम. 4 थ्या बेडरूमचे, व्यवसाय / मीटिंग रूममध्ये रुपांतर करण्यात आले आहे. रोहित शर्मा आपल्या कामानिमित्त लोकांना इथे भेटतो आणि येथे त्याची व्यवसाय बैठक होते. त्याला त्याची गोपनीयता आवडते,आणि आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवण्यावर त्याचा भर आहे. या घरात सर्जनशील कामासाठी देखील एक कोपरा आहे, जो आश्चर्यकारकपणे सजविला गेला आहे.हा दिग्गज खेळाडू आपल्या विश्रांतीच्या वेळेस अभ्यास करण्यास प्राधान्य देत असल्याने, त्याच्या घरात एक खासगी लायब्ररी देखील बघण्यास मिळते. तो आणि त्याची बायको, आपला बराच वेळ वाचनात घालवतात. रोहित शर्मा आपल्या शैलीची तीव्र जाण असलेला, आणि उत्तम कपड्यांसाठी असलेल्या नजरेसाठी ओळखला जातो, म्हणूनच कदाचित तो अनेक कपड्यांचे ब्रँड देखील दर्शवितो. म्हणूनच सुपर स्टाइलिश रोहित शर्माच्या घरात वॉक-इन वॉर्डरोब आहे,त्यामुळे ह्यात काही आश्चर्य नाही. हे त्याच्या भव्य घराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे! आपण त्याच्या घरातील, पाण्याच्या भिंतीच्या प्रेमात पडण्याचीही अपेक्षा केली जाऊ शकते. हे खूपच छान दिसते व अव्दितीय असे दिसते आणि घरास एक नेत्रदीपक स्पर्श देते. हे सिद्ध करते की त्याचे घर खरोखर आधुनिक काळातील एक आर्किटेक्चरल चमत्कार आहे. Inside Rohit Sharma’s House, India’s Next Big Cricket Star जेव्हा गम्मत आणि मनोरंजन करण्याचा विषय येतो, तेव्हा त्याच्या घरात मनोरंजक असे मनोरंजन क्षेत्र आहे, जेथे तो आपल्या कुटुंबासमवेत दर्जेदार वेळ घालवतो. त्याच्याकडे एक चांगला साठा असलेले वाइन तळघर आहे, जे त्याच्या पारट्यांदरम्यान सर्वात लोकप्रिय आहे. या व्यतिरिक्त, एक योग करण्यासाठी जागा, कुटुंब आणि मित्रांसह चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी एक मिनी थिएटर, एक जकूझी, स्पा आणि बरेच काही आहे. घर स्मार्ट असल्याकारणाने,घराचे प्रत्येक कोपरा रिमोट कंट्रोल आणि स्विचद्वारे ऑपरेट केला जाऊ शकतो. या घराचे ऑटोमेशन अशा प्रकारे डिझाइन केले आहे की रोहित आणि त्याची पत्नी दोघेही रिमोट कंट्रोल किंवा स्विचद्वारे बर्‍याच गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतात. रोहित शर्माचे घर हे पृथ्वीवरील छोट्या स्वर्गासारखे आहे, आणि नक्कीच ते ह्या खेळाडू आणि त्याच्या कुटुंबासाठी लक्झरीचे प्रतीक आहे. रोहित शर्माचा प्रवास रोहित शर्मा,तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मलेला नाही. वारशाच्या माध्यमातून त्याला असं पॉश आयुष्य मिळालेलं नाही, परंतु त्याचे हे स्वप्न होते, त्याने आपले स्वप्न साकार करण्यासाठी सर्वकाही केले. या प्रवासात,स्वत: साठी, आपल्या कुटुंबासाठी आणि एकूणच आपल्या देशासाठी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्याने अनेक वर्षे कष्ट, परिश्रम, प्रयत्न आणि सराव केला. हे त्याचे समर्पण आणि परिश्रम आहे ज्यामुळे त्याने त्याचे स्वप्न साकार केले. Inside Rohit Sharma’s House, India’s Next Big Cricket Star बर्‍याच लोकांना मुंबई मध्ये, सर्वात पॉश अश्या भागात 30 कोटी रुपयांचे घर घेणे परवडणारे नाही, खासकरुन असे लोक ज्यांना क्रिकेट कोचिंगसाठी 50 रुपयेदेखील परवडत नाहीत! पण, रोहित शर्मा असा माणूस आहे ज्याने प्रतिकूल परिस्थितीत देखील विजय मिळवला आणि स्वत:चे नाव कमावले आणि बर्‍याच मोठ्या गोष्टी साध्य केल्या. आपण देखील आपल्या स्वप्नातील घर शोधत असाल, तर नोब्रोकरला भेट देण्याची वेळ आली आहे, आमच्याकडे आपल्या प्रत्येक बजेट आणि आवश्यकतेसाठी घरे आहेत. आपण भरपूर भाग्यवान असल्यास, कदाचित आपल्याला आहुजा अपार्टमेंटमध्ये फ्लॅट सापडेल आणि आपण रोहित शर्माचे शेजारी व्हाल! त्वरा करा, आजच तुमचा घराचा शोध सुरू करा.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in