हिवाळ्यातील तापमान घट,ही काहींसाठी आनंदाची असते.पण ज्यांना थंडी सहन होत नाही, त्यांच्यासाठी ती डोकेदुखी ठरू शकते. जर तुम्हीही थंडीचा तिरस्कार करत असाल, तर चला मग,घरातील काही गोष्टींचा बदल करूयात.
ह्या हिवाळ्यात आपलं घर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही खालील काही गोष्टी करू शकता.
1 ) सूर्याचा जास्तीत उपयोग करा
उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये दिवस लहान असतो. त्यामुळे सूर्य हा कमी वेळेसाठी बाहेर असतो. ह्याचा अर्थ, तुम्हाला सुर्याबरोबर थोडा वेळ मिळाला ,तर त्याचा मोठा फरक पडेल. घरांचे पडदे सरकून द्या आणि लख्ख सूर्यप्रकाश आतमध्ये येऊ द्या. यामुळे घर उबदार राहण्यास मदत होईल. सूर्यास्त होताच पडदे पुन्हा लावून घ्या,त्यामुळे आतील उबदार हवा बाहेर जाण्यापासून परावृत्त होईल.
2 ) योग्य प्रकारचे पडदे निवडा
उन्हाळ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी,आपल्या घरात हलकी आणि पातळ पडद्यांची गरज पडते .याउलट परिस्थिती हिवाळ्यामध्ये असते .हिवाळ्यातील गार वारे तुमच्या घराला थंड आणि असह्य बनवेल,त्यामुळे तुम्हाला जाड आणि वजन असलेल्या पडद्यांची गरज पडेल. हे पडदे विभाजनाचे / अडथळ्याचे काम करतील आणि थंड हवेला आतमध्ये येण्यापासून व घरातील उबदार हवेला बाहेर जाण्यापासून थांबवतील.
3 ) दरवाजे बंद करा
तुम्ही जर घरातील सर्व खोल्यांचे दरवाजे उघडे ठेवीत असाल, तर तुम्ही थंड हवेला घरात प्रसारित करत आहात.जास्त वापरात नसलेल्या खोल्यांचे दरवाजे जर बंद ठेवली तर ,घर थोडंसं उबदार ठेवण्यास मदत होते .कारण तुम्ही थंड हवेला घरात इकडून तिकडे प्रसारित होण्यापासून रोखाल.
4 ) योग्य कार्पेट/चादर करणे
घरातील 10% उबदार हवा तुम्ही गमावता जोवर आपण आपली फरशी/मजला इन्सुलेट करत नाहीत. घरातील फरशी/मजला थंडगार असल्या कारणाने, उबदार हवा ही तेथून गमावली जाते .हे घडण्यापासून रोखण्यासाठी घरात जिथे शक्य असेल तिथे कार्पेट/चादरी पसरून देणे ,आणि फरशी /मजल्याची उघडी जागा झाकून टाकणे योग्य ठरेल.
5 ) फिलामेंट असलेले दिवे वापरणे
मागील काही वर्षांपासून आपण फिलामेंट असलेली दिवे वापरणे बंद केलेले आहे.त्याऐवजी आपण घरात CFL आणि LED दिवे वापरतो.पण सत्यता हि आहे कि, फिलामेंट असलेले दिवे प्रकाशाबरोबरच घरात थोडीशी उबहि पुरवतात. जर तुम्ही घरातील दिवे बदलून, फिलामेंट असलेले दिवे लावलेत, तर घरातली उब वाढेल.
हे काही सोपे, स्वस्त आणि जलद उपाय आहेत जे तुमचं घर हिवाळ्यात उबदार ठेवण्यास मदत करतील. जर तुमच्याकडे ह्यापेक्षाही जास्त उपायकरक काही नवीन कल्पना असतील, तर आम्हाला जरूर कमेंट करा .जर तुम्ही थंडीचा तिरस्कार करत असाल आणि एखाद्या उबदार शहरामध्ये,एका उबदार घरात राहण्यास इच्छुक असाल,तर नोब्रोकर तुम्हाला असं परिपूर्ण घर शोधण्यास मदत करेल. जिथे तुम्ही कायम आनंदाने राहू शकाल.
Loved what you read? Share it with others!
admin,Author
NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage.
Following are service along with Rent / Sell / Buy of Properties
- Rental Agreement
- Packers And Movers
- Click And Earn
- Life Score
- Rent Receipts
- NoBroker for NRIs
Join the conversation!