You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Marathi लक्ष्मीविलास पॅलेस, वडोदरा

लक्ष्मीविलास पॅलेस, वडोदरा

Updated : May 18, 2020

Author : author_image admin

1021 views

Table of Contents

एके काळी बडोदा म्हणून ओळखले जाणारे, वडोदरा,हे जगातील सर्वात मोठ्या महालांपैकी एक इथे असल्याचा अभिमान बाळगतो! 'लक्ष्मीविलास पॅलेस' हा बकिंघम पॅलेसपेक्षा 4 पट मोठा आहे,आणि आतापर्यंतचा सर्वात मोठे असे बांधलेले खाजगी निवास, म्हणून ओळखला जातो. स्थापत्यकार मेजर चार्ल्स मॅंट यांनी ही भव्य रचना इंडो-सारासेनिक शैलीमध्ये बनविली होती. हे, हिंदू, मोगल आणि गॉथिक स्थापत्यकलेच्या शैलींकडून एक एक घटक घेतात, आणि आपण जेव्हा घुमट, मिनरेट्स आणि कमानी बघतो, विशेषतः तेव्हा हे स्पष्ट होते. हे सयाजीराव गायकवाड तिसरे,यांनी 1890 मध्ये बांधले होते आणि तेथे 170 पेक्षा अधिक खोल्या आहेत ज्या फक्त दोन लोकांना राहण्यासाठी बनविल्या गेल्या. त्याकाळी लिफ्ट असल्यामुळे,हा महाल खूप आधुनिक मानला जात असे! Laxmi Vilas Palace, Vadodara   असे म्हणतात की हा राजवाडा केवळ त्याच्या देखाव्यामुळेच एक चमत्कार नाही, तर ते एक आश्चर्य आहे, कारण तो अजूनही उभा आहे. आर्किटेक्ट, मेजर चार्ल्स यांना खात्री होती की ही इमारत कोसळणार आहे. इतका पैसा (जीबीपी 180000) खर्च करून आणि त्यावर इतका वेळ घालविल्यानंतर, ही इमारत निकामी होईल असा विचार त्याच्या मनास मान्यच होत नव्हता. महालाचे एकूण पूर्ण गणित पाहून तो इतका नाराज झाला कि त्याने,महालाचे काम पूर्ण होण्या अगोदरच आत्महत्या केली. हा महाल शक्य तितका सुबक,ऐश्वर्य संपन्न बनविण्यासाठी तयार करण्यात आला होता,त्यात जगातील कोणत्याही राजवाड्यात सापडणार नाहीत इतके, सर्वात जास्त डाग असलेल्या काचेचा वापर केलेला आहे! दरबार हॉल विशेषतः आश्चर्यकारक आहे, त्यात वेनेशियन मोज़ेक फ्लोअरिंग आणि बेल्जियमच्या डागलेल्या काचेच्या खिडक्या आहेत.त्याकाळी त्यांनी संपूर्ण भारत आणि जगभरातील साहित्य आणले व त्यापासून हे तयार केले. आग्रा येथील लाल वाळूचा खडक, राजस्थान आणि इटलीमधील संगमरवरी, पुण्यातील निळा दगड आणि इ. Laxmi Vilas Palace, Vadodara राजवाड्यातील सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 'क्लॉक टॉवर', हे 300 फूट उंचावर उभे आहे आणि लांब अंतरावरुन ते बघितले जाऊ शकते. त्याची घंटा इतकी जोरात होती की ती क्वचितच वाजवली गेली, रहिवाशांना हा त्रास वाटे. या महालाला 500 एकरची संरक्षक भिंत आहे,जी मुख्य इमारत व इतर इमारती आणि तज्ञ विल्यम गोल्ड्रिंग,लंडन यांनी लँडस्केप केलेले आणि डिझाइन केलेले एक सुंदरसा, समृद्ध असा बगीचा आहे. कंपाऊंडमध्ये आपल्याला खालील इमारती सापडतील -
  • एलव्हीपी मेजवानी आणि अधिवेशन कक्ष
  • मोती बाग पॅलेस
  • महाराजा फतेहसिंग संग्रहालय
  • मोती बाग क्रिकेट मैदान आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनची कार्यालये
  • एक दुर्मिळ इनडोर टीक फ्लोअर टेनिस कोर्ट आणि बॅडमिंटन कोर्ट
  • मगरी आणि बरेच काही असलेले एक लहान प्राणीसंग्रहालय.
राजमहालाचे काही भाग आणि मैदान अभ्यागतांसाठी खुले आहेत,जी एक चांगली बातमी आहे. हे आता बडोद्याच्या गायकवाड्यांचे रॉयल निवासस्थान आहे, त्यामुळे काही भाग अजूनही बघणाऱ्यांच्या मर्यादेबाहेर आहेत. आपण वडोदराला जात असल्यास येथे थांबायलाच पाहिजे. आपण आपल्यासाठी स्वतःचे एक ऐश्वर्य संपन्न घर शोधत असाल,तर आजच नोब्रोकरवर काही पर्याय पहा.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in