You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Home & Garden लीप वर्ष,सत्यता विरुद्ध कल्पना

लीप वर्ष,सत्यता विरुद्ध कल्पना

Updated : July 11, 2024

Author : author_image admin

1202 views

Table of Contents

आपल्या सर्वांना माहितच आहे की लीप वर्ष, चार वर्षांतून एकदाच होतात, परंतु या मूलभूत माहितीशिवाय या विशेष वर्ष आणि दिवसाबद्दल आपल्याला काय माहिती आहे?आपण लीप डे आणि लीप वर्षाच्या संदर्भातील काही तथ्ये आणि कल्पित कथा ह्याबद्दल उहापोह करणार आहोत. परंतु प्रथम, लीप वर्ष कशासाठी असतो आणि तो नेमकं काय आहे ते पाहूया. आपल्याला लीप वर्षाची गरज का आहे? संपूर्ण सूर्याभोवती फिरण्यासाठी, पृथ्वीला सुमारे 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे आणि 46 सेकंद लागतात.हे अतिरिक्त 5 तास,जे आपण दुर्लक्षित करू नाही शकत,हे मोजले जाणे आवश्यक आहे, म्हणून आपण हे सर्व जोडतो,त्याची बेरीज करतो आणि त्यामुळे 4 वर्षांत एकदा फेब्रुवारीमध्ये, 28 ऐवजी 29 दिवस येतात.हे ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये समायोजित करण्यासाठी केले जाते,जेणेकरून ते सौर कॅलेंडरशी जुळेल किंवा समक्रमित होईल.हे अशासाठी केले गेलेले आहे जेणेकरुन दर वर्षी वसंत ऋतु विषुववृत्त आणि शरद ऋतूतील विषुववृत्त सारख्या सौर घटना,नियमितपणे पाळल्या जातील.     कोणती वर्षे ही लीप वर्षे आहेत? लीप वर्ष हे सहसा असे कोणतेही वर्ष असते जेथे वर्षाचे शेवटचे दोन अंक चारने विभाज्य असतात, उदा. 2012, 2016, 2020, 2024 ई.तथापि, हे केवळ महत्त्वाचे वर्षच नाही तर महत्वाचे शतकदेखील आहे.लीप वर्षे जाणून घेण्यासाठी संपूर्ण शतक 400 ने विभाजित केले जाणे आवश्यक आहे. म्हणूनच 2000 आणि 2400 ही अशी शतके आहेत ज्यात लीप वर्षे असू शकतात, परंतु 2100 शतकामध्ये एकही लीप वर्ष नसणार. लीप वर्षाबाबतच्या कल्पित कथा फेब्रुवारीच्या अतिरिक्त दिवशी काय होते याबद्दल बर्‍याच देशांमध्ये भिन्न भिन्न मते आहेत, जसे की -
  • इंग्लंडमध्ये त्यांची बॅचलर डे किंवा सेडी हॉकिन्स डे नावाची परंपरा आहे, हा असा दिवस आहे जेव्हा स्त्रिया पुरुषांप्रमाणे वागू शकतात आणि पुरुषाशी लग्न करण्याचा प्रस्ताव देऊ शकतात (जेकी पारंपारिकरित्या पुरुषाचे कार्य आहे). याची सुरुवात 1700 च्या दशकात झाली आणि आताही चालू आहे.
  • एक जुनी आयरिश आख्यायिका आहे की सेंट ब्रिगीडने,सेंट पॅट्रिकबरोबर स्त्रियांना पुरुषांकडे प्रपोज करण्याची परवानगी देण्यासाठी एक करार केला होता आणि पुरुष त्यांना या दिवशी नकार देऊ शकत नाहीत.
  • डेन्मार्कमध्ये, जर एखाद्या पुरुषाने स्त्रीचा लीप वर्षाचा प्रस्ताव स्वीकारला नसेल तर त्याने तिला एक डझन जोड्या,मोजे द्यावेत असे आहे. आणि फिनलँडमध्ये, स्त्रीचा प्रस्ताव नाकारण्याचा दंड म्हणजे त्या पुरुषाने तिला स्कर्ट बनवण्यासाठी पुरेशी फॅब्रिकची भेट देणे आवश्यक आहे.
Leap Year Fact Vs. Fiction  
  • स्कॉटिश आणि भारतीयांचा असा विश्वास आहे की 29 फेब्रुवारी रोजी जन्म घेणे अत्यंत दुर्दैवी आहे.स्कॉटिश लोक असेही म्हणतात की या दिवशी जन्मलेल्यांना भरपूर संघर्ष आणि त्रास सहन करावा लागतो.त्यांची जुनी म्हण आहे की “लीप वर्ष हे चांगले मेंढरे वर्ष होते.”
  • काही ज्योतिषींचा असा विश्वास आहे की 29 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या लोकांकडे असामान्य प्रतिभा असते.ग्रीक लोकांचा असा विश्वास आहे की लीप वर्षात लग्न करणे हे दुर्दैव आहे,त्यामुळे ते शक्य तितके टाळण्याचा प्रयत्न करतात.लीप वर्षात घटस्फोट घेतलेल्या जोडप्यांना पुन्हा कधीही आनंद किंवा प्रेम मिळणार नाही, असाही त्यांचा एक विश्वास आहे.
  • रशियामध्ये, लीप वर्षात विलक्षण किंवा असामान्य हवामान पद्धती आणि मृत्यूचा धोका जास्त असतो असे मानले जाते.
काही लोकसाहित्यानुसार,शेतकरी म्हणतात की लीप वर्षात लागवड केलेले बीन्स आणि मटार "चुकीच्या मार्गाने वाढतात". लीप वर्षाबाबतचे तथ्य लीप वर्षाला,इंटरकॅलरी वर्ष किंवा बायसेक्सटाईल वर्ष असेही म्हणतात.असे म्हटले जाते की, रोमन सम्राट सीझर ऑगस्टस ह्यानेच फेब्रुवारी सर्वात कमी दिवसांचा महिना बनवला.यापूर्वी, ज्युलियन कॅलेंडरमध्ये, इतर सर्व महिन्यांमध्ये 30 किंवा 31 दिवस होते, परंतु ऑगस्टमध्ये फक्त 29 दिवस होते म्हणून सीझर ऑगस्टस नाखूष होता, म्हणून त्याने 'त्याच्या महिन्याला' दोन अतिरिक्त दिवस देण्याचे ठरविले,आणि म्हणून फेब्रुवारीने त्यांचे दिवस गमावले. जर आपण चिनी दिनदर्शिका पाहिली,तर त्यात लीपचा दिवस नसतो, परंतु त्यात संपूर्ण लीप महिना असतो!दर तीन वर्षांनी चिनी दिनदर्शिकेत हे दिवस जोडले जातात आणि त्यामुळे चीनी दिनदर्शिकेत लीप महिन्याचे स्थान दरवर्षी बदलते. 2014 हे चीनी दिनदर्शिकेतील शेवटचे लीप वर्ष होते आणि हे वर्ष दुसरे वर्ष होते. Leap Year Fact Vs. Fiction   इथिओपियन कॅलेंडरमध्ये, फेब्रुवारीऐवजी शेवटच्या महिन्यात एक अतिरिक्त दिवस जोडला जातो, हे देखील 4 वर्षांतून एकदा केले जाते. 29 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या लोकांना “लीपलिंग्ज” किंवा “लीपर्स” असे म्हणतात. 29 फेब्रुवारी रोजी जन्माला येण्याची शक्यता 1461 लोकांमध्ये 1 आहे, परंतु आपण लीपच्या दिवशी जन्मणार आणि मरणार याची कल्पना करू शकता?वर्ल्ड हेरिटेज ज्ञानकोशानुसार, जेम्स मिलने विल्सन नावाच्या ब्रिटिश माणसाचा जन्म लिपच्या दिवशी झाला आणि लीपच्या दिवशीच तो मरण पावला.त्याचा जन्म 29 फेब्रुवारी 1812 रोजी झाला आणि 29 फेब्रुवारी 1880 मध्ये त्याचा मृत्यू झाला. एक खास लीप डे कॉकटेल आहे, ती लंडनच्या सव्हॉय हॉटेलमध्ये 1928 मध्ये तयार केली गेली होती आणि ती अशा प्रकारे बनवली जाते - लिंबाचा रस 1 डॅश 2/3 जिन 1/6 ग्रँड मर्निअर 1/6 गोड व्हर्माउथ Leap Year Fact Vs. Fiction नॉर्वेमध्ये, करिन हेनरिकसेन नावाच्या महिलेने तीन मुलांना सलग वेग वेगळ्या वर्षी लीपच्या दिवशीच जन्म दिला. तिची पहिली मुलगी 29 फेब्रुवारी 1960 रोजी, नंतर 29 फेब्रुवारी 1964 रोजी एक मुलगा आणि 29 फेब्रुवारी 1968 रोजी तिचा शेवटचा मुलगा जन्मला. 'ऑनर सोसायटी ऑफ लीप ईयर डे बेबीज' नावाचा एक क्लब आहे.हे केवळ 29 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या लोकांसाठी आहे.क्लबचे जगभरात 11000 हून अधिक सदस्य आहेत आणि लीप डे जागरूकता वाढविणे, लीप डे बाळांना संपर्कात ठेवणे आणि त्या सर्वांशी संपर्क साधणे हे त्यांचे उद्दीष्ट आहे. आपण 29 फेब्रुवारी रोजी विनामूल्य काम करत आहात कारण असे आहे की आपण एक अतिरिक्त दिवस काम करता, परंतु त्याचे कोणतेही अतिरिक्त वेतन तुम्हाला मिळत नाही.29 फेब्रुवारीला सुट्टी जाहीर करावी यासाठी कोर्टात याचिका दाखल आहेत. अँटनी, टेक्सास आणि अँटनी, न्यू मेक्सिको ही जुळी शहरे स्वत: ला जगाची लीप वर्ष कॅपिटल मानतात.त्यांच्याकडे सर्व लीप बाळांच्या वाढदिवसाची मोठी मेजवानी असते आणि हा चार दिवसांचा उत्सव एक अनोख्या प्रकारचा आहे. दुर्मिळ मासिका,ज्याला 'ला बोगी डु सॅप्योर' म्हणतात, हे एक फ्रेंच मासिक आहे, हे एक विडंबन वृत्तपत्र आहे जे 4 वर्षांतून एकदाच प्रकाशित केले जाते! हे लीप वर्ष आपल्यासाठी भाग्यवान असेल कि नाही,प्रश्न पडलाय?नवीन घर खरेदी करण्यासाठी आणि तेथे जाण्यासाठी सर्वात शुभ दिवस तपासा.जेव्हा आपल्याला आपल्यासाठी घराची आवश्यकता असेल, तेव्हा आपल्या निर्णयास उशीर करु नका, नोब्रोकरला आपल्यासाठी सर्वोत्तम घर शोधण्यात मदत करू द्या.

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in