Table of Contents
Quality Service Guarantee Or Painting Free
Get a rental agreement with doorstep delivery
Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!
5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!
Loved what you read? Share it with others!
Submit the Form to Unlock the Best Deals Today
Help us assist you better
Check Your Eligibility Instantly
Experience The NoBrokerHood Difference!
Set up a demo for the entire community
लहान घरांमधील जागेचे व्यवस्थापन करण्यासाठी 5 टिप्स
Table of Contents
लहान घरांमधील जागेचे व्यवस्थापन करण्यासाठी 5 टिप्स
छोट्या घरात राहणे आव्हानात्मक तसेच गोंधळलेले कार्य असू शकते.एकतर आपल्या जवळ बरेच सामान,बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या एवढ्या कमी जागेत साठवून ठेवायच्या, अशा स्थितीत आपण काय करू शकता?कमी जागा,त्याच्या पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी बऱ्याच सर्जनशील विचारांची आवश्यकता असते. अगदी लहान घरातही, गोष्टींचे योग्य नियोजन केले तर, आपल्याला साठवणूक करण्यासाठी मोकळ्या जागेची कमी भासणार नाही.आपण अगदी लहान घर असेल तरीही सामान साठवण्याचं नियोजन करू शकता, असे काही मार्ग खाली दिलेले आहेत,ते करा आणि आयुष्य गोंधळमुक्त करा. 1 ) घरातील गोंधळ/पसारा कमी करा पहिली गोष्ट ज्यापासून आपण सुरुवात करायला हवी, ती म्हणजे घरातील गोंधळ कमी करणे.जेव्हा आपण घर मोकळं करण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला जाणवते की, तुम्ही जतन केलेल्या बऱ्याच गोष्टी निरुपयोगी किंवा जुन्या आहेत.म्हणून, जास्तीत जास्त जागा वापरण्यासाठी, आपण हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, आपण आपले घर भंगाराने भरून तर टाकत नाही ना. भविष्यात कधीतरी उपयोगी येतील, अशा वस्तूंचा संग्रह करत बसू नका. पसारा कमी केल्याने फक्त जागेचा सुयोग्य उपयोगच होत नाही ,तर आपले मनही शांत राहते. 2 ) कपाटांचा जास्तीत जास्त वापर करा घरात जास्तीत जास्त कपाट असणे ही एक चांगली गोष्ट आहे ,पण जर तुमच्याकडे कमी कपाट असतील तर चिंतेची काही बाब नाही.सामान नेहमी व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी आपण स्वयंपाकघर आणि इतर ठिकाणी रॅक लावू शकता. उघड्यावर ठेवलेल्या सामानामुळे घर एकदम गलीच्छ दिसतं,परंतु एकत्रितपणे शेल्फ/रॅकमध्ये ठेवल्याने, आपण आपल्या लहान जागेची सुंदरता देखील वाढवू शकतो.पुस्तके, स्वयंपाकघरातील भांडे, दैनंदिन वापराच्या वस्तू ई.गोष्टी संग्रहितपणे ठेवण्यासाठी शेल्फ/रॅक खरेदी करा.हे आपल्या घरास स्वच्छ आणि सुव्यवस्थित दिसण्यास मदत करेल. 3 ) जेवढे शक्य आहे तेवढे भिंतीवर लावा कपाटे सोडून,आपण भिंतींचाही उपयोग सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी करू शकतो.गोष्टी भिंतीवर चढवून, आपण मोठ्या रॅक आणि स्टँडद्वारे ,उरलेल्या अतिरिक्त जागेचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकता. उदाहरणार्थ,टीव्ही कॅबिनेटमध्ये ठेवण्याऐवजी त्याला नेहमी भिंतीवर लावा,कारण या जड कॅबिनेटमुळे जास्त जागा व्यापली जाते. घरामध्ये,खाली ठेवता येतील अशा शेल्फ ऐवजी ,असे शेल्फ खरेदी करा की जे भिंतीवर लावता येतील, यामुळे तुम्हाला दुपटीने मोकळी जागा मिळेल आणि घर प्रशस्त वाटेल.स्वयंपाकघर आणि शयनगृहामध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी आपण हुक आणि भिन्न प्रकारचे हॅंगर वापरू शकता.हे आपल्याला कपाट आणि शेल्फमध्ये अधिक जागा उपलब्ध करून देतील. 4 ) योग्य फर्निचर खरेदी करा [caption id="attachment_3773" align="aligncenter" width="1000"] folding table[/caption] घरामध्ये योग्य पद्धतीचे फर्निचर निवडणे महत्त्वाचं आहे ,कारण यामुळे तुम्ही प्रभावीपणे जागेचे नियोजन करू शकता.जास्त जागा घेणारं,मोठं,असं फर्निचर आणि कॅबिनेट्स खरेदी करण्यावर ,बरेच पैसे खर्च करण्याचा सल्ला देणे उचित ठरणार नाही.बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घडी करण्यायोग्य फर्निचर उपलब्ध आहेत, जे तुमच्यासाठी तारणहार म्हणून कार्य करू शकतात.बहुउद्देशीय फर्निचरच्या वापरामुळे तुम्हाला कधीही जागेची कमी भासणार नाही, आणि आपल्या घरात आपल्याला पाहिजे असलेली सर्व चैन मिळवता येईल. 5 ) घरात अधिक प्रकाश येऊ द्या जागेच्या योग्य नियोजनाबरोबरच, तुम्हाला याचीही खात्री करावी लागते की, तुमचं घर गुहेसारखे दिसायला नकोय.त्यासाठी तुम्हाला घरामध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येऊ द्यावा लागेल ,ज्यानेकी घर प्रशस्त वाटेल.खिडक्या आणि हवेचे योग्य नियोजन नसलेलं अंधारमय घर,गोंधळलेलं आणि जास्त लहान वाटते. या सर्व सोप्या युक्त्यांबरोबरच, तुमच्या घरातील लहान जागेचे नियोजन करण्यासाठी ,तुम्हाला थोडा वेळ आणि प्रयत्नांची गरज आहे . यातील काही कल्पना तुम्हाला थोडा खर्च करायला लावतील,जसेकी योग्य फर्निचर घेण्यासाठी, पण नक्कीच हे तुमच्या दैनंदिन जीवनात मदतीचं राहील. आणि तरीही तुम्हाला तुमच्या जागेची चिंता सतावत असेल, तर मग,नोब्रोकरच्या तज्ञांना तुमच्यासाठी, तुमच्या गरजा पूर्ण करणारे घर शोधूद्या.Loved what you read? Share it with others!
Most Viewed Articles
Architecture of Traditional Houses in Pune
October 25, 2018
5284+ views
Buying Land Vs Buying an Apartment In 2025
January 31, 2025
5226+ views
The Complete Guide to Renting a Home in India
January 31, 2025
4585+ views
Decorate Your Rental Home: 5 Easy And Cost-effective Ways
January 31, 2025
3706+ views
Family Vs. Bachelor Who Makes a Better Tenant?
January 31, 2025
3617+ views
Recent blogs in
The Complete Guide to Renting a Home in India
January 31, 2025 by NoBroker.com
Family Vs. Bachelor Who Makes a Better Tenant?
January 31, 2025 by NoBroker.com
Home Maintenance Tips: Top 5 Important and Easy Way
January 31, 2025 by NoBroker.com
How To Survive Landlord Inspections
January 31, 2025 by NoBroker.com
Buying Land Vs Buying an Apartment In 2025
January 31, 2025 by Vivek Mishra
Join the conversation!