You're all set!

Get ready for regular updates and more.

Table of Contents

Quality Service Guarantee Or Painting Free

Unbeatable Price 5-Star Rated Partner! 2200+ Shades! Top Quality Paint Free Cancellation!

Get a rental agreement with doorstep delivery

Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!

5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!

Loved what you read? Share it with others!

thumbnail

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home Blog Marathi 2024 मध्ये जगातील पहिले 7 सर्वात महाग घरे

2024 मध्ये जगातील पहिले 7 सर्वात महाग घरे

Updated : February 2, 2023

Author : author_image admin

1155 views

Table of Contents

जबरदस्त आकर्षक घर म्हणजे कायमची अशी, संपत्तीचा खजिनाच असतो, विशेषत: जर ते सुंदर लाखो डॉलर्स किंमतीचे असेल. जगभरातील काही महागडी घरे केवळ त्यांच्या देखाव्यामुळेच नव्हे, तर आलिशान सोयीसुविधा, अंतर्गत जागा आणि घराच्या स्थानामुळे देखील खूप प्रभावी आहेत. जगातील सर्वात महागड्या घरांची यादी येथे आहे,जिथे राहणे हे प्रत्येकाचं स्वप्न आहे.   1.बकिंघम पॅलेस - 2.9 अब्ज डॉलर्स लंडनच्या वेस्टमिन्स्टर शहरात हे आहे, जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये, शीर्ष असे स्थान हे बकिंघम पॅलेसचे आहे. या राजवाड्यावर ब्रिटिश रॉयल कुटुंबाचा ताबा आहे, आणि 1837 पासून ते ब्रिटनच्या राजाचे लंडनमधील अधिकृत निवासस्थान म्हणून काम करत आहे,आणि आता हे राज्याचे अधिकृत मुख्यालयही आहे. या राजवाड्यामध्ये 775 बेडरूम, 78 बाथरूम, 52 रॉयल आणि गेस्ट रूम, 92 कार्यालये आणि 19 स्टेटरूम्स आहेत. क्षेत्राच्या दृष्टीने, हा राजवाडा अंदाजे 828000 चौरस फूट आहे, आणि एकटी बागच 40 एकरची आहे. हा राजवाडा कधी विक्रीसाठी गेला तर त्याची किंमत अंदाजे 2.9 अब्ज डॉलर्स आहे. अज्ञात वस्तुस्थिती: राजवाड्याच्या पृष्ठभागा खाली काही गुप्त बोगद्या कार्यरत आहेत, ज्या राजवाड्याला जवळच्या रस्त्यांशी जोडतात. Buckingham Palace   2.अँटिलिया - 1 अब्ज डॉलर्स मुंबईतील अँटिलीया हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात माहागडे घर आहे. हे घर मुकेश अंबानी,जे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत,त्यांच्यासाठी तयार केले गेले होते. मुकेश अंबानी हे फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. हे घर,शिकागो आधारित ‘पर्किन्स अँड विल’ नावाच्या आर्किटेक्चर फर्म आणि हॉस्पिटॅलिटी डिझाईन फर्म, ‘हर्श बेंडर असोसिएट्स’ यांनी बनवले आणि डिझाइन केले आहे.400000 चौरस फूट क्षेत्र असलेले हे घर,मुंबईच्या कुंबल्ला हिल शेजारमध्ये असून, 27 मजले उंच आहे. ही इमारत भूकंप प्रतिरोधक आहे,जी रिश्टर स्केलवरील 8 तीव्रतेच्या भूकंपाचा प्रतिकार करू शकते. अँटिलियाचे सहा मजले हे मालक आणि अतिथी ह्यांच्या कार पार्किंगसाठी समर्पित आहेत. यामध्ये हेल्थ स्पा, एक आईस्क्रीम रूम, एक मंदिर, 50-आसनी चित्रपटगृह, एक सलून, तीन हेलिपॅड आणि एक बॉलरूम आहे. भव्य अशा या हवेलीमध्ये 600+ हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. अज्ञात वस्तुस्थिती: उष्णतेचा सामना करण्यासाठी इमारतीत बर्फ़ाची खोली आहे. Antilia   3.व्हिला लिओपोल्डा - 750 दशलक्ष डॉलर्स व्हिला लिओपोल्डा हे जगातील तिसरे सर्वात महागडे घर आहे. व्हिला हा कोटे डेझूर प्रदेशाच्या फ्रान्सिस आल्प्स-मेरीटाइम विभागात आहे. हा व्हिला एका विधवेच्या मालकीचा आहे, लेबनिस ब्राझिलियन बँकर, एडमंड सफ्रा यांची पत्नी लिली सफ्रा. हे नाव बेल्जियमचा असलेला ह्या व्हिलाचा मूळ मालक, किंग लिओपोल्ड द्वितीय पासून पडलं गेलय, आणि 1920 च्या दशकात अमेरिकन आर्किटेक्ट ओगडेन कोडमन ज्युनियर यांनी ह्याला पुन्हा डिझाइन केले. व्हिला जवळजवळ 50 एकरात पसरलेला आहे,ह्यामध्ये 11 बेडरूम, 14 बाथरूम, हेलीपॅड, व्यावसायिक ग्रीनहाऊस, मैदानी स्वयंपाकघर आणि 12 जलतरण तलाव आहेत.अल्फ्रेड हिचकॉकचा 1955 चा 'टू कॅच अ थिफ' हा  चित्रपट, व्हिला लिओपोल्डा येथे चित्रित झाला होता, ज्यामुले तो एक लोकप्रिय व्हिला बनला. Villa Leopolda   4.व्हिला लेस कॅड्रेस - 450 दशलक्ष डॉलर्स फ्रान्समधील सेंट-जीन-कॅप-फेराटमध्ये, व्हिला लेस कॅड्रेस,हे जगातील चौथे सर्वात महागडे घर आहे. हे 1830 मध्ये बांधले गेले होते. हे बेल्जियमच्या राजा लिओपोल्ड II यांनी 1904 मध्ये विकत घेतले होते. सुमारे 35 एकर बागांमध्ये हा व्हिला स्थापन करण्यात आला आहे. हा सुमारे 18000 चौरस फूट आहे आणि त्यात 14 बेडरूम, एक ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आणि 30 घोड्यांना सामावून घेता येईल असा एक मोठा तबेला आहे. व्हिलाच्या आतील बाजूस क्रिस्टल झूमर,19 व्या शतकातील ऑईल पेंटिंग्ज आणि सुमारे 3000 पुस्तके असलेलं ग्रंथालय आहे. Villa Les Cèdres   5.लेस पॅलाइस बुल्स - 390 दशलक्ष डॉलर्स "बबल पॅलेस" म्हणून ओळखले जाणारे, लेस पॅलाइस बुल्स,हंगेरीयन आर्किटेक्ट, अँटी लोवाग यांनी डिझाइन केले होते आणि हे 1975-1989 च्या सुमारास बांधले गेले होते. त्याचे टोपणनाव, हे मेडिटरेनिअण समुद्राच्या बाहेर गोलाकार दिसणार्‍या खोल्यांच्या मालिकेपासून पडले. सध्या, बबल पॅलेसची मालकी इटालियन वंशाच्या फ्रेंच फॅशन डिझायनर, पियरे कार्डिन यांच्याकडे आहे. या मालमत्तेत 3 जलतरण तलाव, अनेक गार्डन्स आणि डोंगराच्या भागात 500 आसनींचे अ‍ॅम्फीथिएटर आहे. हे ठिकाण विशेषतः पियरेसाठी सुट्टीचे घर आहे, त्याशिवाय पार्टी आणि कार्यक्रमांसाठी एक भव्य ठिकाण आहे. हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. Les Palais Bulles   6.ओडियन टॉवर पेंटहाउस - 330 दशलक्ष      डॉलर्स  330 दशलक्ष डॉलर्स इतके मूल्यांकित असलेले ओडियन टॉवर पेंटहाउस,जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. हे आर्किटेक्ट अलेक्झांड्रे गिराल्डी यांनी डिझाइन केले आणि ग्रुप मझोकोको यांनी बनवले होते. हे अनेक मजल्यांमध्ये विखुरलेले आहे आणि त्यात स्वतःची खासगी लिफ्ट आहे. पेंटहाउसमध्ये रूफटॉप डेक आणि त्याच्या खाजगी वॉटर स्लाइडसह तलाव समाविष्ट आहे,जो एक मजला सरळ तलावात सोडते. Les Palais Bulles   7.फोर फेअरफील्ड पॉन्ड - 248 दशलक्ष डॉलर्स2 फोर फेअरफील्ड पॉन्ड, हे रेनो ग्रुपचे मालक इरा रेनरचे निवासस्थान आहे. ही इन्व्हेस्टमेंट आणि उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकदारांची होल्डिंग कंपनी आहे. ह्या 63 एकर घरात, 29 बेडरूम, 39 बाथरूम, 91 फूट जेवणाचे खोली, बास्केटबॉल कोर्ट, स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, बॉलिंग ऍली आणि 3 जलतरण तलाव आहेत.ही हवेली नियंत्रित करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे. त्या जागेची स्वतःची उर्जा तयार करणारी योजना आहे,जी त्यांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी त्याच जागेत आहे. ज्या लोकांना त्यांच्या कार आवडतात त्यांना, फोर फेअरफील्ड पॉन्डमध्ये एक गॅरेज आहे जे जवळपास शंभर कार हाताळू शकते! अज्ञात वस्तुस्थिती: हवेलीचे स्वतःचे 164-आसनी थिएटर आहे. Four Fairfield Pond

Loved what you read? Share it with others!

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in