Table of Contents
Quality Service Guarantee Or Painting Free
Get a rental agreement with doorstep delivery
Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!
5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!
Loved what you read? Share it with others!
Submit the Form to Unlock the Best Deals Today
Help us assist you better
Check Your Eligibility Instantly
Experience The NoBrokerHood Difference!
Set up a demo for the entire community
भारतातील पूर्व-मंजूर गृहकर्ज समजून घेणे
Table of Contents
आपण घर विकत घेण्याचा विचार करीत असाल,तर आम्हाला खात्री आहे की आपण आपले घर खरेदी करण्यासाठी गृहकर्जाचा पर्याय देखील बघितला असेल.प्रत्येक बँकेकडे आपल्याला देण्यासाठी विविध प्रकारचे पर्याय आहेत,आणि ते आपल्यासाठी कर्जदार म्हणून फायद्याचे ठरतात, आपण ज्या बर्याच गोष्टींचा लाभ घ्याल त्यापैकी एक म्हणजे,बँका तुम्हाला पूर्व-मंजूर कर्ज देतात.
येथे आम्ही पूर्व-मंजूर कर्जे काय आहेत,आणि त्याबद्दल आपल्याला काय काय माहित असणे आवश्यक आहे,अशा सर्व गोष्टींबद्दल अंतर्दृष्टी प्राप्त करण्यात आम्ही मदत करणार आहोत.
पूर्व-मंजूर कर्ज म्हणजे काय?
Quality Service Guarantee Or Painting Free
Get a rental agreement with doorstep delivery
Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!
5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!
पूर्व-मंजूर कर्ज म्हणजे,जेव्हा बँक (किंवा कोणत्याही पैसे पुरवठादाराने) आपल्यासाठी ऑफर देतात तेही आपण अर्ज करण्यापूर्वीच.दुसऱ्या शब्दांत, आपण कर्जासाठीचा फॉर्म भरण्यापूर्वीच, बँक आपल्याकडे येईल आणि आपण त्यांच्याकडून कर्ज म्हणून घेऊ शकता,अशी रक्कम आपल्यास देईल.
बँका कर्ज पूर्व मंजूर कशी करतात?
आपल्याला ऑफर देण्यापूर्वी, बँक किंवा पैसा पुरवठादार तुमची सध्याची आर्थिक स्थिती, पत इतिहास, नेट वर्थ, वय आणि परतफेडच्या रेकॉर्डच्या आधारे गृह कर्जासाठी आपली पात्रता ठरवेल.
पूर्व मंजूर कर्जाची काय आवश्यकता आहे?
बहुतेक लोक स्वप्नातील घर गमावण्यामागचे एक कारण हे आहे की, कर्ज काढण्यास,मंजूर होण्यास खूप वेळ लागतो आणि विक्रेता तोपर्यंत थांबत नाही.पूर्व-मंजूर कर्जात आपल्याला कर्ज मिळण्यापूर्वी,आपल्याला खरेदी करायची मालमत्ता शोधण्याची गरज नाही.येथे ते आपल्याला पात्र असलेल्या गृह कर्जाची रक्कम सांगतात आणि त्यानंतर आपण यावर आधारित एखादे घर शोधणे सुरू करू शकता.
अशा प्रकारे आपण आपले बजेट आणि आवश्यकता,अधिक चांगल्याप्रकारे ठरविता आणि कर्ज घेण्याची प्रक्रिया वेगवान होते,कारण त्या रकमेसाठी आपली आधीपासूनच मंजूरी व तयारी असते.
पूर्व-मंजूर गृह कर्जासाठी अर्ज कसा करावा?
नियमित गृह कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, आणि पूर्व-मंजूर गृहकर्जासाठीची प्रक्रिया समान आहे.केवळ भिन्न गोष्ट म्हणजे आपण, "मालमत्ता ओळखलेली नाही", म्हणजेच आपल्याला अद्याप खरेदीसाठी घर सापडले नाही हे नमूद करावे लागेल.
आवश्यक कागदपत्रे आपल्या व्यवसायावर अवलंबून आहेत उदा. स्वयंरोजगार, पगारदार किंवा उद्योजक.आपण पगारदार व्यक्ती असल्यास, आपल्याला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल -
- आयडी पुरावा
- पत्ता पुरावा
- 3 महिन्यांच्या पगाराची पावती (सर्वात अलिकडील)
- फॉर्म 16 (सर्वात अलीकडील)
- 3 वर्षांचे प्राप्तिकर विवरण (सर्वात अलीकडील)
- 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट (सर्वात अलीकडील)
- प्रक्रिया शुल्काचा धनादेश (हा परत न मिळणारा आहे)
जर आपण पगारदार अर्जदार नसाल,तर आपल्याला त्यासह आयडी आणि पत्ता पुरावा प्रदान करणे आवश्यक आहे.
- व्यवसाय पत्ता पुरावा
- 3 वर्षे प्राप्तिकर विवरण (सर्वात अलीकडील)
- मागील 3 वर्षांचा ताळेबंद व नफा आणि तोटा दर्शवणारे खाते
- व्यवसाय परवाना तपशील (किंवा समकक्ष)
- टीडीएस प्रमाणपत्र (फॉर्म 16A ए, लागू असल्यास)
- पात्रतेचे प्रमाणपत्र (C.A./ डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी)
पूर्व-मंजूर गृह कर्जाचा विचार करताना काय लक्षात ठेवले पाहिजे?
पूर्व-मंजूर कर्जाची प्रक्रिया जरी सोपी आणि सुलभ असली, तरीही आपल्याला लक्षात ठेवण्याचे काही मुद्दे आहेत, जसे की -
पत चौकशी
पूर्व-मंजूर कर्जासाठी आपण आदर्श उमेदवार आहात की नाही, हे तपासण्यासाठी बँक किंवा पैसा पुरवठादार आपली पत चौकशी करेल.आपण पूर्व-मंजूर गृह कर्जासाठी अर्ज केल्यानंतर हे केले जाईल,आणि दुर्दैवाने, यामुळे आपला सीआयबीआयएल स्कोअर कमी होईल.
नकाराची शक्यता
पूर्व-मंजूर कर्ज मिळवण्याचा अर्थ असा नाही, की बँक किंवा पैसे पुरवठादार आपला गृह कर्ज अर्ज स्वयंचलितपणे लगेच स्वीकारेल.आपल्याकडे गृह कर्ज अर्ज नाकारण्याचा अधिकार आणि क्षमता,अद्याप त्यांच्याकडे आहे.हे कमी क्रेडिट स्कोअर, असमाधानकारक पत इतिहास, कमी उत्पन्न आणि यासारख्या घटकांमुळे असू शकते.
ते केवळ अधिकृत मालमत्तांसाठी वैध आहे
काही बँका आणि पैसे पुरवठादार फक्त काही प्रकल्प आणि केवळ विशिष्ट बिल्डरनाच कर्जासाठी अधिकृत करतात.आपण निवडलेले घर मंजूर प्रकल्पांच्या सूचीमध्ये दिसत नसल्यास, आपली पूर्व-मंजूर ऑफर नाकारली जाऊ शकते.
काही बँका आणि पैसा पुरवठादार अगदी मालमत्तेचे मूल्यांकनही करतात.आपण निवडलेले घर,गृहकर्ज मंजूर होण्यापूर्वी त्यांचे मानदंड पूर्ण करते कि नाही,हे सुनिश्चित करण्यासाठी हे केले जाते.
वैधता वेळ
आपल्या पूर्व-मंजूर गृह कर्जासाठी एक वैधता कालावधी असतो.ही वैधता कालावधी 3 ते 6 महिन्यांपर्यंत असू शकते,पैसे पुरावठादारावर हे अवलंबून असते.आपल्याला या श्रेणीबाहेर एखादे घर सापडल्यास,आपल्याला पुन्हा पूर्व-मंजूर कर्जासाठी अर्ज करावा लागेल.हे पुन्हा आपला सीआयबीआयएल स्कोअर कमी करेल.
व्याज दर निश्चित केला जाऊ शकतो
जरी पूर्व-मंजूर गृह कर्जाचे व्याजदर स्पर्धात्मक असले तरीही, दरात कपात केल्यास आपल्याला कर्जाचा लाभ घेताना फायदा होणार नाही.याचा अर्थ असा आहे की,औपचारिक अर्ज केलेला असल्यास,आपल्याला पूर्व-मंजूर कर्जामध्ये नमूद केलेले व्याज द्यावे लागेल, जरी नंतर व्याजदर कमी झाले तरीही.
नियम आणि अटी
कर्जाची कितीही भुरळ वाटत असली,तरीही, कर्जाच्या नियम व अटी चांगल्या,चाळून-निरखून घेतल्याशिवाय ते स्वीकारू नका.पूर्व-पेमेंटवर तसेच इतर दंडांवरही कर्जदात्याचे धोरण काय आहे ते तपासा.कुठेतरी एखादी फसवणूक असू शकते, सर्व तपशील तपासा आणि एक योग्य निर्णय घ्या.एकापेक्षा अधिक कर्जदात्यांशी बोलणे आणि आपण ज्याच्याशी पहिल्यांदाच बोललोय त्याच्याशीच न जाणे,योग्य ठरेल.
पूर्व-मंजूर कर्जाचे काय फायदे आहेत?
वर नमूद केलेल्या मूलभूत फायद्यांव्यतिरिक्त, प्रत्येक बँक किंवा पैसे पुरावठादाराचे,कर्जदार म्हणून आपल्याला ऑफर करण्यासाठी अतिरिक्त फायदे असतील.
उदाहरणार्थ, एसबीआय पूर्व-मंजूर कर्ज (पीएएल) कर्जदारांना ऑफर करतो -
- कमी व्याज दर
- कमी प्रक्रिया शुल्क
- कोणतेही लपविलेले शुल्क नाही
- प्री-पेमेंट पेनल्टी नाही
- दररोज कमी होणारी शिल्लक व्याज शुल्क
- 30 वर्षांपर्यंत परतफेड
- ओव्हरड्राफ्ट म्हणून गृह कर्ज उपलब्ध
- महिला कर्जदारांसाठी व्याज सवलत
एचडीएफसी पूर्व-मंजूर कर्जाची ऑफर -
- जलद प्रक्रिया
- कर्जाच्या रकमेवर स्पष्टीकरण
- कमी प्रक्रिया शुल्क
- महिला कर्जदारांना सवलत
- कमी प्री-पेमेंट आणि प्रक्रिया शुल्क
पूर्व-मंजूर गृह कर्जाचे तोटे काय आहेत?
सामान्य गैरफायदे म्हणजे -
1-वर सांगितल्याप्रमाणे आपल्याला देय व्याजदर बंदिस्त असतो.
2-जरी आपल्याला घर मिळाले नाही,तरीही आपण प्रक्रिया शुल्कावर खर्च केलेले पैसे परत मिळणार नाहीत.
3-आपण घाईघाईने निर्णय घेऊ शकता, जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपली पूर्व-मंजूर गृहकर्जाची मुदत संपुष्टात येत आहे, आपण अर्जाची फी वाया घालवू नये म्हणून घाई घाई एखाद्या घरात स्थायिक होऊ शकता.
4-प्रत्येक पूर्व-मंजूरी अर्ज आपल्या सीआयबीआयएल स्कोअरवर परिणाम करेल.
जर आपणास आधीच एखादे घर सापडले असेल, किंवा आपण ते शोधत असाल,तर दलालीशिवाय स्वप्नातील घर शोधण्यासाठी नोब्रोकर कडे जा.आपल्या घर खरेदीसाठी आपल्याला योग्य गृहकर्ज मिळविण्यासाठी आवश्यक असणारी कोणतीही मदत,आम्ही आपल्याला प्रदान करू शकतो.नोब्रोकर गृहकर्जाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
[widget_homeLoan_checkEligibility_form]Loved what you read? Share it with others!
Most Viewed Articles
भारतातील पूर्व-मंजूर गृहकर्ज समजून घेणे
March 24, 2020
2011+ views
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम
May 27, 2020
1963+ views
2024 मध्ये पुण्यात राहण्यासाठी परवडणारी ठिकाणे
April 27, 2020
1802+ views
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
May 27, 2020
1613+ views
भारतातील भाडेकरु कायदा - दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
May 27, 2020
1603+ views
Recent blogs in
Join the conversation!