Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

1 एकर म्हणजे किती गुंठे?

view 21143 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
5 2023-03-15T14:18:29+00:00

कोणतीही वस्तू असो वा पदार्थ त्यांची मापने ठरलेली आहेत. कालानुरूप, काही मापनांच्या बाबतींत सोयीनुसार बदल होत गेले. तसेच, जागा किंवा जमिनीची मोजणी ही एक महत्वाची बाब आहे. त्याचेही मोजमाप काही ठराविक पारंपरिक व आधुनिक मापनांद्वारे केले जाते. जसे; हेक्टर, एकर, गुंठा किंवा बिघा, फूट या एककात जमिनी मोजतात. आता

1

एकर म्हणजे किती गुंठे, त्याचे रूपांतर कसे करण्यात येते, याची आपण माहिती करून घेऊया.

१ एकरमध्ये एकूण ४० गुंठे असतात. ३३ बाय ३३ फूट जमीन मिळून एक गुंठा तयार होतो. म्हणजे, १ गुंठा १०८९ चौरस फूट इतका असतो. यावरून १ एकराचे प्रमाण काढायचे असल्यास ते ४३५६० चौरस फूट इतके येईल. एकूण २.४७ एकर जमिनीचा एक हेक्टर बनतो ज्यात ९८.८ गुंठे असतात. यावरून लक्षात येईल की १०७६३६ चौरस फूटांचा १ हेक्टर असतो.

NoBroker इंटीरियर विशेषज्ञों की मदद से अपना नया घर डिज़ाइन करवाएं

त्याचप्रमाणे, १०० आर म्हणजे १ हेक्टर होय. १ आर हा १०० चौरस मीटरचा असतो म्हणजे १०००० चौरस मीटर जमीन ही १ हेक्टर असते. १०.७६ फूट मिळून १ चौरस मीटर तयार होतो. अशाप्रमाणे, १ गुंठा १०८९ चौरस फूटांचा तर १ आर हा १०७६ चौरस फूटांचा असतो. बिघा हे जमीन मोजण्याचे एकक भारताच्या उत्तरेकडे प्रचलित आहे.   

संबंधित आणखी काही विषय :

जमीन मोजणी कशी करावी ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners