Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

1 हेक्टर म्हणजे किती एकर?

view 35915 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
6 2023-05-11T12:12:44+00:00
Best Answer

प्रत्येक वस्तू किंवा पदार्थ मोजण्याची वेगवेगळी मापने असतात. त्यांची विशिष्ट एकके ठरलेली आहेत, त्यांचे आधारवरून त्यांची मोजणी अधिकृत मानली जाते. जर जमीन मोजणीचं उदाहरण घेतलं तर तुम्हांला कानोसा असेलच की जमीन किंवा जागा मोजणीला फारच महत्व आहे. जमीन मोजणीसाठी गुंठे, एकर, हेक्टर अशी एकके वापरली जातात. तर आता, 1 हेक्टर म्हणजे किती एकर हे बघूया.

जमीन खरेदी-विक्रीच्या कायदेशीर व्यवहारात नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् ला अवश्य भेटा

1 hectare manje kiti acre :

आपल्याकडे जमीन किंवा शेत-जमीन ही गुंठयात मोजली जाते. ४० गुंठ्यांचा मिळून १ एकर बनतो. १ गुंठा ३३ बाय ३३ फुटांचा असतो. एक हेक्टर म्हणजे किती एकर याचं उत्तर २.४७ एकर होय. याचाच अर्थ की ९८.८ गुंठा जमीन म्हणजे १ हेक्टर होय. १०००० चौरस मीटर चा एक हेक्टर असतो.

हेक्टर म्हणजे किती एकर,

  • १ गुंठा म्हणजे १०८९ चौरस फुट

  • १ एकर म्हणजे किती गुंठे = ४० गुंठे = ४३५६० चौरस फुट

  • १ हेक्टर म्हणजे किती एकर = ९८.८ गुंठे = २.४७ एकर =

    १०७६३६ चौरस फुट

त्याचबरोबर,

एक हेक्टर म्हणजे १०० आर असतात. १ आर १०० चौरसमीटरचा म्हणजेच १०००० चौरस मीटरचा एक हेक्टर असतो. वर बघितल्याप्रमाणे एक गुंठा १०८९ तर एक आर १०७६ चौरस फुटांचा असतो.

या दिलेल्या माहितीवरून तुम्हांला ek hectare manje kiti acre याबद्दल समजले असेल, जागेच्या किंवा शेतजमिनीच्या व्यवहारात ही जमीन मोजणीसाठी ही मापनाची एकके वापरली जातात.

 

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

ग्रीन झोन म्हणजे काय ? जागा नावावर कशी करावी ? NA प्लॉट म्हणजे काय ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners