Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

7 12 म्हणजे काय?

view 5126 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
6 2023-03-15T13:45:02+00:00

७/१२ मध्ये मालमत्तेच्या संदर्भातील सगळी सविस्तर माहिती नमूद असते. महाराष्ट्र सरकारचे जमिनीविषयक नोंदणीचे हे एक कायदेशीर रजिस्टर आहे. कोणत्याही जमिनीविषयक व्यवहारात याला अतिशय महत्व असते. म्हणून 7/12 काय आहे (7 12 utara in marathi), हे तुम्हांला माहित असावे.

सात बारा उतारा माहितीमध्ये तुमच्या जमिनीचे मालकी हक्क, जमिनीचा प्रकार व क्षेत्रफळ, जमीन किंवा शेतजमीन विक्री-खरेदी व्यवहाराच्या नोंदी असतात. एकंदर हा उतारा जमिनीचा इतिहास व सध्याचे मालकी हक्क सांगतो. तसेच, त्यांत भूमापन क्रमांक, गाव, तालुका, जिल्हा इत्यादी माहिती नमूद असते. महाराष्ट्र महसूल कायदा, १९७१ या कायद्याच्या अंतर्गत जमिनीबाबतच्या ए टू झेड नोंदी ठेवल्या जातात. आता बघूया 7 12 म्हणजे काय (7 12 utara meaning in marathi), ज्याला गाव नमुना असेही नाव आहे, जे तलाठ्याजवळ असते. त्यांतीलच गाव नमुना ७ व गाव नमुना १२ यांना एकत्रितपणे ७/१२ उतारा असे संबोधतात. संबंधित अधिकारी-तलाठीला भेटून किंवा महाराष्ट्र महाभुलेखच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही 7/12 उतारा online काढू शकता. 

 प्रॉपर्टी संदर्भात कायदेशीर कामांसाठी नो ब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विससोबत नक्की संपर्क करा

 

जमिनीच्या अधिकारावरून वाद उद्भवल्यास्, व्यवहारात फसवणूक होत असल्यास, बँक किंवा इतर स्त्रोतांकडून कर्ज घेताना हा पुरावा सादर करणे आवश्यक असते. यावरून ७-१२ उतारा काढणे का महत्वाचे आहे, 7 12 उतारा म्हणजे काय, तो कसा काढायचा आदी गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील.

याच्याशी संबंधित विषय :

जमीन मोजणी कशी करावी ? जुने फेरफार कसे काढावे ? सर्वे नंबर कसा शोधायचा ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners