Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Legal / आधार कार्ड वरील जन्मतारीख बदलणे?
Q.

आधार कार्ड वरील जन्मतारीख बदलणे?

view 1613Views

1 Year

Comment

1 Answers

-1 2023-05-11T11:49:03+00:00

आधार कार्ड हे तुमची ओळख सांगणारे एक महत्वाचे अधिकृत प्रमाणपत्र मानले जाते. सध्या आधार कार्डच्या आधारे जवळजवळ सगळी कामे पूर्ण होतात. त्या कार्डवर जी काही वैयक्तिक माहिती नमूद असते तीच सर्वस्वी गृहित धरली जाते जसे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख, लिंग इत्यादी. म्हणून त्यांत काही चुकीचे नोंद झाल्यास किंवा आपणहून काही बदल करायचे असल्यास तात्काळ रीतसर करून घ्यावे. इथे आधार कार्ड वरील जन्म तारीख बदलणे प्रक्रिया कशी संपन्न होते त्याबद्दल जाणून घेऊया.

तुम्हांला घरासाठी लोन घ्यावयाचे असल्यास नोब्रोकर प्रोफेशनल होम लोन एक्स्पर्ट्ससोबत जरूर चर्चा करा

आधार कार्ड जन्म तारीख बदलणे ऑनलाइन प्रक्रिया :

  • तुम्ही नजीकच्या महा-ई-सेवा केंद्राला भेट देऊन तेथील कार्यकारी अधिकाऱ्यामार्फत तुमच्या आधार कार्डवरील चुकीची जन्मतारीख दुरुस्त करून घेऊ शकता.

  • त्याचप्रमाणे, घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने देखील तुम्हांला काही स्टेप्स फॉलो करून तुमच्या आधार कार्डवरील चुकीची बर्थ डेट चेंज करता येईल.

  • त्यासाठी, सर्वात आधी शासनाच्या

    www.uidai.gov.in

    या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा. ‘माझे आधार’ या पर्यायावर क्लिक करून अपडेट आधारला क्लिक करा.

  • तुमचा आधार क्रमांक तिथे नमूद केल्यानंतर तुम्हांला ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी टाइप करून जन्मतारीख अपडेटला सिलेक्ट करा. तिथे तुमची योग्य जन्म तारीख टाका.

  • संबंधित डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमच्या सोयीनुसार पेमेंट मोड निवडून ५० रुपये फी भरून अर्जाची पावती मिळवा. साधारण ३ ते ९० दिवसात तुमच्या आधार कार्डची पोहोच होते.

आधार कार्ड वरील जन्मतारीख बदलणे कागदपत्रे,

  1.  

    आधार कार्ड (ज्यावरील जन्मतारीख दुरुस्त करायची आहे ते)

  2.  

    पॅन कार्ड  

  3.  

    जन्म दाखला

  4.  

    शाळा सोडल्याचा दाखला   

  5.  

    पासपोर्ट

वर दिलेल्या बाबींना फॉलो करून तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील चुकीची जन्मतारीख दुरुस्त करू शकता जेणेकरून त्यामुळे तुमच्या एखाद्या कामांत येणारा व्यत्यय दूर होईल.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड वरील नाव कसे बदलावे जन्म दाखला कसा काढायचा

Most Viewed Questions

Recently Published Questions

include
Flat 25% off on Home Interiors

Premium Material with Quality Assurance and 10 Years Warranty