Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Home Services / Carpentry / आरसा कोणत्या दिशेला असावे?
Q.

आरसा कोणत्या दिशेला असावे?

view 595Views

1 Year

Comment

1 Answers

Send
0 2023-03-31T09:48:43+00:00

घरात कोणती वस्तु कुठे असावी, कुठे नसावी याविषयी वास्तुशास्त्रात इन डीटेल सांगितले आहे. त्यांतल्या प्रत्येक गोष्टीमागे विशेष तर्क दडलेला आहे, सखोल अभ्यासाने या सर्व बाबी सांगितल्या गेल्या आहेत. आता ‘आरसा कोणत्या दिशेला असावे’ याबद्दलही बहुमूल्य माहिती आपल्या भल्याच्या दृष्टिकोनातून सांगण्यात आलेली आहे, ते याठिकाणी सविस्तर माहिती करून घेऊया.

तुमच्या घरातील घरगुती सेवांसाठी नो ब्रोकर प्रोफेशनल होम सर्विसेस् सोबत अवश्य कॉन्टॅक्ट करा

बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपल्या घरात आरसा कोणत्या दिशेला असावा; जेणेकरून संपूर्ण घरावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल. आरसा आपल्याला आपल्या प्रतिमेचे दर्शन घडवतो त्यामुळे प्रत्येकालाच असे वाटत असते की आपली प्रतिमा छान दिसावी, छान असावी. पण, त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार पुढील काही गोष्टींची खास काळजी तुम्हांला घ्यावी लागेल. जसे आरसा नेहमी पूर्व व उत्तर दिशेलाच लावावा त्याने घरात समृद्धीचे आगमन होते. ‘उत्तर’ ही कुबेराची दिशा असल्याने या दिशेला घरातील आरसा असल्यास आर्थिक उन्नती होते. तिजोरीचे तोंड उत्तरेकडे असावे किंवा तिजोरीत छोटा आरसा ठेवावा. तसेच, बाथरूममध्ये आरसा पूर्व दिशेच्या भिंतीवर असावा आणि अगदी समोरच नसावा. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आरसा असल्याने वास्तुदोष निर्माण होतो, घरात कलह-वादाला आमंत्रण मिळते. बेडरूममध्ये पलंगासमोर आरसा नसावा असल्यास त्यावर कापडाने किंवा कागदाने झाकावे. तुम्ही तुमच्या घरात आरसा लावताना नेहमी तो पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावा.  

तुमच्या घराच्या नूतनीकरणासाठी नो ब्रोकर प्रोफेशनल होम इंटिरियर सर्विसेस् ला नक्की संपर्क करा

घरात फुटलेला आरसा कधीही ठेऊ नये, काच तडकली असेल तसेच आरश्यात जर अंधुक दिसत असेल तर तात्काळ तो काढून टाकावा. कारण, चिरलेली काच किंवा अस्पष्ट दिसणारी काच अशुभ मानली जाते त्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. कधीही आरश्याची काच ही चकचकीत, स्वच्छ व कुठे न चिरलेली असल्याची खात्री करून घ्या. आरश्यावर कोणतेही डाग पडता कामा नये. आरसा नेहमी असा असला पाहिजे की ज्यात आपली प्रतिमा निर्मळ नितळ दिसावी. स्वयंपाकघरात कधीही आरसा लावू नये. अशाप्रकारे, आरसा कोणत्या दिशेला असावा याची समर्पक माहिती तुम्हांला अवगत झाली असेल तर मग इथून पुढे घरात आरसा लावताना, तो कसा असावा, कोणत्या दिशेला असावा, या गोष्टी अवश्य ध्यानात घ्या.

संबंधित विषय येथे वाचा :

मनी प्लांट कोणत्या दिशेला लावावे ? घर खरेदी करण्यापूर्वी तपासण्यासारख्या गोष्टी घरात मोरपंख कुठे ठेवावे ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners