Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Finance / Banking / बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया?
Q.

बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया?

view 1182Views

1 Year

Comment

1 Answers

Send
0 2023-03-31T10:01:04+00:00

आता बँकेत अकाऊंट असावेच लागते, त्याशिवाय आर्थिक व्यवहार सुरळीत होत नाहीत. मग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, जेष्ठ नागरिकांची पेन्शन असो नोकरदारांचा पगार किंवा शासकीय अनुदान हे  बँकेतच जमा होतात. याशिवाय, कर्ज घ्यायचे असल्यास तसेच इतर अनेक आर्थिक व्यवहाराच्या बाबतीतही बँक खाते बंधनकारक असते. ही खाती किती प्रकारची असतात, बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हांला माहित असल्या तर तुम्हीसुद्धा एखाद्याला मदत करू शकता.  

तुमच्या सोयीनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने बँकेचे खाते काढता येते. घरबसल्या तुम्ही संबंधित बँकेचे एप इन्स्टॉल करूनदेखील अकाऊंट काढू शकता. बचत खाते, चालू खाते, आवर्ती ठेव खाते, मुदत ठेव खाते, पगारी खाते, डिमॅट खाते, एनआरआय खाते असे बँकेच्या खात्यांचे प्रकार असतात. तुम्हांला कोणते खाते ओपन करायचे आहे, ते मेन्शन करा. जर तुम्ही ऑफलाइन खाते उघण्याची प्रक्रिया करणार असाल तर तेथे तुम्हांला एक फॉर्म दिला जातो. तो व्यवस्थित भरून साक्षीदार स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रे जोडून सबमिट करावे. अकाऊंट जनरेट होण्यासाठी 1-2 दिवस लागू शकतात. एटीएम कार्ड हवे असल्यास 15 दिवसांत ते घरपोच प्राप्त होते.

घरासाठी कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर नो ब्रोकर प्रोफेशनल होमलोन एक्स्पर्टस् ना जरूर भेटा   बँकेत खाते उघण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे,
  •  आधार कार्ड  

  •  

    फोटो व स्वाक्षरी

  •  पॅन कार्ड

  •  

    वीज बिल पावती

  •  

    बोनफाईड सर्टिफिकेट

    (आवश्यक असल्यास)

ऑनलाइन अकाऊंट काढताना डॉक्युमेंटस् स्कॅन करून अपलोड केल्यानंतर ते वेरीफाय केले जातात. त्यानंतर तुम्हांला अकाऊंट नंबरचा संदेश मिळतो. बँकेच्या संबंधित अधिकाऱ्याकडून ऑनलाइन KYC प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाते. आता प्रत्येकवेळेस आपल्याला बँकेत चकरा मारण्याची गरज नाही. सगळी कामे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केली जाऊ शकतात. ऑनलाइन प्रक्रिया विश्वासार्हता देते पण तुमचे पासवर्ड किंवा गोपनीय माहिती कुणाशीही शेअर करू नका. तर, बँकेत खाते कसे उघडायचे, याविषयी तुम्हांला माहिती मिळाली असावी.   

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

पॅन कार्ड कसे काढावे ? होमलोनसाठी लागणारी कागदपत्रे
Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners