जर तुम्ही एखादी मालमत्ता भाड्याने घेणार असाल किंवा देणार असाल तर ‘भाडे करार’ अवश्य करा. या करारनाम्यात भाडेकरू व मालक दोघांचे हित असते. कारण, मालमत्तेच्या बाबतीत कोणताही व्यवहार ‘विनाकरार’ करणे भविष्यात अडचणीचे ठरू शकते. म्हणून व्यवहारात भाडे कराराची औपचारिकता वगळू नये. तसेच, भाडे करारनामा म्हणजे काय (
what is rent agreement in marathi
)
, याची तुम्हांला माहिती असणे आवश्यक आहे.
प्रॉपर्टी भाड्याने देण्या-घेण्याच्या व्यवहारात भाडेकरू व घरमालक यांच्यात सर्व अटी व नियमांसंबंधी जो करार केला जातो, त्याला भाडे करारनामा असे म्हणतात. भाडे करारनामा नमुना मराठी (
rent agreement format
in marathi) यामध्ये ठरवलेले भाडे, सुरक्षा रक्कम, कराराची मुदत किंवा कालावधी, राहण्याबद्दल किंवा कोणतीही वस्तू व सुविधा वापरण्याबद्दलचे नियम, इत्यादी सगळ्या बाबी नमूद असतात. कमी-अधिक बाबींच्या अंतर्भावाने काही भाडे करारांचे स्वरूप गरजेनुसार वेगळेसुद्धा असू शकते.
नो ब्रोकर प्रोफेशनल रेंट एग्रीमेंट सर्विसेस् तुम्हांला भाडे करारनाम्याबाबत आवश्यक ते साहाय्य करतील
भाडे करार नियम व अटी :
भाडे प्रस्ताव : भाडे करारांत भाड्याची ठरलेली रक्कम फक्त भाडेकरू किंवा घरमालक यांपैकी एकाच्या मर्जीने कमी-जास्त होत नाही.
सुरक्षा रक्कम : सुरक्षा रकमेच्या बाबतीतले नियम दोघांनाही पाळावे लागतात, अन्यथा खटला दाखल होऊ शकतो.
भाडे करार कालावधी : भाडे करार कालावधीची मर्यादा घरमालक किंवा भाडेकरू एकमेकांच्या नकळत कमी-जास्त करू शकत नाहीत.
सोई-सुविधा : वीज, पाणी, पार्किंग, इत्यादी सुविधांच्या वापराबाबतचे नियम भाडे करारनाम्यात समाविष्ट असतात.
ठराविक निर्बंध : इतरांना त्रास होईल असे कृत्य न करणे, भाडे भरण्याची तारीख पाळणे असे आणखी काही निर्बंध असू शकतात.
उपरोक्त सर्व नियम व अटींच्या नोंदी भाडे करारात असतात. घरमालक व भाडेकरू दोघांच्या स्वाक्षऱ्यांनी ते करार संमत होते. दोघांपैकी एक किंवा दोघेही संबंधित करारनाम्याचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, उदाहरणार्थ; घरमालकाने अधिकची रक्कम आकारणे, भाडेकरूने सोई-सुविधांचा गैरवापर करणे, दोघांत सतत वाद होणे, इत्यादी. त्याचप्रमाणे, हा भाडे करारनामा भाडेकरू किंवा घरमालकावर जर चुकीचा दावा दाखल झाल्यास त्यांचे रक्षणही करतो.
याच्याशी संबंधित विषय :
होम लोन साठी लागणारी कागदपत्रे भाडेकरू कायदा पगडी सिस्टिम म्हणजे काय ?Your Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Related Questions
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
भाडे करारनामा म्हणजे काय ?
Ashok A
2765 Views
1 Answers
1 Year
2023-02-28T09:46:06+00:00 2023-06-16T16:31:15+00:00Comment
Share