Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

जन्म दाखला कसा काढायचा

view 329 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-03-31T10:05:23+00:00

रोजच्या व्यवहारात अशी काही कामे असतात; जिथे आपल्यासोबत त्या-त्या परिस्थितीनुसार किंवा कार्यक्रमानुसार अधिकृत कागदपत्रे आपल्याला सादर करावी लागतात. त्यावेळी आपली अधिकृत ओळख देणारे दाखले आपल्याकडे असणे बंधनकारक असते. त्यांपैकीच एक म्हणजे जन्म दाखला. आता हा जन्म दाखला कसा काढायचा, त्याची माहिती इथे घेऊया.

जन्म दाखला हे एक असं प्रमाणपत्र आहे; ज्यावर आपल्या जन्माची तारीख, वेळ, लिंग, जन्माचं स्थळ, पालकांसहित आपली ओळख अधिकृतरित्या नोंद केलेली असते. जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बाळ जन्मल्यापासून २१ दिवसांच्या आत तुम्हांला अर्ज करावा लागेल. नाहीतर, पुन्हा अधिक शुल्क आकारले जाईल किंवा संबंधित अधिक कागदपत्रे सादर करावी लागतात. वारस अधिकार प्राप्तीसाठी, लग्न करतेवेळी कायदेशीर वय बघण्यासाठी, शाळेत एडमिशन घेताना व अन्य बऱ्याच महत्वाच्या कामांकरीता जसे पासपोर्ट काढण्यासाठीसुद्धा जन्माचा दाखला आवश्यक असतो.     

तुमच्या प्रॉपर्टीसंबंधित कायदेशीर कामांसाठी नो ब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् ला अवश्य भेट द्या

जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना प्रस्तुत करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे,

  • हॉस्पिटलचे सर्टिफिकेट  

  • हॉस्पिटलमध्ये न जन्मल्यास जन्मस्थळाचा पुरावा

  • आई-वडिलांचे ओळखपत्र (विवाह प्रमाणपत्र)

विलंब जन्म नोंदणी असल्यास ही कागदपत्रे सादर करावीत,

  •  अर्जदाराचे अधिकृत ओळखपत्र

  •  

    शाळा सोडल्याचा दाखला

  •  बॉन्ड पेपर (शपथपत्र)

  •  

    मेडिकल सर्टिफिकेट  

  •  

    स्थानिक प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र  

तुमच्या स्थानिक म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका आदी ठिकाणी जन्म नोंदणीसाठी विशेष विभाग असतो. तुम्ही तिथल्या अधिकाऱ्याकडे अर्ज सुपूर्त करू शकता. त्याचबरोबर, आता ही कामे ऑनलाइनसुद्धा होत आहेत. तर, जन्म प्रमाणपत्र कसे काढावे (birth certificate in marathi), याबद्दल अनुरूप माहिती तुमच्या लक्षात आली असेल.

संबंधित विषय येथे वाचा :

पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे उत्पन्न प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज 

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners