Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

कन्व्हेयन्स डीड म्हणजे काय?

view 9793 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
3 2023-04-27T15:23:20+00:00

मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार हे कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे यांशिवाय अधिकृतरीत्या पूर्ण होतच नाही. मग त्यांत बऱ्याच औपचारिक करारपत्रांच्या देवाणघेवाणीचा समावेश असतो, ते सगळे डॉक्युमेंट्स विशेष नावांनी प्रचलित आहेत, त्याना तसे महत्वसुद्धा आहे. त्यांपैकीच एक म्हणजे अभिहस्तांतरण अर्थात ‘कन्व्हेयन्स डीड म्हणजे काय’ त्याचे काय प्रकार असतात शिवाय मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड-‘कन्व्हेयन्स डीड) म्हणजे काय या सगळ्यांबद्दल जाणून घेऊया.

तुमच्या मालमत्तेसंदर्भातील कायदेशीर व्यवहारासाठी नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् ला संपर्क करा

conveyance deed meaning in marathi  :

  1. अभिहस्तांतरण (

    conveyance deed

    ) हे मालमत्तेच्या मालकाने खरेदीदाराला हस्तांतरित केलेले मालमत्तेचे अधिकृत मालकी अधिकार सिद्ध करणारे कायदेशीर पत्रक आहे. 

  2. conveyance deed

    ही नॉन-ज्युडीशियल स्टॅम्प पेपरवर दोन्ही पक्षाच्या स्वाक्षरीसहित जिल्ह्याच्या निबंधक कार्यालयात प्रस्तुत केले जाते. 

  3. तत्पूर्वी, मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा बोजा नसल्याची खात्री असावी. संबंधित राज्यपरत्वे स्टॅम्प ड्यूटी खरेदीदाराकडून आकारली जाते. 

  4. फ्रीहोल्ड डीड, लीजहोल्ड डीड, मॉर्गेज डीड असे कन्व्हेयन्स डीडचे तीन प्रकार पडतात.

यासाठी लागणारी कागदपत्रे खाली दिल्याप्रमाणे,

  • अभिहस्तांतरणासाठी अर्ज सोबत ओळख पत्र

  • विकासकाशी केलेले विक्रीकरार पत्र

  • मालमत्ता पत्रक

  • मालमत्तेचा मंजूर झालेला आराखडा

  • बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

  • नोंदणीची पावती

  • स्टॅम्प ड्यूटी भरल्याची पावती

  •  

    मालमत्तेचे चतुरसीमावर्णन

  •  

    भोगवटा प्रमाणपत्र

  • आर्किटेक्चरने प्रमाणित केलेला नमुना

कन्व्हेयन्स डीडचे महत्त्व काय आहे,

  • कन्व्हेयन्स डीड अर्थात अभिहस्तांतरण हा प्रकार व्यापक स्तरावर मान्य असून विक्री करार, त्यागपत्र किंवा बक्षीसपत्र, साठेखत आदी करारांचा यांत अंतर्भाव होतो.  

  • संबंधित मालमत्ता विकायची असेल किंवा पुनर्विकास करताना कन्व्हेयन्स डीड आवश्यक दस्तऐवज मानले जाते. इमारतीतील फ्लॅटसोबत संबंधित जमिनीवर तुमचा मालकी हक्क सांगणारा हा एक पुरावा असतो.

विकासकाने चार महिन्याच्या आत कन्व्हेयन्स डीड द्यावे, असे होत नसल्यास तुम्ही सब-रजिस्ट्रारकडे डिम्ड-कन्व्हेयन्स डीडसाठी फॉर्म-७ सोबत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हांला संबंधित डॉक्युमेंट्स सादर करावे लागतात. त्यांत सेल डीड सोबत फ्लॅटधारकाची लिस्ट तसेच फ्लॅटचे डिटेल्स द्यावे लागतात. सब-रजिस्ट्रार दोन्ही पक्षाचे बोलणे ऐकून घेऊन कन्व्हेयन्स डीड बाबतची नोटिस देऊ करतात.     

तर एकंदर संबंधित मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात किंवा मालकी अधिकार सिद्धतेसाठी म्हणजे सगळी प्रॉपर्टी डील्सची रेलचेल सुरळीत व्हावी म्हणून समाजासाठी कन्व्हेयन्स डीड किती महत्त्वाचे आहे, ही तुमचे ध्यानात आले असेल.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे काय ? घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमीन खरेदी-विक्री नियम   

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners