Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

देवघर कोणत्या दिशेला असावे

view 6786 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-05-24T22:34:51+00:00

वास्तुशास्त्र या प्राचीन स्थापत्यविद्येवर आधारित अभ्यासात घरातल्या स्थानांसाठी योग्य-अयोग्य दिशा सांगितल्या आहेत. त्यांत जल, वायु, अग्नि आदींसाठी कोणती दिशा अनुकूल आहे हे रीतसर वर्णिले आहे. त्याचप्रमाणे, घरात पूजाघर कुठे व कसे मांडावे याचा उल्लेख आहे. तसं तर देवाचे अस्तित्व चरचरांत आहे हे सत्य सर्वज्ञात आहे. परंतु, ‘देवघर कोणत्या दिशेला असावे’ याबद्दल शास्त्र काय उत्तर देते व देवघरासाठी संबंधित दिशाच का योग्य आहे, याची माहिती करून घ्यायला हवी.

तुमच्या प्रॉपर्टी व्यवहाराच्या कायदेशीर कामांत नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेसची मदत घ्या

देव्हारा कोणत्या दिशेला असावे ?

  • घरातला देव्हारा ईशान्य दिशेला असावा. ही दिशा मंदिर स्थानासाठी त्याचप्रमाणे जलस्थानासाठी सुद्धा अनुकूल असते. त्याने घरभर सकारात्मक ऊर्जेचे वहन होत राहते.   

  •  

    स्वास्थ्यहानी अन् वित्तहानी टाळण्यासाठी देवघर कुठल्या दिशेला असावे त्याच दिशेला प्राधान्य द्यावे नाहीतर वास्तुदोषामूळे विपरित परिस्थितीचा सामना करावा लागेल.

  •  

    देवघरासमोर तिजोरी असू नये. दक्षिण भिंतीला, नैऋत्य किंवा आग्नेय दिशेला घरातले पूजाघर अजिबात नसावे. पूजा करतेवेळी तुमचे मुख पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावे.   

  •  

    वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ईशान्य दिशेला देव्हारा तर स्थापन करावेच पण तसेच बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये जसे त्या देवघराला रंग कोणता द्यावा तिथल्या देवांना कसे मांडावे, कोणत्या गोष्टी वर्ज्य कराव्या इत्यादी.

  • शक्यतो, देवघरात देवी-देवतांचे फोटो ठेवणे टाळा. एखादं-दुसरी मूर्ती फार जुनी झाली असेल तिला भेगा पडल्या असतील किंवा झीज होत असेल तर त्या मूर्तीचे विसर्जन करा.    

  •  

    ‘gharat devghar kontya dishela asave’ याचं उत्तर नक्कीच ईशान्य दिशा आहे परंतु एखादं कारणामुळे तेथे संभव नसल्यास पर्याय म्हणून पूर्व किंवा पश्चिम दिशा उचित ठरेल.  

  • देवघराला डार्क रंग देऊ नये. हलका पिवळा, बदामी, हलका नारंगी, हलका गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाला पसंती द्यावी. पांढरा रंग सुख-समृद्धी-शांतीचे प्रतीक मानले जाते.  

घरातले श्रद्धास्थान म्हणजेच देवघर कोणत्या दिशेला असावा हे तुम्ही माहित करून घेतले आहे यापुढे घरात चुकीच्या दिशेला देवस्थान न बनवता उचित दिशेलाच प्राधान्य द्या.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

देवघरात शिवलिंग कसे ठेवावे झोपण्याची योग्य दिशा कोणती घरात मोरपंख कुठे ठेवावे

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners