Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Legal / Documentation / अधिवास प्रमाणपत्र साठी लागणारी कागदपत्रे?
Q.

अधिवास प्रमाणपत्र साठी लागणारी कागदपत्रे?

view 47532Views

1 Year

Read More

Comment

1 Answers

4 2023-06-20T14:16:36+00:00
Best Answer

जर आपल्या स्वत:ची किंवा रहिवासी ठिकाणाची ओळख सांगणारी, शिक्षण-व्यवसायाची पात्रता तसंच प्रॉपर्टी अधिकार सिद्ध करणारी कागदपत्रं नसली असती तर... नुसत्या कल्पनेनंच सगळं कसं विस्कळीत झाल्याचं चित्र समोर येतं. कागदपत्रांच्या किंवा प्रमाणपत्रांच्या आधारावरच आपली जी-ती कामे सुरळीत चालली आहेत म्हणून त्यांचे जतन केले पाहिजे नसल्यास वेळेवर बनवून घेतले पाहिजे. कायद्याने होत असलेल्या बऱ्याच कामांत अधिवास(डोमिसाईल)प्रमाणपत्राची गरज भासते त्यामुळे domicile certificate documents in marathi याचीसुद्धा तुम्हांला पूर्वमाहिती असावी.   

प्रॉपर्टी व्यवहाराची कामे कायद्यानिशी करण्यासाठी नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसला जरूर भेटा  नोब्रोकरच्या प्रोफेशनल होमलोन एक्स्पर्ट्सशी संवाद साधून तुमच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करा   

अधिवास प्रमाणपत्र साठी लागणारी कागदपत्रे :  

व्यक्तिच्या स्थानिक रहिवासाचा पुरावा देणाऱ्या अधिकृत प्रमाणपत्रास अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असे म्हणतात. यास ‘वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र’ असेही म्हटले जाते. तर, अधिवास प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे तुम्हांला अर्ज करताना सादर करावी लागतील. तुम्ही यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करू शकता. महा ई-सेवा केंद्र किंवा तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात जाऊन या सर्टिफिकेटसाठी अर्ज करावे लागते तसेच महाराष्ट्र शासनाच्या

www.aaplesarkar.mahaonline.gov.in

या ऑफिशियल वेबसाइटला भेट देऊन तुम्ही अप्लाय करू शकता.

domicile certificate sathi lagnare kagad patra :

डोमासाईल साठी लागणारी कागदपत्रे खाली दिल्याप्रमाणे,

  1.  

    आधार कार्ड

  2.  

    रेशन कार्ड

  3.  

    पासपोर्ट साइज फोटो

  4.  

    जन्म दाखला

  5.  

    शाळा सोडल्याचा दाखला

  6.  

    बोनाफाईड सर्टिफिकेट (शाळा शिकत असल्यास)

  7.  

    स्वयं-घोषणा पत्र

वरील माहितीवरून डोमासाईल काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती हे तुमच्या लक्षात आले असेलच तर प्रमाणपत्र काढताना संबंधित सर्व कागदपत्रे असल्याची पुष्टी करा.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

महारेरा म्हणजे काय म्हाडा लॉटरी जागा नावावर कशी करावी

Most Viewed Questions

Recently Published Questions

include
Flat 25% off on Home Interiors

Premium Material with Quality Assurance and 10 Years Warranty