एखादी वस्तू किंवा प्रॉपर्टी विकत घेण्याची इच्छा आहे पण त्याचा खर्च एकरकमी देणे शक्य होत नसल्यास वित्तीय संस्थेकडून आपल्याला त्या वस्तू किंवा प्रॉपर्टी ईएमआयवर घेण्याचे पर्याय उपलब्ध असतात; काही औपचारिक अटींसोबत. तर आता, हे emi म्हणजे काय (emi meaning in marathi) ते इथे बघूया. त्याचबरोबर EMI कॅल्कुलेटर काय असते, ईएमआयवर एखादे व्यवहार करायचे असल्यास त्याचे नियम काय आहेत, या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
घरासाठी लोन घ्यायचे असेल तर नोब्रोकर प्रोफेशनल होम लोन एक्स्पर्टसोबत एकदा जरूर चर्चा करा नोब्रोकर ईएमआय कॅल्कुलेटर सर्विसची मदत घेऊन तुम्ही तुमच्या ईएमआयची गणना करू शकताemi information in marathi :
EMI चा फुल्ल फॉर्म Equated Monthly Installment हा आहे; म्हणजेच मराठीत समान मासिक हप्ता होय. दर महिन्याला ठराविक रक्कम भरून घेतलेल्या कर्जाची केलेली परतफेड म्हणजे EMI होय. ग्राहकांना कर्ज फेडणे सोपे व्हावे म्हणून वित्तीय संस्थेने केलेली ही एक व्यवस्था आहे, असे आपण म्हणू शकतो.
ईएमआयचा निश्चित कालावधी व व्याजदर असतो; जो कर्जाच्या प्रकारावरून ठरवला जातो. याचे काही फायदे तर काही तोटे देखील आहेत. हा हप्ता तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन यांपैकी कोणत्याही माध्यमांतून भरू शकता. हप्ता लेट भरल्यास किंवा चुकल्यास बाऊन्स चार्जेस् व लेट चार्जेस् आकारले जातात.
EMI चे फायदे :
एखादी प्रॉपर्टी किंवा वस्तू सध्या बजेटमध्ये नसल्यास पण खरेदी करणे भाग असल्यास किंवा आवश्यक असल्यास ईएमआय ऑप्शनचा अवलंब करून तुम्ही खरेदी करू शकता. ज्यामुळे तुम्हांला सगळी रक्कम एकदाच भरावी लागत नाही.
EMI चा कालावधी निवडण्याचे स्वातंत्र्य असते तुम्ही तुमच्या मासिक उत्पन्नावरून ते निवडू शकता जेणेकरून तुम्हांला हप्ते भरण्यात अडचण निर्माण होणार नाही, ईएमआय गणकाच्या आधारे नियोजनाची संधी तुम्हांला इथे असते.
EMI चे तोटे :
अधिक रकमेची परतफेड ग्राहकाला करावी लागते शिवाय बरीच महीने त्यांत अडकून राहावे लागते.
जर हप्ते वेळेवर भरले गेले नाही तर तुमच्या क्रेडिट किंवा सिबिल स्कोअरवर त्याचा परिणाम होतो. यामुळे भविष्यात आर्थिक व्यवहार करताना तुम्हांला समस्या उद्भवू शकते.
EMI कॅल्कुलेटर :
खाली दिलेल्या सूत्रावरून तुम्ही तुमचा ईएमआय काढू शकता, सूत्र;
= कर्जाची रक्कम x व्याजदर x (१ + व्याजदर)^कालावधी / [(१ + व्याजदर)^कालावधी – १]
तर, तुम्हांला ‘emi mhanje kay’ त्याचे फायदे-तोटे आणि कॅलक्युलेशन यासंबंधीची माहिती मिळाली असेल. ईएमआयवर जर तुम्ही एखादा व्यवहार करणार असाल तर त्याचे गणित समजून घ्या.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
होम लोनसाठी लागणारी कागदपत्रे सिबिल स्कोअर म्हणजे काय ? आयटी रिटर्न म्हणजे काय ?Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
EMI mhanje kay?
Adinath
1672Views
1 Year
2023-04-10T17:00:37+00:00 2023-06-16T15:20:22+00:00Comment
1 Answers
Share