Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Legal / घर खरेदी करण्यापूर्वी तपासण्यासारख्या गोष्टी
Q.

घर खरेदी करण्यापूर्वी तपासण्यासारख्या गोष्टी

view 1416Views

1 Year

Comment

1 Answers

Send
0 2023-03-31T09:52:51+00:00

कोणतीही वस्तू खरेदी करताना किंवा सेवा घेताना त्याची शहानिशा करणे हिताचे असते. जेणेकरून भविष्यात त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, हा त्यामागचा हेतू असतो. मग ती दैनंदिन वापरातील एखादी छोटी वस्तू असो किंवा घर खरेदी असो. एक सुजाण नागरिक किंवा ग्राहक म्हणून स्वत:चं घर खरेदी करण्यापूर्वी तपासण्यासारख्या गोष्टी कोणत्या? याची तुम्हांला अवश्य माहिती असायला हवी.

कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचं घर म्हणजे नुसत्या भिंतींचं बांधकाम नसतं. त्याच्यासाठी ते त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं एक हक्काचं सुरक्षित असं विश्व असतं. त्यामुळे नवीन घर घेताना घ्यावयाची काळजी विशेष महत्वाची ठरते. सर्वांत आधी तुम्ही खरेदी करत असलेल्या घराचे सगळे पुरावे अधिकृत असल्याची खात्री करून घ्या. त्यांत घराची जागा, त्याचे बांधकाम, त्याच्या मालकी हक्काबाबतच्या सगळ्या पुराव्यांचा समावेश होतो. त्यासोबतच वीज व पाण्याची सोय, सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठीची व्यवस्था कशी आहे, ते बघून घ्या. मुख्य म्हणजे बाजारपेठ व इतर अत्यावश्यक सुविधा घरापासून किती अंतरावर आहेत, याबद्दलची माहिती जाणून घ्या. तेथील एकंदर परिसर, तिथले वातावरण व सुरक्षा याविषयीची अनुकूलताही तपासावी. एखादं घर खरेदी करणे ही दीर्घ काळासाठी नियोजित केलेली प्रक्रिया असते. त्यासाठी नवीन घर खरेदी करत असताना संबंधित तज्ञांचा योग्य सल्ला ऐकावा. त्यानुसार विचारपूर्वक निर्णय घ्यावे व विश्वासपात्र असणाऱ्या स्त्रोताच्या मदतीने घर खरेदी करावे. तुमच्यासाठी ते नक्की फायद्याचे व समाधानाचे ठरेल.                

उत्तम व योग्य दरात घरगुती सेवा मिळवण्यासाठी नो ब्रोकर प्रोफेशनल होम सर्विसेससोबत संपर्क साधा

घर खरेदी करताना आवश्यक कागदपत्रे :

नवीन घर खरेदी करताना आवश्यक कागदपत्रे पडताळण्याची गरज असते. ती सर्व कागदपत्रे खाली दिलेल्या यादीत नमूद केले आहे,

  • NA प्रमाणपत्र/बिगरशेती परवाना

  • भोगवटा प्रमाणपत्र

  • ना हरकत प्रमाणपत्र/NOC

  • बांधकामाचा मंजूर झालेला नकाशा

  • बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पांसंबंधी पुरावे  

  • शपथपत्र, खरेदीखत व विक्री करार पत्रक

  • साक्षीदारांचे ओळखपत्र

  • मालकी हक्काबाबतची कागदपत्रे

  • स्थानिक/पालिका अधिकाऱ्याची परवानगी मिळालेले दाखले 

  • नागरिकत्वाचा व निवासाचा दाखला देणारे कोणतेही अधिकृत ओळखपत्र

     

संबंधित विषय येथे वाचा :

वास्तुशांती का करावी ? वास्तुशास्त्रानुसार घराचा रंग कसा असावा ? मनी प्लांट कोणत्या दिशेला लावावे ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners