Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Legal / घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे?
Q.

घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे?

view 6900Views

1 Year

Comment

1 Answers

Send
1 2023-03-15T14:23:33+00:00

कायदेशीर पद्धतीने एखादे काम करताना कागदपत्रांना अतिशय महत्व असते. आवश्यक ती कागदपत्रे सादर झाल्याखेरीज ते काम पूर्ण होतंच नाही. आता आपल्या घराचेच उदाहरण घ्या; घराची खरेदी-विक्री, घराची नोंदणी-वारस नोंदणी, घर भाड्याने देणे-घेणे, कर्जाचे व्यवहार या सर्वांत कागदपत्रे लागतातच. त्याबद्दल आपण सजग असायला हवे. आता आपण घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती, याची माहिती जाणून घेऊया.  

घर तुम्ही स्वत: बांधले असल्यास ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत घराची नोंद करावी. तिथे तुम्ही तुमच्या नावे घराची नोंदणी करू शकता. जर घर वाडवडिलांचे असेल तर त्यांच्या परवानगीने अथवा वारसा हक्काने घर अधिकृतरित्या तुमच्या नावावर होते. त्याकरिता वारस दाखला काढावा लागतो. वडिलांच्या नंतर घराचे अधिकार मिळवायचे असल्यास मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करावा. ते सादर केल्याशिवाय हक्क मान्य केले जात नाही. शिवाय, काहीवेळा वादाचे प्रसंग उद्भवल्यास तुम्ही ‘घर नावावर करण्यासाठी काय करावे लागेल’ याबाबत तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

घरासंबंधी कायदेशीर व्यवहारात नो ब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् चा सल्ला घेणे उचित ठरेल
  •  वैध माहितीनिशी भरलेला अर्ज

  •  

    कोर्टाचा स्टॅंप

  •  घराच्या नोंदणीचा पुरावा

  •  

    भोगवटा प्रमाणपत्र

  •  

    मृत्यूचा दाखला

  •  अर्जदाराचे ओळखपत्र

  •  

    फोटो

  •  

    वारसदारांचे प्रतिज्ञापत्र

  •  

    पत्त्याचा अधिकृत पुरावा

उपरोक्त कागदपत्रे तुमच्याजवळ असावीत. तर एकंदर, ‘घर नावावर कसे करावे’ हा प्रश्न जर तुम्हांला पडला असेल तर आधी कागदपत्रांची पूर्तता करावी. मगच पुढची प्रक्रिया कायदेशीररित्या सुरळीत पार पडते.   

संबंधित आणखी काही विषय :

वारस दाखल कसा काढावा ? घराची वारस नोंद कशी करावी ? जुने फेरफार कसे काढावे ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners