‘आपलं घर’ किंवा ‘माझं घर’ असं जेव्हा आपण उच्चारतो; आपसूकच एक जिव्हाळ्याची भावना त्या शब्दांतून उमटते. ते साहजिकच आहे, प्रत्येकाची स्वत:च्या घरासोबत भावनिक नाळ जोडली गेली असते. घराचे हक्क वाडवडिलांकडून त्यांच्या वारसदारांकडे सोपवले जातात. पण, त्यासाठी तुम्हांला कायदेशीर नोंदणी करावी लागते. भविष्यात घरहक्काच्या संदर्भात अडचण किंवा वाद निर्माण होऊ नये, म्हणून ‘घराची वारस नोंद कशी करावी’ याबाबत तुम्ही जागरूक असायला हवे.
वारसा नोंद म्हणजे काय ?
घर किंवा जमीन असो वा ऐवज त्यांवरील अधिकार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द होत असतात. हे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हांला एका न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागते. ती कायदेशीर प्रक्रिया म्हणजे ‘वारसा नोंद’ होय. वारसा नोंदणीच्या सगळ्या पायऱ्या नाहरकत पूर्ण झाल्यावर अर्जदाराला न्यायालयातर्फे वारसा हक्क प्रमाणपत्र प्रमाणित केले जाते.
प्रॉपर्टी संदर्भातील कायदेशीर कामांत तुम्ही नो ब्रोकरच्या प्रोफेशनल लीगल सर्विसची मदत घेऊ शकता
वारसा हक्क प्रमाणपत्र कसे काढावे ?
तुम्हांला वारसा हक्क प्रमाणपत्र कशासंदर्भात हवे आहे, त्याचे व्यवस्थित चतु:सीमा वर्णन अर्जात नमूद करावे. तुम्ही तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या दिवाणी न्यायालयात हा अर्ज करू शकता. या कायदेशीर वारस प्रमाणपत्राची किंमत ठरवण्यासाठी स्लॅब दिले गेले आहेत. त्यावरून वॅल्यूएशन टक्केवारी काढली जाते. त्यानुसार स्टॅम्प लागतो. अर्ज देताना दहा रुपयाचे कोर्ट फी स्टॅंप लावावे लागते. अर्ज दाखल केल्यानंतर कोर्टातर्फे जाहीर नोटिस प्रसिद्ध होते. साधारण तीस ते चाळीस दिवसांचा कालावधी लागतो.
घर नावावर करण्यासाठी काय करावे लागेल, या विचारात जर तुम्ही असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा. जर वडिलांच्या पश्चात मान्यताप्राप्त वारस म्हणून घर नावाने करायचे असल्यास खालील कागदपत्रे सादर करावीत. कायदेशीर पडताळणी दरम्यान सर्व नोंदी प्रक्रिया विनावाद व विनात्रुटि पार पडल्यानंतर घर अधिकृतरित्या तुमच्या नावे होते.
वैध माहितीनिशी भरलेला अर्ज
कोर्टाचा स्टॅम्प
घराच्या नोंदणीचा व पत्त्याचा अधिकृत पुरावा
मृत्यूचा दाखला
अर्जदाराचे ओळखपत्र,
वारसदारांचे प्रतिज्ञापत्र व फोटो
संबंधित विषय :
जुने फेरफार कसे काढावे ? वारस दाखला कसा काढावा ?Your Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
घराची वारस नोंद कशी करावी ?
PriyankaM
7080 Views
1 Answers
1 Year
2023-02-16T12:12:00+00:00 2023-06-16T16:48:33+00:00Comment
Share