Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

घरात मोरपंख कुठे ठेवावे?

view 842 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-03-31T09:39:31+00:00

आपलं घर आपण मोठ्या कष्टाने उभं केलेलं असतं. त्या घरात जन्माची नाती असतात, ज्यांच्यासमवेत आपल्याला आनंदात आयुष्य जगायचं असतं. प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या घरात सुख-समृद्धी नांदावी, आपल्या घराचे वैभव टिकून राहावे. असं वाटणंही साहजिक आहे; त्यासाठी कळत नकळत एक ना अनेक उपाय आपल्या हातून केले जात असतात. जसे घराला कोणता रंग द्यावा, मनी प्लांट किंवा घरात आरसा कुठे लावावा, वगैरे. याठिकाणी ‘घरात मोरपंख कुठे ठेवावे’ त्याने काय बदल होतात, ते कशासाठी घरात ठेवले जाते, हे आपण बघूया. 

तुमच्या घराच्या नूतनीकरणासाठी नो ब्रोकर प्रोफेशनल होम इंटिरियर सर्विसेस् शी जरूर संपर्क साधा

 

मोराच्या सुंदरतेचे कितीही कौतुक केले तर ते कमीच. निसर्गाच्या प्रत्येक रचनेमागे वैशिष्ट्य आहे. माता सरस्वती, भगवान गणेश व कार्तिक, श्रीकृष्णाला देखील मोर प्रिय होते. वेद-पुराणात, शास्त्रात याला खूप महत्व आहे. ‘

mor pankh vastu shastra

’ सांगते की, दक्षिण दिशेला मोरपंख ठेवल्याने आर्थिक सामर्थ्य-समृद्धी प्राप्त होते. पूर्व-पश्चिम दिशेला मोरपंख ठेवल्याने जर एखाद्याला राहू दोष असेल तर तो कमी होतो. तुमच्या घरात ईशान्य किंवा आग्नेय कोपऱ्यातसुद्धा तुम्ही एकापेक्षा अधिक मोराची पिसे एकत्र ठेऊ शकता. जी कोणत्या दिशेला तुम्ही मोरपंख ठेवणार असाल ते सर्वांना दिसण्यासारखे ठेवा म्हणजे घरातील सगळ्यांची जाता-येता त्यावर नजर पडेल, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा मिळेल. घरातील वाद-विघ्ने टळतील

.

मोरपंखाच्या प्रभावाने वास्तुदोष नाहीसे होते. शिवाय, एखाद्याशी जर आपले बिनसले असेल तर त्याच्या नावचे मोरपंख जवळ ठेवल्याने ते संबंध सुधारतील, अशी धारणा आहे. अभ्यासाच्या खोलीत मोरपिस ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच तिजोरीमध्ये मोरपिस ठेवल्याने बरकत येते. तर,

mor pankh vastu

याविषयी पुरेपूर माहिती तुम्हांला ज्ञात झाली असेल, या मोरपंखाला किंवा मोऱ्याच्या चित्राला, मूर्तीला इतके महत्व का दिले जाते, हे तुम्ही जाणून घेतले असावे. घरात मोरपणख ठेवल्याने घराची शोभा तर वाढतेच याचबरोबर आर्थिक, शैक्षणिक, वैवाहिक अडचणी दूर होतील. अपेक्षित यश मिळेल, मन उत्साही राहील भरभराट होईल.

याच्याशी संबंधित आणखी विषय येथे वाचा :

आरसा कोणत्या दिशेला असावा ? मनी प्लांट कोणत्या दिशेला लावावे ? वास्तुशांती का करावी ? 

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners