घरासंबंधित एक ना अनेक कामे असतात. काही कामे कायद्याला धरून करावी लागतात. ही कामे रीतसर त्या-त्या वेळी पूर्ण न झाल्यास पुढे व्यत्यय येतो. यांत ‘घर नावावर करणे, वारस दाखला काढणे, घरपट्टी नावावर करणे अर्ज कसा भरायचा’ यासारख्या कामांचा समावेश होतो. तुम्ही संबंधितांसमवेत किंवा तज्ञांशी चर्चा करून याची सखोल माहिती घ्यायला हवी.
आता घरपट्टीचा अंतर्भाव मालमत्ता करामध्ये होतो. व्यक्तिच्या किंवा संस्थांच्या अधिकारात असलेल्या मालमत्तेवर ‘मालमत्ता कर’ आकारण्यात येतो. ती मालमत्ता स्पर्श करण्याजोगी अर्थात टॅन्जेबल असावी. त्यांत घर, सदनिका, संस्था इत्यादींचा समावेश होतो. मालमत्ता कर ‘प्रॉपर्टी टॅक्स, घरफाळा, घरपट्टी’ अशा नावांनी ओळखले जाते.
नो ब्रोकरच्या प्रोफेशनल होम सर्विसेसची भेट घेऊन तुमच्या घरासाठी उत्तम सेवांचा लाभ मिळवानव्याने बांधलेल्या घराची घरपट्टी नावावर करण्याकरीता त्या घराची नोंदणी करावी. त्यासाठी तुमच्या ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या ठिकाणी तुम्हांला अर्ज द्यावा लागेल. तुम्ही हा अर्ज ग्रामसेवक, सरपंच अथवा संबंधित अधिकाऱ्याच्या नावाने करू शकता. त्या अर्जा समवेत खाली नमूद केलेली काही कागदपत्रे जोडायची असतात. त्या कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेनंतर ठराविक कालावधीत तुमच्या घराचा उतारा तुम्हांला सुपूर्त करण्यात येतो. नंतर, तुमच्या नावे घरपट्टी आकारणी सुरु होते.
७/१२ उतारा
ओळखपत्र
चतु:सीमा स्टॅम्प
संमती पत्रक
जागेचं खरेदी खत
वारस हक्क प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
मृत्यु प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
संबंधित आणखी विषय :
मालमत्ता कर म्हणजे काय ? घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रेYour Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Related Questions
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
घरपट्टी नावावर करणे अर्ज?
Raghunath
8117 Views
1 Answers
1 Year
2023-03-10T19:52:35+00:00 2023-06-16T14:56:45+00:00Comment
Share