Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

उत्पन्न प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज

view 4153 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
3 2023-03-31T10:02:19+00:00

शिक्षण घेत असताना किंवा बाकीच्या व्यवहारांत उत्पन्न प्रमाणपत्र प्रस्तुत करणे अनिवार्य असते. याला उत्पन्न दाखला असेही म्हणतात, हे एक वर्षाचे किंवा तीन वर्षाचे काढले जाते. यासाठी अर्ज देताना काही कागदपत्रे जोडावी लागतात. ही कामे ऑनलाइनसुद्धा सहज शक्य झाली आहेत. आपण उत्पन्न प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज कसा करतात, income certificate meaning in marathi यासंदर्भात माहिती जाणून घेऊ.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी, इतर अनुदान मिळण्याबाबत तसेच काही अन्य व्यवहारासाठी उत्पन्न दाखला काढावा लागतो. मग त्या व्यक्तीची पात्रता सिद्ध होते. त्याची संबंधित व्यावहारिक कामे पूर्ण होतात. उत्पन्न दाखल्यामध्ये विशिष्ट कालावधीपर्यन्तची तुमची उत्पन्न मर्यादा दिलेली असते. अर्ज दिल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांत उत्पन्न प्रमाणपत्र मिळते.   

तुमच्या मालमत्ता व्यवहारातील कायदेशीर कामाबाबत नो ब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसला संपर्क करा

ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या महा ई-सेवा केंद्राला किंवा

aaplesarkar.mahaonline.gov.in

या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तिथे यूजरनेम व पासवर्ड टाका. तुमच्या नावासोबत जन्म तारखेची (आधार कार्डवर असल्याप्रमाणे), मोबाइल नंबर किंवा ई-मेल नोंद करून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा. तुमचे अकाऊंट क्रिएट झाल्यानंतर मेसेज येईल. वेबसाइटवर लॉगिन केल्यानंतर महसूल विभागावर क्लिक करावे. त्याचे उपविभागात महसूल सेवा या पर्यायांतर्गत ‘उत्पन्न दाखला’ यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरा व डॉक्युमेंट्स अपलोड करा. ऑनलाइन उत्पन्न दाखला कमी वेळेत प्राप्त होतो तसेच घरबसल्या हा अर्ज तुम्ही भरू शकता. तहसीलदारमार्फत हा दाखला प्रमाणित केला जातो.  

उत्पन्न दाखला किंवा उत्पन्न प्रमाणपत्र (income certificate in marathi) यासाठी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात, ते पाहूया.

  •   

    रेशन कार्ड

  •  ओळख पत्र जसे आधार कार्ड 

  •  

    राहत्या पत्त्याचा पुरावा

  •  फोटो

  •  

    बोनाफाईड सर्टिफिकेट

  •  स्वयंघोषणापत्र व स्वाक्षरी

  •  

    उत्पन्न दर्शविणारी संबंधित कागदपत्रे

  •  मेडिकल सर्टिफिकेट (वैद्यकीय साहायता हवी असल्यास)

अशाप्रकारे, ‘उत्पन्न दाखला ऑनलाइन कसा काढतात’ ही प्रक्रिया तुम्ही येथे जाणून घेतली.

संबंधित विषय येथे वाचा :

पॅन कार्ड कसे काढावे ? जन्म दाखला कसा काढायचा ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners