Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

आयटी रिटर्न म्हणजे काय?

view 180 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-04-27T15:25:50+00:00

आपण नेहमीच्या व्यवहारात ‘टॅक्स’ बद्दल ऐकत-बोलत असतो. चारचौघांच्या गप्पांत कधीकधी हा चर्चेसाठी खास विषय ही ठरतो. बहुतेक जण असं मानून चालतात की टॅक्स किंवा कर भरणे म्हणजे आपल्या पैशाचा अपव्यय आहे; सरकारच्या तिजोरीत आपला पैसा जातो, वगैरे. पण, तसं नाहीय त्यात टॅक्स भरणाऱ्याचाही फायदा आहे. तर, इथे आपण ‘आयटी रिटर्न म्हणजे काय’ त्याचे काय-काय नियम आहेत ते जाणून घेऊया.

तुमच्या मालमत्ता नियोजनासाठी नोब्रोकर प्रोफेशनल प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्विसेस् ला आजच भेट द्या  

ITR म्हणजे काय?

उत्पन्न अर्थात वेतन किंवा व्यवसाय यावरील कर म्हणजेच आयकर; आपल्याला आपल्या वर्षभरातील उत्पन्नावर एक ठराविक रक्कम सरकारला द्यावी लागते, त्याला ITR (प्राप्तिकर परतावा) म्हणतात. कर भरणारा करदाता होतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन ITR फाइल करू शकता. आर्थिक सालाप्रमाणे हा टॅक्स आकारला जातो. यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स खाली दिले आहेत,  

  • पॅन कार्ड व आधार कार्ड

  • बँकेचे स्टेटमेंट  

  • पगारीची स्लिप   

  •  

    मालमत्तेची कागदपत्रे

  •  

    गुंतवणुकीची कागदपत्रे

  •  

    फॉर्म क्रमांक १६

  •  

    फॉर्म क्रमांक २६A

आता ‘it return mhanje kay’ याची व्याख्या बघितली यानंतर इन्कम टॅक्स भरणे का इतके महत्वाचे आहे ते बघूया,   

  •  

    सर्वांत महत्वाचे म्हणजे तुम्ही कायद्याचे पालन करून नियमित टॅक्स भरणारे आदर्श नागरिक सिद्ध होता; यामुळे तुम्ही करचुकवेगिरीच्या दंडापासून मुक्त होता. टॅक्स क्लियर असेल तर भविष्यात तुम्हांला अधिकच्या समस्या उद्भवणार नाहीत.

  • व्हिसा हवा असल्यास, क्रेडिट कार्डसाठीसुद्धा ITR पावती आवश्यक असते

  • त्याचप्रमाणे तुम्ही टॅक्स रिफंडसाठी क्लेम करू शकता

  •  

    तुम्ही भरत असलेला कर तुमच्या उत्पन्नाचा एक अधिकृत पुरावा म्हणून देखील तुम्ही सादर करू शकता.

     
  • नियमित इन्कम टॅक्स भरत असल्यास बँकेकडून तुम्हांला कोणत्याही प्रकारचा कर्ज सहज प्राप्त होऊ शकतो. तुमचे रेकॉर्ड पारदर्शक राहतात.

  • तुम्ही भरलेल्या टॅक्सचा उपयोग देशातील विविध विकास प्रकल्प, योजना, सुविधा यांना चलन देण्यासाठी होतो; यात देशाचे व तुमचे हित आहे याने दुहेरी हेतूसाध्य होतो.

उपरोक्त पॉईंट्सवरून ‘income tax return mhanje kay’ हे रीतसर पाहिलं पण जर का तुम्ही ITR भरणे टाळत असाल तर अधिकच्या समस्यांना सामोरे जावे लागेल, तुमची बहुतेक आवश्यक कामे रखडतील. तर, तुम्हांला ‘इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय’ याबद्दल आवश्यक ती माहिती प्राप्त झाली असेल, ते भरणे किती महत्वाचे त्यामुळे कोणते फायदे होतात याबद्दल तुम्हांला कल्पना आली असेल.  

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क दर EMI म्हणजे काय ? सिबिल स्कोअर म्हणजे काय ?
Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners