Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

जागा नावावर कशी करावी?

view 8577 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
2 2023-04-27T00:17:21+00:00

घर, जागा-जमीन किंवा शेत कोणतीही मालमत्ता असो त्यावर संबंधित व्यक्तीच्या नावे अधिकार असल्याची अधिकृत पावती ही हवीच. ती एक रीतसर कायदेशीर प्रक्रिया असते जी पूर्ण होण्यासाठी ठराविक कालावधी लागतो. शिवाय, तुम्हांला काही कागदपत्रेही संलग्न करावी लागतात. तर, जमीन नावावर करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात, हे जाणून घेऊया.

तुमच्या जमिनीसंदर्भात कायदेशीर कामांसाठी नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् ला संपर्क साधा

जमीन नावावर कशी करावी ?

जमीन वडिलोपार्जित असेल तर ती तुम्ही तीन प्रकारे तुमच्या नावे करून घेऊ शकता, ते म्हणजे-

  • तहसीलदाराकडे अर्ज करणे

  • दुय्यम निबंधकासमोर जमिनीचे वाटप करणे   

  • दिवाणी न्यायालयात जागा वाटपचा दावा दाखल करणे

जर सर्व वारसदारांची अनुमति असल्यास तुम्ही महाराष्ट्र अधिनियम महसूल कायदा १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत तहसीलदाराकडे jaga navavar karne करण्याचा अर्ज करू शकता.

जमीन नावावर करणे या प्रक्रियेत खालील बाबी अवश्य तपासा :

  • जमीन स्वकष्टाची आहे की वडिलोपार्जित हे तुम्हांला माहित असावे लागते, त्यानंतर ७/१२ वरील नोंदी, फेरफार नोंदीची खात्री करून घ्यावी

  • संबंधित जमिनीचा कर भरलेली पावती

  • जमिनीवर बोजा किंवा कोर्टात वाद चालू आहे का, याबद्दल चौकशी करावी.

  • तोंडी सांगितलेली जमीन तसेच प्रत्यक्ष पाहण्यातली व व्यवहारतली जमीन सारखीच असल्याची खात्री करून घ्यावी. 

  • त्या जमिनीची कागदपत्रे पडताळावीत व jamin navavar karne यासाठी तुमची कागदपत्रे तयार असावीत जसे; 

  1. खरेदीखत 

  2. सातबारा

  3. स्टॅम्प ड्यूटि

  4. साक्षीदार ओळखपत्र

  5. प्रतिज्ञापत्र

  6. NA ऑर्डर

‘जमीन नावावर करण्यासाठी किती खर्च येतो’ 

हा खर्च प्रॉपर्टीच्या स्वरूपावरून ठरतो. जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया ही शंभर रूपयांच्या बॉन्डवर करता येते. अशाप्रकरे jamin navavar kashi karavi किंवा जागा नावावर कशी करावी यासंदर्भात रीतसर प्रक्रिया तुम्ही याठिकाणी जाणून घेतली.. 

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

वडिलोपार्जित जमीन नावावर करणे वारस नोंद किती दिवसात होते ? 1 एकर म्हणजे किती गुंठे ?  

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners