Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

जमीन खरेदी विक्री नियम

view 1906 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-03-31T09:54:52+00:00

दररोज मालमत्तेशी संबंधित कित्येक व्यवहार केले जातात. जसे घर, फ्लॅट, जागा खरेदी-विक्री इत्यादी. हे सगळे व्यवहार काही विशेष नियमांतर्गत केले तरच ते ग्राह्य धरले जातात. त्यासाठी अशा मालमत्ता व्यवहारासंबंधीच्या, कायदेशीर प्रक्रिया व कागदपत्रांविषयी तुम्हांला माहिती असावी. याठिकाणी आपण जमीन खरेदी विक्री नियम कोणकोणते असतात, ते बघूया.

शेत जमीन, बिगर शेतीची जमीन किंवा प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात काही बाबींची खात्री करून घेणे आवश्यक असते. अन्यथा, भविष्यात तुम्हांला समस्या निर्माण होण्याच्या शक्यता असतात. रजिस्ट्रार ऑफिसमध्ये तुम्ही केलेल्या जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी करावी. खरेदीखतासाठी सातबारा, फेरफार, स्टॅम्प ड्युटी रिसिट, बॉन्ड पेपर, एनए ऑर्डर, दोन साक्षीदार व्यक्तींचे ओळखपत्र आदी कागदपत्रे प्रस्तुत करावी लागतात. वारसाची संमती नसल्यास, जमीन गहाण ठेवलेली असल्यास किंवा एकच जमीन दाखवून एकापेक्षा जास्त लोकांशी व्यवहार केला असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही संबंधित जमिनीची खरेदी-विक्री करू शकत नाही. वाटणीपत्रात सगळ्या वारसांची नावे असावीत व ७/१२ उताऱ्यातील मयत व्यक्तीचे नाव कमी केलेले असावे. धार्मिक स्थळ असलेली जमीन तुम्ही परस्पर खरेदी-विक्री करू शकत नाही; त्याला महाराष्ट्र शासनाची अधिकृत संमती घ्यावी लागते.       

जमिन खरेदी-विक्रीच्या कायदेशीर व्यवहारांत नोब्रोकर लीगल सर्विसेसशी एकदा नक्की संपर्क करा

शेतजमीन खरेदी-विक्री नियम :

  • प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन खरेदी करताना जिल्हाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असते. तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, १९४७ अंतर्गत शेतीच्या जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले आहे.

  • वरकस शेतजमिनीचे २० गुंठे, बागायत शेतजमिनीचे २० गुंठे तर कोरडवाहू किंवा जिरायत शेतजमिनीचे १५ गुंठे इतके प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आले आहे.

       

संबंधित विषय येथे वाचा :

जुने फेरफार कसे काढावे ? १ एकर म्हणजे किती गुंठे ? 

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners