Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Legal / जमीन मोजणी कशी करावी
Q.

जमीन मोजणी कशी करावी

view 2231Views

1 Year

Comment

1 Answers

Send
4 2023-03-15T14:05:11+00:00

दैनंदिन जीवनात बरंच काही मोजून मापून विकत घेतो किंवा देतो. मालमत्तेच्या व्यवहारातदेखील प्रमाणबद्ध किंवा अचूक मोजणी अपेक्षित असते. जमीन, जागा, चटई क्षेत्र इत्यादीं मोजण्यासाठी ठराविक मापने प्रचलित आहेत. आपल्याला जमीन मोजणी कशी करावी, जमिनीची मोजणी करण्याचे एकक कोणते असतात, याबद्दलचे ज्ञान असणे उपयोगाचे ठरते.

फेरफार किंवा ७/१२ उतारा अशा प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर जमिनीचा प्रकार, सीमा, आकार आदी बाबी नमूद असतात. ते कसं वाचायचं, त्यांत काही विशेष शब्द आले असतील तर त्यांचा अर्थ माहिती करून घ्यायला हवा. जसे जमीन आपल्या येथे गुंठ्यांत मोजतात. आता १ गुंठा म्हणजे किती स्क्वेर फूट जमीन मग त्याचे एकरमध्ये कसे रूपांतर करतात हे जाणून घेऊ. ३३ बाय ३३ म्हणजेच १०८९ स्क्वेर फूटांचा १ गुंठा असतो आणि एका एकरात एकूण ४० गुंठे असतात. याचाच अर्थ एक एकर म्हणजे ४३५६० स्क्वेर फूट जमीन होय. २.४७ एकर म्हणजे १०७६३६ स्क्वेर फूटांची जमीन एक हेक्टर म्हणून गणतात.      

जमिनीच्या कायदेशीर व्यवहाराबाबत नो ब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् सोबत आजच संपर्क साधा

खरेदी-विक्री व्यवहारात तसेच एखादा वाद उद्भवल्यामुळे जागेची किंवा शेतजमिनीची अधिकृतरित्या मोजणी करावी लागते. त्याकरिता तुम्हांला अर्ज द्यावे लागते. तालुक्याच्या संबंधित अधिक्षकाकडे किंवा नगरपालिका अधिकाऱ्याकडे काही कागदपत्रांसह तुम्ही जमीन मोजणीबाबतचा अर्ज करू शकता. महाराष्ट्र भूमी अभिलेखाच्या संकेतस्थळावर नमूना अर्ज उपलब्ध आहे. तुमच्या जमीन मोजणीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर दोन ते सहा महिन्याच्या कालावधीत मोजणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यासाठी जमिनीच्या क्षेत्रफळानुसार शुल्क आकारण्यात येते. तर, जमिनीचे मोजमाप व जमीन मोजणी अर्ज याविषयी आवश्यक ती माहिती तुम्हांला मिळाली असेल. मालमत्तेच्या व्यवहारात शासकीय पद्धतीची जमीन मोजणी ग्राह्य धरली जाते. म्हणूनच, या मोजणी प्रक्रियेला महत्व आहे.     

संबंधित आणखी काही विषय :

७/१२ उतारा कार्पेट एरिया म्हणजे काय ? जुने फेरफार कसे काढावे ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners