Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Legal / जन्म दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
Q.

जन्म दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

view 11283Views

1 Year

Read More

Comment

1 Answers

1 2023-03-31T10:10:54+00:00

अमुक अधिकृत दाखले सादर न केल्याने आपली कित्येक महत्वाची कामे रखडतात. त्या-त्या वेळी दाखले काढून घेणे आवश्यक असते. नंतर परत ऐनवेळी अडचणी निर्माण होतात. जन्म दाखला हा साक्षात आपल्या अस्तित्वाचा पुरावा होय. हा दाखला कसा काढला जातो त्याचबरोबर जन्म दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती, यासंबंधीची माहिती पाहूया.

प्रत्येकाकडे त्याचा जन्म दाखला असावाच; कारण, जन्म प्रमाणपत्रांत आपलं जन्मस्थान, लिंग, तारीख व वेळ, आई-वडिलांसह आपली ओळख नमूद केलेले असते. बाळाच्या जन्मानंतर २१ दिवसांच्या आत जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा.

प्रॉपर्टी व्यवहारातील कागदपत्रांविषयीच्या अडचणीसंदर्भात नो ब्रोकर लीगल सर्विसशी जरूर संपर्क साधा

जन्म दाखला काढण्यासाठी खाली नमूद केलेली कागदपत्रे जोडावी लागतात,

  • पालकांचे ओळखपत्र  

  • जन्मस्थान संबंधी पुरावा  

  • पालकांच्या लग्नाचे प्रमाणपत्र (पर्यायी)

विलंबित जन्म नोंदणी असल्यास जन्म प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे,

  •  

    अर्जदाराचे ओळखपत्र

  •  

    शाळा सोडल्याचा दाखला

  •  आई-वडिलांचे ओळखपत्र

  •  जन्म झालेल्या रुग्णालयाचे प्रमाणपत्र  

  •  जन्म रुग्णालयात न झाल्यास पालकांचे शपथपत्र

 

संबंधित रुग्णालयात बाळाच्या जन्माची नोंदणी करणे आवश्यक असते. तुमच्या स्थानिक जन्म नोंदणी अधिकाऱ्याकडे जन्म प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे अर्ज द्यावे. जर तुम्ही वयाच्या सहा वर्षानंतर जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करत असाल तर अर्जासोबत स्टॅम्पसह बॉन्ड पेपर (शपथपत्र), वैद्यकीय अधिकारी तसेच स्थानिक प्रतिनिधीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.  

संबंधित विषय येथे वाचा :

जन्म दाखला कसा काढायचा ? उत्पन्न प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज

Most Viewed Questions

Recently Published Questions

include
Flat 25% off on Home Interiors

Premium Material with Quality Assurance and 10 Years Warranty