पौराणिक कथांमधून वृक्षवल्ली अन् पशुपक्षीसुद्धा त्या प्रसंगातील एक पात्र असल्याचे ज्ञात होते. अशा जीवांना किंवा त्यांच्या प्रतिरूपाला घरात स्थान देणे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. त्यांना प्राचीन काळापासून देवी-देवतांचे रूप मानून पूजण्याची प्रथा आहे. त्यांपैकी एक म्हणजे ‘कासव’ होय. त्याचप्रमाणे, भारतीय वास्तुशास्त्रात व चीनी वास्तुगाइड म्हणजेच फेंगशुईत कासवपालन शुभ असल्याचे सांगितले गेले आहे. यावरून असा अंदाज येतो की ‘जिवंत कासव घरात ठेवण्याचे फायदे काय-काय असतात’ हे जाणून घेऊन त्यावर अमल करण्यात आपले हितच असणार.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रभावी नूतनीकरणाकरिता नोब्रोकर इंटिरियर डिजायनर्सला कॉन्टॅक्ट करामंदिरात कासव का असते ?
पुराण कथेनुसार साक्षात भगवान विष्णूचा अवतार असलेला कासव मंदिराच्या प्रवेशद्वारी स्थापित केलेला असतो; कारण, काम-क्रोध-मोह-माया-मत्सर-अहंकार यांचा त्याग करून कासवाप्रमाणे नतमस्तक राहून भक्ताने मंदिरात दर्शनासाठी यावे हा त्यामागचा एक हेतू असतो तसेच ज्याप्रमाणे कासव पिलांना दूध न पाजता वात्सल्यमयी डोळ्यांतून ऊब देऊन मोठं करते त्याचप्रमाणे देवाचीही त्याच्या भक्तगणांवर तशीच कृपा राहो, अशीही त्यामागची भावना असते.
घरात कासव कसे ठेवावे ?
‘कासव घरात कुठे ठेवावे’ यासाठी वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य उपदिशा तसेच उत्तर-मध्य दिशा शुभ असल्याचे सांगितले आहे. मात्र, नैऋत्य उपदिशेला कासव कधीही ठेऊ नये.
jivant kasav gharat kuthe thevave असा जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही कासव हौदात किंवा पाण्याच्या टाकीत ठेऊ शकता टाकी ईशान्य किंवा उत्तर दिशेला असावी; त्यांत रंगीबेरंगी खडक, शंख-शिंपले, पाणवनस्पती, लाकडाचे तुकडे इत्यादींची व्यवस्था करा.
‘देवघरात कासव कसे ठेवावे’ याबद्दल सांगायचं तर देवघरात सोने, चांदी, पितळ, तांबे अशा धातूंची तसेच दगडी, स्फटिक, काच किंवा लाकडी कासवमूर्ती तुम्ही ठेऊ शकता.
घरात कासव का असावे ?
चिकाटी, संयम, सौहार्दता इत्यादी गुणवैशिष्ट्यांनी युक्त असलेला दीर्घायुषी कासव विपुलता, समृद्धी, मांगल्याचे व त्याच्या पाठीवरच्या टणक खवलांमुळे तो सुरक्षिततेचा प्रतीक मानला जातो. आर्थिक भरभराट व्हावी, स्वास्थ्य निरोगी-दीर्घायु राहावे, अशुभ घटना टळण्यासाठी घरात कासव पाळला जातो किंवा त्याच्या मूर्तीची स्थापना केली जाते. कासव ठेवताना पाण्यात किंवा तांदळात ठेवावा. त्याचे तोंड घराच्या बाहेरील दिशेला नसावे ते नेहमी आतल्या दिशेलाच असावे.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
आरसा कोणत्या दिशेला असावे घरात मोरपंख कुठे ठेवावे देवघरात शिवलिंग कसे ठेवावेShifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
कासव घरात कुठे ठेवावे?
Shubhankar
566Views
1 Year
2023-06-12T15:45:48+00:00 2023-06-27T14:06:48+00:00Comment
1 Answers
Share