Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

खालसा जमीन म्हणजे काय?

view 1702 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-03-31T09:57:06+00:00

आपण जमिनीची पूजा करतो, आई मानतो; अगदी प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आली आहे. पूर्वीपासूनच जमिनीला आदराचे स्थान दिले जाते, अधिकाराचे किंवा अर्थार्जनाचे स्त्रोत म्हणून बघितले जाते. आता मुघलांचे राज्य असताना जमिनीची संरचना कशी होती, ते बघू. त्यांपैकी ‘खालसा जमीन म्हणजे काय’ याप्रकारच्या जमिनीबाबत कोणते नियम-कायदे होते, त्याबद्दल जाणून घेऊ.   

मालमत्तेविषयीच्या कायदेशीर व्यवहारातील मार्गदर्शनासाठी नो ब्रोकर लीगल सर्विसेस् ला संपर्क करा  

बराच काळ म्हणजे जवळजवळ सोळाव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंत अनेक प्रांतात मुघल साम्राज्याचे अस्तित्व होते. मुघलांची सत्ता असताना जमिनीचे एकूण तीन विभागांत वर्गीकरण करण्यात आले होते,

  • जहागिर जमीन

  • सयूरगल जमीन  

  • खालसा जमीन

खालसा जमीन ही पूर्णत: बादशहाच्या अधिकारात असायची. त्या जमिनीतून जे काही उत्पन्न निघेल ते सरळ राजकोषात जमा व्हायचे. मग ते पैसे बादशहाच्या व्यक्तिगत म्हणजे त्याच्या व त्याच्या परिवाराच्या खर्चासाठी वापरले जायचे; जसे पोशाख, खाण्या-पिण्याची व्यवस्था, दरबारींचे पगार, युद्ध साहित्य किंवा प्रवास आदी. राज्याच्या साधारण वीस टक्के इतकी जमीन ही खालसा जमीन म्हणून घोषित असायची. ज्याच्या उत्पन्नावर राजाशिवाय इतर कुणीही अधिकार गाजवू शकत नव्हता. बादशहा अकबराने या खालसा जमिनीची हद्द वाढवली, जहांगिरने ती कमी केली; पुन्हा शाहजहानने त्याचा विस्तार केला, औरंगजेबाच्या काळात खालसा जमिनी तुकड्या-तुकड्यामध्ये जहागिरदारांना वाटण्यात आली. पुढे थोड्याच काळानंतर तिचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले.  

जहागीर जमिनी जहागीरदारांच्या अधिकारांत होत्या. या जमिनींतून निघणाऱ्या उत्पादनावर कर वसूल करण्याचे अधिकार राजाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना होते. जहागीरदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बादशहाकडून विभाग नेमले जायचे. सयूरगल जमिनी धार्मिक प्रतिनिधींना अनुदानांत दिल्या जायच्या, ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचा कर ते वसूल करत नव्हते. या जमिनी जास्ततर उत्पादन घेण्यासाठी अनुकूल नसायच्या.

तर अशाप्रकारे, खालसा जमीन म्हणजे काय असते, मुघल काळातील जमिनींच्या वर्गीकरणासंबंधी माहिती तुम्हांला ज्ञात झाली असेल.

याच्याशी संबंधित विषय :

जमीन खरेदी-विक्री नियम NA प्लॉट म्हणजे काय ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners