Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क दर?

view 2665 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-04-17T19:09:37+00:00

प्रॉपर्टी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क आकारला जातो. बऱ्याच ठिकाणी याला सरकारी फी असेही म्हटले जाते. ही फी भरणे अनिवार्य असते त्याशिवाय संबंधित व्यवहार अधिकृतरित्या पूर्ण होत नाही. हे मुद्रांक शुल्क प्रत्येक राज्यात एकच नसते; त्यात वेगळेपण असते, राज्य सरकारला स्टॅम्प ड्युटिचे दर ठरविण्याचे अधिकार असतात. आता महाराष्ट्र मुद्रांक शुल्क दर (mudrank shulk Maharashtra) काय आहेत, ते येथे पाहूया.  

तुमच्या प्रॉपर्टी संदर्भातील कायदेशीर कामांसाठी नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् ला भेट द्या

महाराष्ट्र मुद्रांक कायदा १९५८   

भारतीय मुद्रांक कायदा १८९९ च्या कलम ३ अंतर्गत महाराष्ट्र राज्यात मुद्रांक शुल्क भरणे बंधनकरक आहे. महाराष्ट्र मुद्रांक कायदा १९५८ च्यानुसार नोंदणी शुल्क मालमत्तेच्या १ टक्के इतके आहे. ३० लाख रकमेपर्यंतच्या मालमत्तेसाठी संबंधित रकमेच्या १ टक्के इतके नोंदणी शुल्क राहिल, मात्र ३० लाखाहून अधिक रकमेच्या मालमत्तेसाठी ते ३० हजारच मर्यादित राहील. एप्रिल २०२१ नुसार शहरात ६ टक्के, मुंबई शहर व उपनगरात ५ टक्के आणि गावात ४ टक्के इतके मुद्रांक शुल्क लागू आहे. GRAS वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने तसेच फ्रॅकिंग व स्टॅम्प पेपरद्वारे ऑफलाइन पद्धतीने तुम्ही तुम्ही मुद्रांक शुल्क भरू शकता,

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क नियम व परिणाम करणारे घटक :

  •  

    संबंधित स्टॅम्प पेपर व्यवहार झालेल्या दिवसापासून सहा महिन्याच्या यातील असावे, त्यावरील चिकट मुद्रांक दोनदा वापरू नये, स्टॅम्प पेपर इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावे नसावा; व्यवहारातील व्यक्तीच्या नावेच असावा.

  • संबंधित मालमत्तेच्या मालकाचे वय व लिंग मुद्रांक शुल्काच्या किमतीवर परिणाम करतात जसे ज्येष्ठ नागरिकांना सवलत असते व स्त्रियांच्या नावे प्रॉपर्टी असेल तर त्यांना पुरुषांच्या तुलनेत १ टक्के सवलत असते. तसेच, निवासी प्रॉपर्टीवर कमर्शियल प्रॉपर्टीपेक्षा कमी मुद्रांक शुल्क लागते. त्याचबरोबर प्रॉपर्टीचे स्थान कुठे आहे, मार्केट एरियामध्ये असेल तर स्टॅम्प ड्यूटि जास्त आकारली जाते.  

  •  

    उत्पन्न कर कायदा १९६१ नुसार कलम ८० सी अनुसार मुद्रांक शुल्कावर दीड लाखापर्यंतच्या कर कपातीसाठी परवानगी आहे. व्यावसायिक इमारत किंवा पुनः मालमत्ता विकायची असेल तर तुम्ही कर कपातीस पात्र नसता. 

याप्रकारे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क दर 2023 संबंधित माहिती तुम्हांला प्राप्त झाली असेल, या मुद्रांक शुल्कांविषयी अगोदरच पुरेपूर माहिती असल्यास व्यवहाराच्या वेळी सोपे पडते.  

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

ईसार पावती म्हणजे काय ? मुद्रांक शुल्क म्हणजे काय ?  

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners