Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

म्हाडा लॉटरी

view 262 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-03-15T13:41:09+00:00

म्हाडा प्रकल्प अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण प्रकल्प होय. या प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील रहिवाश्यांना अल्प दरात घर घेण्यासाठी नोंद करता येते. अर्ज पडताळणीनंतर प्रकल्पाच्या नियम व अटींची पूर्तता करत म्हाडातर्फे लॉटरी पद्धतीने अर्जदारांची निवड करण्यात येते. यामुळे हा गृह प्रकल्प ‘म्हाडा लॉटरी’ या नावाने प्रचलित आहे. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर तुमचे खाते उघडून तुम्ही अर्ज करू शकता. इच्छुक व्यक्ति त्यांची मासिक उत्पन्न मर्यादा लक्षात घेऊन EWS, LIG, MIG आणि HIG फ्लॅट घेण्यासाठी हा ऑनलाइन अर्ज भरतात.

गटान्वये म्हाडाच्या लॉटरीची नोंदणी फी :

अनु. क्र.

गट

नोंदणी फी (रुपये)

EWS

५५६०

             LIG

१०५६०

            MIG 

 १५५६०

            HIG

२०५६०

संबंधित अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असावे. तो व्यावसायिक पगारदार असावा. अर्ज करतेवेळी खालील सगळी वैध कागदपत्रे त्याने अवश्य संलग्नित करावीत,      

  •  आधार कार्ड

  •  पॅन कार्ड  

  •  

    रहिवासी दाखला

  •  उत्पन्न दाखला

  •  फोटो

  •  

    बँक पासबुक प्रत/रद्द झालेले चेक  

  •  

    इतर प्रवर्ग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

(इतर प्रवर्गात अपंग, माजी सैनिक, आमदार-खासदार, कलाकार आदींचा अंतर्भाव होतो.)

मालमत्ता नियोजनाचा सल्ला घेण्यास नो ब्रोकर प्रोफेशनल प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्विसशी जरूर कॉन्टॅक्ट करा

म्हाडा लॉटरी २०२३ मुंबई

यंदा म्हाडा गृहयोजनेच्या मुंबई विभागातर्फे जवळपास ४ हजार घरांची विक्री होणार आहे. सुमारे २५००   पेक्षा जास्त घरे एकट्या गोरेगांवच्या पहाडी प्रकल्पातील आहेत. याशिवाय वांद्रे, बोरिवली, मागाठाणे, कन्नमवार इत्यादी ठिकाणच्या घरांचा समावेश या प्रकल्पाच्या अंतर्गत होतो. एकूण घरांपैकी जवळजवळ ६० टक्के घरे ही अत्यल्प उत्पन्न (EWS) आणि अल्प उत्पन्न (LIG) गटासाठी राखीव असणार आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे ३५ लाख आणि ४२ लाख रुपये इतकी असेल. म्हाडा लॉटरी २०२३ मुंबईच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत; दिनांक ५ जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आलेल्या या नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२३ आहे. म्हाडातर्फे फेब्रुवारी महिन्यात घरांची सोडत काढण्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. तसेच, मार्च २०२३ मध्ये म्हाडाच्या मुंबई विभागातल्या घरांची सोडत काढण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय :

कार्पेट एरिया म्हणजे काय ? वास्तुशांती का करावी ? भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे काय ?

 

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners