Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

ऑनलाईन सातबारा कसा बघायचा

view 9199 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
2 2023-06-20T14:05:22+00:00

सातबारा उताऱ्यात जमिनीचा प्रकार, मालकी हक्क, क्षेत्रफळ, खरेदी-विक्रीच्या नोंदी, भूमापन क्रमांक, गाव, तालुका, जिल्हा इत्यादी सर्व जमिनीसंदर्भातील नोंदी नमूद असतात. 7/12 उतारा ही एक कायदेशीररित्या मान्य रजिस्टर असतो. हा उतारा संबंधित तलाठी किंवा अधिकारी यांना अर्ज देऊन काढता येतो. असे. राज्य सरकारने महाभूलेख संकेतस्थळावर सातबारा ऑनलाइन पाहण्याची सोय केली आहे. आता हा ‘ऑनलाईन सातबारा कसा बघायचा’ हे तुम्हांला माहिती असायला हवे.

नोब्रोकरच्या प्रोफेशनल लीगल सर्विसेसला संपर्क करून मालमत्तेच्या कायदेशीर व्यवहारात मदत घ्या

ऑनलाईन सातबारा पाहणे (online 7 12 pahane) :

  •  

    ‘सातबारा ऑनलाईन पाहणे’ या प्रक्रियेत सर्वांत आधी

    bhulekh.mahabhumi.gov.in महाराष्ट्र शासनाच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

  • त्यानंतर साइटचे होमपेज ओपन होईल त्यावर तुम्हांला डावीकडे महाराष्ट्राचा नकाशा आणि उजवीकडे लोगो व त्याखाली विभागनिवडीचा पर्याय दिसेल.

  •   

    महाराष्ट्र राज्यांतील सहा विभागांपैकी तुम्ही जमीन कोणत्या विभागातील आहे त्या विभागाला सिलेक्ट करून ‘गो’ ला क्लिक करा. पुढे तुम्ही निवडलेल्या विभागाचे नाव स्क्रीनवर दिसेल आता ‘7 12 kasa bagaycha’ हा तुमचा प्रश्न आहे म्हणून तिथे ‘7/12’ व ‘8 अ’ या दोघांपैकी 7/12 निवडा.

  • तुमच्या जमिनीच्या संबंधित त्या विभागांतर्गत येणारा जिल्हा, तालुका, ग्राम सिलेक्ट करा. त्यानंतर काही ऑप्शन तुम्हांला दिसतील.  

  • जसे जमिनीचा सर्वे नंबर, गट नंबर, मालकाचे नाव-मधले नाव-आडनाव पैकी एखादी माहिती नमूद करून तुमचा मोबाइल क्रमांक टाइप करा.

  • ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर ‘online satbara kasa pahava’ या प्रक्रियेची पुढची पायरी कॅपचा कोडची असेल अचूक कोड टाका; कॅपचा वेरीफाय झाला की तुमच्या समोर संबंधित 7/12 उतारा येईल.    

वरील माहितीवरून ‘ऑनलाईन 7 12 कसा बघायचा’ याचे स्टेप्स तुमचे लक्षांत आले असतील तर त्यांना फॉलो करून तुम्ही सातबारा पाहू शकता. 

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

मालमत्ता पत्रक म्हणजे काय 7 12 म्हणजे काय मालमत्ता कर म्हणजे काय

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners