Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Finance / Banking / पॅन कार्ड कसे काढावे ?
Q.

पॅन कार्ड कसे काढावे ?

view 268Views

1 Year

Comment

1 Answers

Send
0 2023-03-15T14:13:37+00:00

पॅन कार्ड अर्थात परमनन्ट अकाऊंट नंबर कार्ड. हे कार्ड भारतीय आयकर विभागाकडून प्रमाणित करण्यात येते. देशातील करदात्यांना हा कार्ड दिला जातो. प्रत्येक कार्डवर दहा अंकी वैयक्तिक ओळख क्रमांक असतो. आता सर्वत्र पॅन कार्ड आवश्यक बनले आहे. या कार्डचे महत्व लक्षात घेत पॅन कार्ड कसे काढावे (pan card kase kadave), याविषयी जाणून घेऊया.  

जास्त रकमेच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड बंधनकारक असते. तसेच, हे कार्ड एक अधिकृत असे महत्वाचे ओळख पत्र म्हणूनही स्वीकारले जाते. बहुतेकांना पॅन कार्ड बद्दल पुरेशी माहिती नसते. ते कुठे वापरण्यात येते किंवा ते कार्ड आपल्याजवळ असणे का गरजेचे आहे, याची माहिती तुम्हांला असावी. पॅन कार्ड काढण्यासाठी सेंटरमधून तुम्हांला एक एप्लिकेशन फॉर्म घ्यावा लागतो. त्याला योग्य ती कागदपत्रे संलग्नित करावी. आणि, पॅन कार्डसाठीची प्रक्रिया शुल्क भरावे.

प्रॉपर्टी संदर्भातील कायदेशीर कामांसाठी नो ब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विससोबत जरूर संपर्क करा

 

हरवलेले पॅन कार्ड कसे काढावे किंवा नवीन pan card कसे काढावे यासाठी खाली उल्लेख केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत, ज्यामध्ये अर्जदाराची ओळख सांगणाऱ्या व त्याच्या पत्त्याचा पुरावा देणाऱ्या दस्तऐवजांचा समावेश होतो. 

  • योग्य माहितीनिशी भरलेला अर्ज

       

  • मतदान ओळखपत्र

  • जन्मदाखला

       

  • आधार कार्ड 

  • फोटो

  • रेशन कार्डची प्रत

       

  • ड्रायविंग लायसेन्स किंवा पासपोर्ट

या कार्ड साठी ११० रुपये इतके शुल्क आकारले जाते. तुमचे पॅन कार्ड ३० ते ४५ दिवसांत तुम्ही अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचवले जाते. तुम्ही हे कार्ड ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने काढू शकता.

ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढावे ?

ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड काढताना भारत शासनाच्या संबंधित एनएसडीएल या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्या वेबसाइटवरून तुम्ही पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज करू शकता. तिथे जे डॉक्युमेंट्स जोडण्यास सांगितले जातील. त्या सगळ्या आवश्यक डॉक्युमेंट्सची पुष्टी करा. ऑनलाइन पेमेंट करून पॅन कार्डसाठी लागणारे एकूण प्रक्रिया शुल्क भरा. एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आढळल्यास दहा हजार इतके दंड आकारण्यात येऊ शकते. तुमचे पॅन कार्ड हरवल्यास तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्डसाठी त्याच वेबसाइटवर अर्ज करू शकता. साधारण ४५ दिवसांत तुमचे कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोचेल. आता पॅन कार्ड कसे काढायचे (pan card kase kadhayche) या प्रश्नाचे उत्तर तुम्हांला मिळाले असेल

संबंधित विषय :

वीज बिल ऑनलाइन भरणे  नवीन गॅस कनेक्शन कागदपत्रे
Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners