Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय?

view 3681 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
-1 2023-03-15T14:20:32+00:00

मालमत्तेच्या व्यवहारातील सर्व दस्तऐवजांविषयी तुम्हांला आवश्यक ते ज्ञान असावे. जसे; कोणती कागदपत्रे आपल्याला विशिष्ट अधिकार देऊ करतात, ते कुठे उपयोगी पडतात, ती कागदपत्रे मिळवण्यासाठीची प्रक्रिया काय असते, इत्यादीबाबत. आता कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय (Power of attorney in Marathi), याचे नियम काय आहेत, तो कुठे वापरात आणला जातो, याची माहिती घेऊया.    

कुलमुखत्यारपत्राद्वारे एखादा व्यक्ति स्वत:चे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देऊ करतो. ते अधिकार कायमस्वरूपी अथवा मर्यादित कालावधीसाठी असू शकतात. हे प्रमाणपत्र शासकीय कामांच्या तसेच प्रॉपर्टीच्या अधिकारांबाबत महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. कुलमुखत्यारपत्रासाठी कायदेशीर अर्ज करावे लागते. रजिस्टरेशन व स्टॅम्प फी आकारली जाते. मूळ व्यक्तीकरवी ज्याला अधिकार दिले जातात त्यास कुलमुखत्यार धारक म्हणतात. त्या मूळ व्यक्तिच्या अधिकारातील कामे त्याचा कुलमुखत्यार धारक करू शकतो.        

नो ब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसशी कॉन्टॅक्ट करून प्रॉपर्टी कागदपत्रांसंबंधी समस्या आत्ताच दूर करा

पॉवर ऑफ एटर्नीचे तीन प्रकार पडतात. जनरल पॉवर ऑफ एटर्नी अंतर्गत रोजच्या व्यवहारातील सामान्य बाबींचे अधिकार समाविष्ट होतात. उदाहरणार्थ; शासकीय दस्तऐवजांची पूर्तता करणे, बिले भरणे, काही अंशी आर्थिक व्यवहार करणे आदी. स्पेसिफिक पॉवर ऑफ एटर्नी या प्रकारांत विशिष्ट कामांबाबत हक्क दिले जातात. उदाहरणार्थ; प्रॉपर्टी खरेदी-विक्री, भाडे करारनामा अशा व्यवहारांत मूळ व्यक्तीच्या जागी त्याचा कुलमुखत्यार धारक स्वाक्षरी करू शकतो. तर, इरिवोकेबल पॉवर ऑफ एटर्नी हे कधीही रद्द न होणारे असते. बहुतेककरून प्रॉपर्टी हक्काच्या बाबतीत कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र बनवून घेतले जाते. मूळ मालक व्यक्तिच्या मृत्यूनंतर जनरल व स्पेसिफिक पॉवर ऑफ एटर्नीचे कुलमुखत्यार धारकाकडे असलेल्या अधिकाराचे अस्तित्व संपते. पण, इरिवोकेबल पॉवर ऑफ एटर्नीचे अधिकार मूळ मालक व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अबाधित राहतात. अशाप्रकारे, एकंदर Power of attorney meaning in Marathi काय आहे, ते कशाप्रकारे वापरले जाते, हे तुम्ही जाणून घेतलं.  

संबंधित आणखी काही विषय :

भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे काय ? घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे घराची वारस नोंद कशी करावी ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners