एखादी प्रॉपर्टी ठरलेली किंमत देऊन खरेदी केली जाते. मग ती जमीन, फ्लॅट किंवा घर असू देत. नेहमी ऐकण्यात येतं की जमिनीचे भाव घसरले किंवा वाढले. तर, या प्रॉपर्टीच्या किमती कशावरून ठरवल्या जातात, कुणामार्फत ठरवले जातात त्याचप्रमाणे याच्याशी संबंधित असलेली संकल्पना म्हणजे ‘रेडी रेकनर दर म्हणजे काय’ याबद्दल माहिती घेऊया.
तुमच्या प्रॉपर्टी व्यवहाराच्या कायदेशीर कामांत नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् ला संपर्क करारेडी रेकनर म्हणजे काय ?
महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची राज्य शासनाद्वारे ठरविण्यात आलेली किमान किंमत म्हणजे रेडी रेकनर दर होय. दरवर्षी त्या-त्या भागातील म्हणजेच शेती, औद्योगिक, रहिवासी भागातील संबंधित बाबींच्या संशोधनावरून राज्य शासन हे दर ठरवत असते. राज्यपरत्वे हे दर भिन्न असू शकतात पण संकल्पना तीच असते. वेगवेगळ्या राज्यांत हा दर कलेक्टर रेट, सर्कल रेट, गाईडलाइन वॅल्यू, मार्केट वॅल्यूएशन गाईडलाइन या नावांनी ओळखला जातो.
what is ready reckoner rate in marathi :
प्रॉपर्टी व्यवहारामध्ये राज्य शासनाला द्यावे लागणारे मुद्रांक शुल्क हे रेडी रेकनर दरावरून ठरत असते. या दरात वाढ झाली तर मुद्रांक शुल्क अधिक आणि जर मालमत्तेचे दर कमी झाले तर कमी बसेल. अर्थव्यवस्थेची स्थिति, जागेची मागणी आणि पुरवठा या गोष्टींवरून हे दर राज्यसरकर ठरवते.
तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी रेडी ठरवून दिलेल्या रेकनर दरापेक्षा कमी किमतीला खरेदी केली असेल तरी तुम्हांला मूळ रेडी रेकनर दराप्रमाणेच मुद्रांक शुल्क भरावे लागते. समजा, संबंधित प्रॉपर्टीची किंमत रेडी रेकनर दराप्रमाणे ७० लाख आहे ती तुम्ही ६० लाखांत घेतली तर तुम्हांला स्टॅम्प ड्यूटि ही ७० लाखावर भरावी लागेल.
आणि, ७० लाखाची प्रॉपर्टी ८० लाखास म्हणजेच रेडी रेकनर दरापेक्षा अधिक किमतीला प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर मात्र तुम्हांला मुद्रांक शुल्क हे वाढलेल्या किंमतीसह भरावे लागते. तुम्ही प्रॉपर्टी रेडी रेकनर दरापेक्षा कमी किंवा अधिक किंमतीला घ्या पण मुद्रांक शुल्क नेहमीच त्यांपैकी मोठ्या किंमतीवर लागणार.
महाराष्ट्र शासनाच्या igr.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही रेडी रेकनर रेट ऑनलाइन चेक करू शकता. तिथे तुम्हांला ज्या भागातील मालमत्तेचे दर पाहायचे आहेत त्या भागाचे नाव, सर्वे नंबर-गट नंबर असे व्यवस्थित डीटेल्स टाकावे लागतील. तुम्ही तुलना करण्यासाठी गतवर्षातील रेट पण चेक करू शकता.
उपरोक्त माहिती वाचून तुम्हांला ready reckoner meaning in marathi काय आहे आणि याचे दर काय आहेत, हे कळले असावे.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
चक्रवाढ व्याज म्हणजे काय PF कसा काढावा आयटी रिटर्न म्हणजे कायShifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
रेडी रेकनर म्हणजे काय?
Akanksha Y
1343Views
1 Year
2023-04-18T19:47:07+00:00 2023-06-16T16:07:53+00:00Comment
1 Answers
Share