Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

तारण म्हणजे काय?

view 712 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-04-27T00:19:12+00:00

आता आपण ‘तारणहार’ हा शब्द सर्रास ऐकतो-बोलतो; हा शब्द त्या व्यक्तीसाठी वापरला जातो जो संकटातून मुक्त करतो अर्थात वाचवतो, भलं करतो याअर्थी. त्याचबरोबर ‘तारण ठेवणे किंवा गहाण ठेवणे’ हे शब्द पण व्यवहारात येत-जात असतात. तर, ते कोणत्याअर्थी आणि कोणत्या प्रकारच्या व्यवहारात वापरले जातात, हेही माहित असावे. त्यासाठी इथे आपण ‘तारण म्हणजे काय व तारण ठेवण्याची प्रक्रिया कशी चालते’ याबद्दल चर्चा करूया.  

घरासाठी लोन घ्यायचं असल्यास नोब्रोकर प्रोफेशनल होमलोन एक्स्पर्टस् सोबत जरूर संपर्क साधा  

गृह तारण कर्ज म्हणजे काय ?

तारण कर्ज तुमच्या मालमत्तेच्या बदल्यात घेतले जाते. याप्रसंगी तुमची मालमत्ता तारण बनते आणि तुम्हांला बँकेकडून किंवा इतर वित्तीय स्त्रोतांकडून कर्ज मंजूर होते. येथे तुम्ही गृह तारण कर्ज किंवा जमिनीच्या तुकड्याच्या बदल्यात कर्ज घेऊ शकता. अर्थात, तारण कर्जाची रक्कम तुम्हांला तुमची स्थावर मालमत्ता तारण म्हणून ठेवल्यानंतर मिळते. या तारण कर्जाची रक्कम ही सहसा मोठी असते. तसेच, या कर्जाची परतफेड करण्याकरिता दीर्घ काळाची मुदत देऊ केलेली असते; साधारण तीस वर्षांचा कालावधी असतो. 

गृहकर्ज घेणे चांगले आहे का?

  • तारण ठेवणे प्रक्रियेत तुम्ही तुमच्या तारण कर्जाची रक्कम कोणत्याही कार्यासाठी खर्च करू शकता. 

  • बँकेतून कर्ज घेताना ते कोणत्या कामासाठी घेत आहोत हे आपल्याला नमूद करावे लागते आणि ते त्यासाठीच खर्च केल्याचे पुरावे सादर करावे लागतात. 

  • शिवाय, तारण बहुतेक अल्प कालावधीसाठी असते व कर्जाची रक्कमसुद्धा तारण कर्जाच्या तुलनेत मोठी नसते.

  • गृहकर्ज व गृह तारण कर्ज या दोन्ही बाबी जरी घराशी संबंधित असल्या तरी यांत फरक आहे.

  • गृहकर्जाचे पैसे हे फक्त घरासाठी खर्चले जातात तर तारण कर्ज हे घर तारण ठेऊन मिळते जे तुम्ही कोणत्याही आवश्यक कामासाठी खर्च करू शकता. 

  • पण, कर्जाची रक्कम फिटेपर्यंत त्याचे अधिकार संबंधित वित्तीय संस्थेकडे असतात फिटल्यानंतर पुनः तुमच्याकडे घराचे हक्क सुपूर्त होतात. 

खालील कागदपत्रे तुम्हांला सादर करावी लागतात, 

  • मालमत्तेचे अधिकृत पुरावे 

  • वैयक्तिक व रहिवासी ओळखपत्र 

  • पॅन कार्ड, सॅलरी स्लिप, उत्पन्न प्रमाणपत्र 

  • मागील तीन वर्षांचे ITR

तर, gruh taran karj व त्यासाठीचे कागदपत्रे या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे पाहिल्या. तसेच, ‘तारण म्हणजे काय’ हेसुद्धा तुम्ही रीतसर जाणून घेतले असावे. 

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा : 

होमलोनसाठी लागणारी कागदपत्रे  सिबिल स्कोर म्हणजे काय ? बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners