Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

शौचालय कोणत्या दिशेला असावे?

view 6554 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-06-20T13:58:27+00:00

माझ्या आजीच्या घराशेजारी चार-पाच वाकलेली घरे अन् पडकं फाटक असलेला एक वाडा होता; कित्येक वर्षात तिथं काहीच डेव्हलपमेंट नव्हतं. परवा आजोळी गेल्यावर त्या वाड्याचं नवं रूप बघून जरा आश्चर्यानेच आज्जीला विचारल्यावर तिने सांगितलं की वास्तुदोषामुळे तिथे राहणाऱ्या लोकांच्या कष्टाला अपेक्षित यश नव्हतं, प्रगती होतं नव्हती. त्यांनी मग वास्तूपंडिताच्या सल्ल्याने वाड्याच्या ब्रह्मस्थानी असलेलं संडास-बाथरूम पाडून योग्य दिशेला बांधलं आता त्यांचं सग्गळं सुरळीत चाललंय. ही स्टोरी ऐकून वाटलं की toilet direction as per vastu in marathi याची माहिती प्रत्येकालाच असायलाच हवी. कारण, एका दोषनिवारणामुळे तो आधीचा उदास वाडा आता उल्हासी व आकर्षक दिसत होता.  

  

सर्वोत्तम सेवा देणाऱ्या नोब्रोकर प्रोफेशनल होम क्लीनिंग सर्विसच्या मदतीने घर चकचकित बनवा

संडास बाथरूम कुठे असावे ?

  •  

    ‘शौचालय कोणत्या दिशेला असावे’ याबाबत वास्तुशास्त्रामध्ये पश्चिम दिशा आणि वायव्य उपदिशा उचित असल्याचे सांगितले आहे.

  • तसेच, दक्षिण व नैऋत्य दिशा सुद्धा विसर्जनासाठी योग्य मानली जाते म्हणून तिथेही तुम्ही टॉयलेट बांधू शकता. अजून एक गोष्ट म्हणजे सहसा टॉयलेट-बाथरूम एटॅच्ड नसावे.

  •   

    संडास-बाथरूम कधीही मुख्य दरवाज्यासमोर बांधू नये तसेच ब्रह्मस्थानी म्हणजेच घराच्या किंवा वाड्याच्या मध्यभागी असू नये.

  •  

    वास्तुशास्त्रानुसार संडास कोणत्या दिशेला पाहिजे याचबरोबर शौचालय कोणत्या दिशेला नसावे याचीही माहिती असायला पाहिजे तर पूर्व व ईशान्य उपदिशेला टॉयलेट कधीच नसावे.

  •  

    टॉयलेटला बसताना तुमचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे; त्यानुसार योग्य दिशा लक्षात घेऊन भांडे फिक्स करणे हिताचे ठरेल. 

उपरोक्त माहितीवरून ‘वास्तुशास्त्रानुसार संडास बाथरूम कोणत्या दिशेला असावे’ हे तुम्हांला कळले असेलच. अशाप्रकरे, जर तुम्ही बांधकाम करताना वास्तूनियमांनुसार घरातील स्थाने निश्चित केलात तर वास्तूदोष नक्की टळेल.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

देवघर कोणत्या दिशेला असावे वास्तुशास्त्रानुसार घराचा जिना कोणत्या दिशेला असावा किचन कोणत्या दिशेला असावे

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners