चल किंवा अचल मालमत्तेचे व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाल्यास त्यात कोणती अडचण उद्भवण्याची शक्यता नसते. त्यातल्यात्यात अचल मालमत्तेच्या व्यवहाराची नोंदणी कायद्याने बंधनकारक आहे, अधिकृत नोंदणीविना ते व्यवहार गृहित धरले जात नाही. आता प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे किंवा ती हस्तांतरित करण्याचे कायद्याने प्रकार पाडलेले आहेत. तर तोच मालमत्ता हस्तांतरण कायदा (transfer of property act in marathi) काय सांगतो, याविषयी रीतसर माहिती पाहूया.
नोब्रोकरच्या प्रोफेशनल लीगल सर्विसेस् ला भेट देऊन प्रॉपर्टी खरेदी-विक्री कायद्यांविषयी जाणून घ्याmalmatta hastantaran kayda in marathi :
मालमत्ता हस्तांतरण कायदा १७ फेब्रुवारी १८८२ रोजी लागू करण्यात आला आणि तो १ जुलै १८८२ ला अमलात आणण्यात आला. यामध्ये एकूण आठ प्रकरणे आणि १३७ कलमांचा अंतर्भाव होतो.
या कायद्याच्या अंतर्गत स्थावर तसेच जंगम मालमत्तेचे हस्तांतरण केले जाते. हे हस्तांतरण दोन किंवा अधिक पक्षांच्या सहभागाने व कायद्याच्या अंमलबजावणीने केले जाते. ते व्यक्ति, संस्था, संघटना यांच्यात होऊ शकते.
मालमत्ता हस्तांतरण कायदा विक्री, भाडेपट्टी, गहाण, भेट, देवाणघेवाण, कारवाईद्वारे होणाऱ्या मालमत्ता व्यवहारात लागू होतो. वारसा, उत्तराधिकारी, मृत्यूपत्र, जप्ती या प्रकरणांत लागू होत नाही.
वय १८ वर्षे पूर्ण असलेली व मानसिकदृष्ट्या स्वस्थ व्यक्ति जिच्याकडे संबंधित मालमत्तेचे मालकी अधिकार किंवा त्या मालमत्तेचा व्यवहार करण्याचे अधिकृत अधिकार आहेत, ती मालमत्ता हस्तांतरित करण्यास पात्र आहे.
या कायद्यांतर्गत अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावे मालमत्ता हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ; तुमची प्रॉपर्टी तुम्ही न जन्मलेल्या बाळाच्या नावे करू शकत नाही.
त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तिने संबंधित प्रॉपर्टीवर अतिक्रमण केले असल्याचे सिद्ध झाल्यास ती व्यक्ति मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम ५१ चा लाभ घेण्यास अपात्र ठरते.
मालमत्ता हस्तांतरण दरम्यान विक्रेता व खरेदीदारासाठी नियम,
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ अन्वये विक्रेत्याने संबंधित मालमत्तेविषयी सगळी प्रामाणिक माहिती खरेदीदारास देणे आवश्यक असते. विक्रीच्या दिवसापर्यंतचे मालमत्तेवरील सार्वजनिक शुल्क अथवा भाडे भरलेले असावे. सर्व कागदपत्रांची जतन व्यवस्थित करून प्रत्यक्ष व्यवहाराच्या दिवशी ते खरेदीदाराकडे सुपूर्त करावे.
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ अन्वये खरेदीदार संबंधित मालमत्तेच्या माहितीविषयी सजग असावा; विक्रेत्याकडून शंकेचे निरसन करून घ्यावे. व्यवहार पूर्ण होताना खरेदीदाराने पैसे भरून मालमत्तेचे मूल्य देणे करावे. मालमत्ता हस्तांतरित झाल्यानंतर त्यावरील शुल्क, भाडे तसेच मूल्य घटल्यामुळे झालेले नुकसान याची जबाबदारी खरेदीदाराकडे जाते.
तर अपेक्षा आहे की एकंदर ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी एक्ट म्हणजे काय, याची प्रक्रिया कशी चालते याविषयीची माहिती तुम्हांला अवगत झाली असावी.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
मालमत्ता कर म्हणजे काय ? तारण म्हणजे काय ? स्थावर मालमत्ता म्हणजे काय ?Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Related Questions
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
मालमत्ता हस्तांतरण कायदा
Prasad
2405Views
1 Year
2023-04-10T17:07:49+00:00 2023-06-16T16:02:02+00:00Comment
1 Answers
Share