Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Vastu / तुळस कोणत्या दिवशी लावावी
Q.

तुळस कोणत्या दिवशी लावावी

view 2821Views

1 Year

Comment

1 Answers

0 2023-05-24T22:27:12+00:00

अंगणात तुळशीचे वृंदावन असणे शुभ मानलं जातं याने इडा-पीडा टळते; घरात येणाऱ्या नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो. कारण, तुळस ही बहुगुणी असते संस्कृतींत तिला पूजण्याची प्रथा प्रचलित आहे. तिच्या मंजुळा तसेच पाने देवाला वाहतात, विशेषत: एकादशीच्या दिवशी पांडुरंगाला मानाने वाहिले जाते, तुळशीची माळ बनवली जाते. अशी ही औषधी गुणधर्म असलेली बहुगुणकारी ‘तुळस कोणत्या दिवशी लावावी’ याचेही शास्त्रांत काही नियम सांगितले आहेत.

नोब्रोकर प्रोफेशनल होम सर्विसेसला संपर्क साधून कमी दरात तुमची घरगुती कामे व्यवस्थित पूर्ण करा

तुळशीचे रोप कोणत्या दिवशी लावावे ?

बहुतेकांना ‘तुळस कोणत्या दिवशी लावायची’ हा प्रश्न पडतो कारण रोप कधी, कसे, कुठे लावावे आणि लावू नये याचेही नियम असतात त्यानुसार शुभ-अशुभ परिणाम ठरतात.  

  • कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते नंतर तुम्ही चैत्र महिन्यात सुद्धा लावू शकता. 

  • तुळशीचे रोप कोणत्या वारी लावावे’ याचं उत्तर आहे गुरुवार आणि शुक्रवार.

  • गुरुवारी तुळशीचे रोप लावल्याने श्रीविष्णूचा वरदहस्त तुमच्यावर राहिल त्याचप्रमाणे तुळशी आईला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुक्रवारी अंगणी तुळस लावणे लाभदायक ठरते.

  •  

    ‘तुळशीचे झाड कोणत्या दिवशी लावावे’ यानंतर आता तुळस कोणत्या दिवशी लावू नये हे जाणून घेऊ तर सूर्य किंवा चंद्रग्रहण, रविवार, एकादशी या दिवशी तुळस लावू नये.  

  • एकादशीला व रविवारी मंजुळा किंवा पाने तोडू नये तसेच रोप उपटू नये त्याचबरोबर इतर वेळेस सांज वेळी आणि आंघोळ न करता तुळशीला पाणी घालणे तिची पाने तोडणे टाळावे.

  •  

    वाळलेली तुळस अंगणात नसावी. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप नेहमी उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावे ते शुभ असते. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळस लावू नये.    

उपरोक्त नियमांवरून तुळशीचे रोप कधी लावावे तसेच कोणत्या वारी लावावे याची पूर्ण माहिती तुम्हांला अवगत झाली असेल तर त्यानुसारच वार-वेळ ठरवून अंगणी तुळस लावा.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

घरात मोरपंख कुठे ठेवावे मनी प्लांट कोणत्या दिशेला लावावे आरसा कोणत्या दिशेला असावे

Most Viewed Questions

Recently Published Questions

include
Flat 25% off on Home Interiors

Premium Material with Quality Assurance and 10 Years Warranty