Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

वडिलांच्या संपत्तीत मुलीचा अधिकार

view 219 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-06-20T14:08:03+00:00

प्रॉपर्टी दोन प्रकारची असते; स्वअर्जित आणि वडिलोपार्जित. मालमत्ता हस्तांतरणाच्या पर्यायांचा अवलंब करून ती हस्तांतरित केली जाते. भारतीय उत्तराधिकारी कायदा तसेच वारस हक्क कायद्यांतर्गत वाडवडिलांच्या संपत्तीवर वारसदारांचा अधिकार बनतो. या कायद्यात पात्र वारसदारांच्या काही अटी आहेत का, असतील तर त्या कोणत्या; ‘वारसदार मुलगा आहे की मुलगी यावरून काही वेगळे नियम कायदा सांगतो का’ अर्थात मुलाच्या तुलनेत वडिलांच्या संपत्तीत मुलीचा अधिकार काय किंवा किती असतो, यासंबंधीची माहिती येथे पाहू.   

              

संपत्तीच्या बाबतीत कायदेशीर सल्ल्यासाठी नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसला नक्की संपर्क करा

मुलीचा वारसा हक्क कायदा : 

  • सन 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार अधिनियम, 1956 मध्ये बदल करण्यात आला. त्या बदलान्वये मुलीला वडिलांच्या संपत्तीत मुलासमान अधिकार देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे ज्याचा उल्लेख पूर्वीच्या कायद्यात नव्हता. हा कायदा हिंदू, शीख, बौद्ध, जैन या समूहांना लागू होतो.  

  •  

    त्यापूर्वी कायद्यात वडिलानंतर फक्त मुलालाच कर्ता म्हणून संपत्तीचे अधिकार दिले जायचे म्हणून वारस मुला-मुलीमध्ये संपत्तीची समान वाटणी होत नव्हती.   

  •  

    कायद्यात 2005 च्या दुरुस्तीनंतर झालेल्या वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीत मुलीला समान वारस हक्क मिळण्याची तरतूद कायद्यात आहे पण त्याआधी म्हणजेच पूर्वीचा कायदा अमलात असताना झालेल्या वाटणीत mulicha varsa hakka समान मिळावा म्हणून दावा करता येत नाही.

  • शिवाय, जर वडिलांची संपत्ती वाडवडिलांकडून मिळालेली नसून त्यांच्या स्वकष्टातून कमवलेली असल्यास वडील मुलीला समान वारस हक्क देण्यास नकार देऊ शकतात.

  •  

    वडिलांना मृत्यूपत्र बनवून त्यांच्या पश्चात त्यांच्या संपत्तीचा उत्तराधिकारी घोषित करण्याचा अधिकार असतो आणि वडिलांनी मृत्यूपत्र बनवले नसल्यास मात्र त्यांच्या सर्व कायदेशीर वारसदारांना त्यांच्या वडिलोपार्जित तसेच स्वअर्जित संपत्तीमध्ये समान अधिकार मिळतो.    

 

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

वडिलोपार्जित जमीन नावावर करणे मृत्युपत्र म्हणजे काय वारस नोंद किती दिवसात होते

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners